मासिक पाळी व इतरांच्या नजरा

मासिक पाळीविषयी मुलींना जागरूक करा.

     मासिक पाळी या विषयावर खूप काही बोलण्यासारखं आहे.पण दैनंदिन आयुष्यात यामुळे लोक कसे वागतात हे समोर आणावसं वाटतयं....खरंच पाळी आली म्हटली की ,घरात सासूची आदळाआपट सुरू झालीच म्हणून समजा.....पाळी म्हणजे विटाळ आणि पुरूषांनी पाळी आलेल्या बाईने बनवलेलं खाऊ नये असं अजूनही खेड्यापाड्यातील किंवा शहरातीलही काही लोक म्हणतात.....मी याचं उत्तर शोधतेय पण आजतागायत ते मला सापडलं नाही.म्हणजे काय विचार असतात एकेकाचे,खरंच हॅटस ऑफ....
     पाळी हा जर विटाळ असेल तर मुलं कशाला हवीत...कारण त्यामुळेच तर जीव तयार होतोय,सृष्टी तयार होतेय तो विटाळ कसा काय..??आणि त्या बाईच्या हातचं का खाऊ नये...??ठीक आहे,या पाच दिवसांत शरीरातून शक्ती गेलेली असते,कामापासून आराम मिळावा म्हणून पाळी आलेल्या बाईला बाजूला बसवायचे.पण जर पाळी आलेल्या बाईने अंगात येणारया बाईला शिवले तर तिचं अंगदुखी किंवा उलट्या सुरू होतात;हे कितपत योग्य आहे.मुळात अंगात येणं हेच मला पटत नाही.अर्थातच तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे;पण अंधश्रद्धेला बळी पडू नका...एवढच सांगेन.....आपला देहच एक देव आहे असं म्हणतात मग त्या देहातच दुसरा देव कसा काय येऊ शकतो.काही ठिकाणी मी स्वत: पाहिलंय,की अगं तुला पाळी आलीये ना..मग शिवता शिवत करू नकोस.चांगल नसतं या सगळ्या उठाठेवी का..आणि कशासाठी..??  सुनेला पाळी आली तर तिने बाकीची कामे धुणी,भांडी,झाडलोट ही सगळी कामे केलेली चालतात पण जेवण बनवलं तर काय होतं काय माहित..??आणि समजा सासू रानात जात असेल;सून घरी असेल आणि तिला भूक किंवा तहान लागली;घरात दुसरं कोणीच नसेल तर अशावेळी तिने काय करायचे...??एकच दिसतंय तिने उपाशी मरायचं....आज २१व्या शतकातही लोकांचे विचार बदलले नाहीत खरंच खूप वाईट वाटतं हे पाहून.
      पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.स्वत: देवांनाही याला सामोरं जावंच लागलं असेल ना....मग आपला समाज अजूनही काही गोष्टी स्वीकारायला तयार नाही.पाळी आली की देवांकडे जायचं नाही देवाचा कोप होतो वगैरे वगैरे.......या समजुती काढून टाकल्या पाहिजेत.उलट त्या पाच दिवसांत मुलीची खूप काळजी घेतली पाहिजे.तिलाही कार्यक्रमांत सहभागी करून घेतलं पाहिजे.असं वाळीत टाकणं योग्य नाही कारण आजकाल खूप कमी वयातच मुलींना पाळी येते अगदी चौथी पाचवीत  असतानाच....मग त्या मुलीला आपलंस करून नीट समजावलं पाहिजे की, घरात कोणाच्या तरी अंगात येतंय म्हणून बाजूला बसवलं पाहिजे....हे सगळ्यांना समजतच.....यांतच हार्मोनल चेंजेस होत असतात आणि पाळीसारखा विषय पालकांनीच नीट मुलींना समजावून सांगून योग्य ती काळजी घ्यायला हवी.पटतयं ना...... एक उदाहरण देते,वारकरी संप्रदायाला आपल्या महाराष्ट्रात किती महत्व आहे.वारी कितीतरी महिने चालू असते.त्या वारीत मुली,महिला व पुरूषही असतात मग यावेळी वारीतच जर एखाद्या महिलेला पाळी आली तर तिला तिथे बाजूला बसवत असतील का...?? तर नाही...!!!तिथे देवाला सगळंच चालतं किंवा लग्नात नवरीला पाळी आली असेल म्हणून काय लग्न पुढे ढकलतात का...??तर नाही....कारण तिथेही हे चालतं.या चालीरीती माणसानेच निर्माण केल्यात....सोयीस्कररीत्या सगळीकडे सगळंच चालत.मग उगाच घरातच याचा बाऊ का करावा....!!!
माझ्या लेखातून मला माझ्या वाचकांपर्यंत एवढंच पोहोचवायचंय की,जर एखादी मुलगी किंवा सून या परिस्थितीतून जात असेल तर उगीचच तिला वाळीत टाकण्यापेक्षा याविषयी सतर्क राहा आणि योग्य ती काळजी घ्या.अंधश्रद्धांना बळी पडून उगाचच ते पाच दिवस त्यांना वाळीत टाकू नका.कारण जग असंही बोलत आणि तसंही बोलतंच.....कारण आजही विज्ञानाच्या युगात काही मुलींना पाळी येतचं नाही;मग त्याची कारणं काहीही असो.........जग त्याही मुलींना वाळीत टाकतंच.....लग्नासाठीदेखील कोणाही समोर येत नाही कारण हेच की पाळी येत नाही.....म्हणूनच जगाचा विचार करून वागू नका.आपल्या मनाला काय वाटतं हेच ऐका आणि पुढे चाला.....

## अक्षया राऊत.
प्रिय वाचकहो माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.प्रत्येकाचे याबाबतीतील मत वेगळे असू शकते पण मला जे वाटलं ते मी या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केलाय.काही चूक झाली असेल तर माफी असावी.लेख आवडल्यास लाईक करून मला फॉलो करा आणि तुमचेही मत कमेंन्ट करून कळवा.