मायबोली..

मायबोली..

 आईचा असे माझ्या 

डोक्यावर कायम हात 

अलगद बरसवते ती

लेकरावर माया तिच्या सानिध्यात.. 


आईच्या मुखी माझ्या

असे प्रीतीचा उच्चार

अलगद पेरते ती 

शब्दांद्वारे प्रीत हृदयात वारंवार.. 


आईचा असे माझ्या 

सर्वत्र हसरा वावर

मराठी मायबोली भाषा माझी 

आहेच अशी दिमाखदार..