लहान पणापासून सांता क्लॉज म्हणजे रात्री येवून मोज्यामध्ये आपल्या इच्छा असलेल्या वस्तू ठेवून जाणारा देवदूत जो क्रिसमस च्याच रात्री येतो.आकाशातून हरणांच्या गाडीत पांढरी शुभ्र दाढी लाल पांढरा रंगाचा ड्रेस हातात भेटवस्तु असलेली झोळी घेवून येणारा सांता क्लॉज प्रत्येक लहान मुलाचे स्वप्न असते..
माझ्या मते आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारा तो सुखकर्ता दुःखहर्ता च माझा खरा सांता आहे. तो निराकार सगुण जलिस्थळी कष्टिपाषणी वसतो. आपल्या मनातील भाव जाणतो.
त्यांना साकार करतो.अडचणीत मार्ग दाखवतो.अडचणी पण आपल्याला दृढ बनवण्यासाठी आपली परीक्षा घेण्यासाठी बहुतेक निर्माण करीत असावा .त्यात प्रत्येक कसोटीवर तावून सुलाखून निघाल्यावर यशाची चाखलेली चव अमृतहूनही गोड असते.
तो संकटं निवारक ठरतो.साथ देतो .अडचणी निवरण्याच बलही देतो. लोकांचे अनुभव ऐकले की वाटते तो कुठल्या तरी रुपात मदतीला धावून येतो.
माझ्या प्रत्येक अडचणी मध्ये माझा बाप्पा माझ्या सोबत होता. जिथे पुढची वाट दिसायची बंद व्हायची जीव गर्भ गळीत व्हायचा तिथे आशेचा किरण मदतीचा हात म्हणून म्हणून मला बाप्पाचा साक्षात्कार झाला.
जशी लहान मुले सांता ची आतुरतेने वाट पाहत असतात. तशी दिवस रात्र फक्त बाप्पाच नामस्मरण व दर्शनाची आस धरते.
तुम्हाला विचित्र वाटेल पण माझा सांता माझा बाप्पाच आहे.जो माझ्या सर्व इच्छा चुटकीसरशी लीलया पूर्ण करतो.आईवडिलांचे छत्र हरपले तेंव्हा पासून तोच माझा पालन हार झालाय.... माझा देव तो माझा दैव तो ...... काय वर्णू त्याची कथा ...माझ्या सर्व व्यथा तो जाणतो.दूर करतो निभावतो.... मला सावरून घेतो.गोंजरून समजूत घालतो.
माझे अश्रू डोळ्यातून बाहेर डोकावण्याची वाटही न पाहता माझे दुःख हरतो.
तोच माझा खरा सांता... खरे तर सांता ह देवदूत आहे.मी खरंच ऋणी आहे बाप्पाची तो कुणा ना कुणाला माझ्यासाठी देवदूत बनवून पाठवतो......
माझा सांता माझा बाप्पा... शीतल चंद्रप्रकाशात हरिणाच्या गाडीत बसून भेटवस्तु वाटत स्वप्ने पूर्ण करणाऱ्या सांता सारखाच भासतो माझा बाप्पा मला....
थोडी निराळी उपमा वाटेल.पण प्रत्येकाचे मन वेगळे भावना वेगळ्या.... मी माझ्या भावना मांडल्या.जेंव्हा कुणी नसते तेंव्हा अंधारात बोट पकडून वाट दाखवणारा माझा बाप्पा माझा सांता आहे आणि आजन्म राहील .जो फक्त ख्रिसमस च्याच रात्री न येता हर घटकेला माझी साथ देतो . माझी दुःख हरतो सुखाचे उपहार प्रदान करतो.तोच माझा बाप्पा माझा खरा सांता क्लॉज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा