माझे कुटुंब माझा श्वास(पार्ट 4 अंतिम)

माझे कुटुंब माझा श्वास (पार्ट 4 )अंतिम

रुक्मिणी आता घरात बरीच रुळली होती....मुलांनी सुद्धा तिला आपलंसं केलं होतं.......मुलं तिला आई म्हणूनच आवाज देई......पण आबा मात्र अजुन परेनंतर तिच्याशी मनमोकळं पणाने बोलत नव्हते.....हे रुक्मिणी ला जरा खटकायच.....पण ती कधीच त्यांना बोलुन दाखवत नसे......कारण तिला पण माहीत असत की हे लग्न किती मुश्कील पणे झालेलं.......

असेच काही दिवस निघुन जातात...... मुलं मोठी होतात......रुक्मिणी ने स्वतःला पूर्ण पने त्या घरात झोकुन दिलेलं असत.......आबाना आता कुठे तरी तिचा स्वभाव आवडायला लागलेला असतो.....ते नेहमी रुक्मिणी मध्ये सुचित्राला शोधत असे.......

तशी ती वागायची सुद्धा......अधून मधून रुक्मिणी चे भाऊ आणि वाहिणीं तीला भेटायला सुद्धा यायचे....आपली बहीण किती आनंदात आहे हे तिच्या चेहऱ्यावर पाहून त्यांना सुद्धा समाधान वाटायच......

अशातच एक दिवस रात्री अंबानी रुक्मिणी ला काही कामानिमित्त त्यांच्या खोलीत बोलावलं

रुक्मिणी : काय झालं....तुम्ही मला अस अचानक का बोलावलं.....

आबा : हवं काही कागत पत्रं आहेत .....नीट वाचुन घे......आणि बघ काही कमी असेल तर सांग.....

रुक्मिणी ने काही न विचारता ती कागत पत्रे वाचली......गे वाचून तिला तर रडायलाच आलं......आबांनी तीनच्या प्रॉपर्टी च्या पेपर मध्ये सत्तर टक्के हिसा तिच्या नावे केला होता.....

रुक्मिणी : आवो हे काय केलं तुम्ही.....

आबा : तुला सांगू ....तु ह्याला माझे उपकार नको समजू.....मी हे तेच केलं.....जे ह्या आधी सुचित्रा बरोबर केलं होतं.....


रुक्मिणी : पण ह्या सगळ्यांची काय गरज....?????माझं काही चुकलं का......

आबा : नाही नाही.....तुझं नाही .....माझं चुकलं....

रुक्मिणी : तुम्ही असे का बोलतायत.....काय झालं.....????

आबा : आबा तसेच मागे वळून रुक्मिणी ला बघतात(त्यांच्या डोळ्यात पाणी असत....)रुक्मिणी सुद्धा आत घाबरते

आबा : किती वर्षे झाली आपल्या लग्नाला.......काय दिल मी तुला......फक्त लग्न केलं.......आणि दिल सगळं ह्या घरचा बोझा तुझ्या वर टाकून......कधी तुला तुझ्या आवडी निवडी सुद्धा  विचारलय नाही.....तुला काय हवं काय नको......काहीच कसलाच विचार मी केला नाय......आणि आता ह्या म्हातारपणात मला हे सगळं खूप त्रास देताय ग.....

रुक्मिणी : काय हा विचार ....आणि कसला काही पण का विचार करतायत तुम्ही......काही चुकलं का माझं....????

आबा :: चुकलं तुझं नाही माझं....चुकलं.....एवढं माझ्या मुलांना आपलं मानुन तु त्यांना मोठं केलं.....त्यांना त्यांच्या पायावर उभ केले.........आणि मी सतत बाहेरच्या कामात गुंतत ठेवलं......जर सुद्धा तुझा उचर नाय केला......

रुक्मिणी हळूच आबांच्या जवळ येते आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवते.....

रुक्मिणी : कोण बोल की तुम्ही मला काहीच नाही दिल......आवो जी गोष्ट माझ्या नशिबात नव्हती ती सुद्धा तुम्ही मला दिली......माझ्या रंगांमुळे मला कोणचं पसंत करत नव्हतं......पण तुम्ही त्याची जाण ठेवली आणि माझ्या बरोबर लग्न केलं.....आणि राहिला सवाल मुलांचा....का ही मुलं फक्त तुमचीच आहे माझी नाही का......मी स्वतः त्या मुलांमध्ये त्यांना एक आई शोधताना पाहिलं......म्हणून मी माझं मूल न होऊन द्यायाच ठरवलं.....आणि कशाला हवंय मूल.....ही तीन बस झाली ना आपल्याला......एवढं मोठं घर माझ्या वरती सोपवलं.....हे काही साध नाही......कोण एवढ्या विश्वासाने करेन का....बोला

आबा काहीच बोलत नव्हते फक्त तिच्या बोलण्याचा विचार करत होते.....त्यांना त्यांची चूक नक्की कळली होती.....

रुक्मिणी : हे पेपर.....ज्याची खरच काही गरज नाही.....मला फक्त आज परेनंतर जस प्रेम दिल  तसच प्रेम द्या ।.....म्हणजे माझ्या घेतलेल्या निर्णयाचं सार्थक होईल.....

आबा डोळ्यात पाणी आणत हलकं हसतात....

रुक्मिणी : आता उदास होऊन झालं असेल तर जाऊया का बाहेर मुलं वाट बघत असतील आपली.....

अबा : ,रुक्मिणी .....आज तुझ्या मुळे माझ्या कुटुंबाला शोभा अली बघ.....हेच माझे कुटुंब माझा श्वास झाला.. बघ.....

दोघेही हसत हसत बाहेर जातात.....आज कितीतरी वर्षाने दोघांना एवढा समाधानी बघुन मुलांना पण बर वाटत....

अशीच वर्षे सरून जातात.....मुली वयात आल्या आल्या चांगली स्थळ बघुन बाजूच्याच गावात थाटामाटात मुलींची लग्न करून देतात......थोड्या वर्षाने सून सुद्धा येते.....घरात सून आल्यावर आबा रुक्मिणी ला घेऊन तीर्थ यात्रेला जातात.........असाच आनंदात त्यांचं कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत.....

(काय मग कसा वाटला शेवटचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारें)


🎭 Series Post

View all