माझा काय गुन्हा

अन्याय करणं एक गुन्हा आहे तेवढाच अन्याय सहन करणंदेखील गुन्हाच आहे.वेळीच आवाज उठवणं तेवढच गरजे?

      प्रेमा,प्रिया आणि निखिल ही तीन भावंडे लहानपणापासुन एकञ कुटुंबातच लहानाची मोठी झाली.प्रिया ही माझी मैञीण तिचीच ही गोष्ट....जेव्हा ती ४ वर्षांची होती. निखिल प्रियापेक्षा लहान होता.जवळजवळ २० माणसांच तिच कुटुंब होत.तिची आई गृहिणी आणि वडील पोलीसमध्ये A.C.P होते.एक चुलता वकील आणि बाकीचे दोघे शेती करायचे.एकंदरीतच घरची परिस्थिती खुप चांगली होती.१०० एकर शेती, गावी मोठं घर , तालुक्यात मोठा बंगला आणि प्रियाचे वडील पुण्यात जॉबला असल्याने तिथे एक घर असा त्यांचा पसारा होता.असं म्हणतात, अर्धवट शिक्षण विषापेक्षा भयानक असतं. पण हे लोक सुशिक्षित असुनही विचार माञ खुप छोटेे होते.   शेती करणारे दोन चुलते त्यांच्या कुटुंबासह गावी राहायचे.गावापासुन ३० मिनिटांवर तालुक्यातील घरी वकील चुलता चुलती राहायचे आणि घरातील सगळी मुले शिक्षणासाठी यांच्याकडेच होती.आणि प्रियाचे आई-वडील पुण्याला राहायचे.

प्रियाच्या आईला नेहमी वाटायचे आपली तीन मुले आहेत निदान एक तरी मुल आपल्या जवळ असावं. निदान २ वर्षांचा निखिलतरी.....शेवटी आईच ती.....पण तिच्या वडिलांना हे अजिबात मान्य नव्हत,यावरून त्यांची खुप भांडणं व्हायची.या भांडणाला कंटाळून प्रियाची आई पुण्याहुन गावी आपल्या मुलांजवळ राहायला आली.तिच्या आईला नवरयाचा पाठींबा नसल्याने सगळे खुप ञास देत होते.आपल्या मुलांसाठी ती सगळं मुकाट्याने सहन करत, पडेल ते काम करायची.पण घरातल्या लोकांनी एवढ्यावर थांबवल नाही.तिच्या नकळत तिच्याविषयी प्रियाच्या वडिलांना एकाच दोन करून काहीही सांगायचे.आता याचा कायमचा छडा लावून रोजची कटकट बंद करण्याच्या हेतुने प्रियाचे वडील गावी आले.घरात पाय टाकताच घरातल्या लोकांनी भांडणाला सुरुवात केली.एवढे दिवस शांत असणारया प्रियाची आई  आपण काही केले नाही हे ओरडुन सांगत होती . पण तिच कुणीही ऐकत नव्हत उलट तिचा आवाज बंद करण्यासाठी प्रियाचे वडील , चुलते आणि त्यांच्या बायकांनीही तिला मारहाण केली.

तिला एवढं मारल की, ती दोन दिवस शुद्धीत नव्हती.आणि तिच्या माहेरी फोन करून तिला घेवुन जाण्यास सांगितले.एवढे निर्दयी लोक त्यांनी तिला डॉक्टटरकडे सुद्धा नेले नाही. तिचा भाऊ येईपर्यंत ती तशीच पडून होती.तिच्या भावाने पटकन दवाखान्याकडे धाव घेतली,पण चार-पाच दवाखान्यात त्यांना घेतलं नाही.शेवटी खुप प्रयत्नानंतर एका दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु केले.दीड -दोन महिन्यांनी प्रियाची आई बरी झाली पण ती माहेरीच राहीली कायमची.यात कोणीही तिचा आणि तिच्या मुलांचा विचार केला नाही.मुलं सगळ बघत होती त्यांच्या मनावर आघात होत होते,पण कोणालाच काहीही सांगता येत नव्हतं.या सगळ्यांत मुलांचीही फरफट होत होती. यात तिची आणि तिच्या मुलांची नेमकी काय चुक होती........

      असेच काही दिवस गेले, प्रियाच्या आईचा मुलांसाठी आणि मुलांचा आईसाठी तिळतळ जीव तुटत होता.प्रियाच्या आईचा लग्नावरुन पुर्णपणे विश्वास उडाला होता.प्रियाचे वडिल मुलांना भावांच्या जीवावर सोडून पुण्याला निघुन जातात.परत कधीच बायकोची विचारपूस देखील करत नाहीत.अशातच आईविना मुलं मोठी होतात. मुलांना ना आईची माया मिळते ना वडिलांची.आंधळा विश्वास ठेवुन कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयाने ५ आयुष्य पणाला लागली.

    पण म्हणतातना ज्याचं कुणी नसत त्याचा देव असतो. प्रेमा एम.एस.सी पुर्ण करते. प्रिया आणि निखिल इंजिनियर होतात.आपल्या आईसोबत झालेल्या चुकीच्या प्रसंगाची मुलांना जाणीव असते.घरी कोणालाही न सांगता तिघेही आपल्या आईला जमेल तस भेटायला जायचे.खुप वेळा  मुलं वडिलांना घेऊन आईला आणायला जातात.पण तिथे पण त्यांची भांडणच व्हायची.तिची आई कधीच नाही आली.कशी येणार ती तिने जे सहन केलं ते ती विसरूच शकत नव्हती.

प्रेमा आणि प्रियाचे लग्नाचे वय झालेलं असत, घरातले बाकीचे लोक दोघींसाठी स्थळ बघायला सुरूवात करतात. यात आई-वडिलांचा कुठेच समावेश नसतो.प्रेमा आणि प्रियाला खुप स्थळ येत असतात.पण कधी मुलगा तर कधी मुलाच्या घरचे नकार द्यायचे. कारण एकच, मुलींची  आई नांदत नाही. मग मुली तरी कशारून संसार टिकवतील. म्हणजे एखाद्याविषयी काही माहिती नसताना लोक निष्कर्षापर्यंत पोहचतात.पण जगात सगळेच लोक छोट्या विचारसरणींचे नसतात.दोघी बहिनींना त्यांच्या योग्यतेचे जीवनसाथी मिळतात,त्यांनी फक्त मुलींचा चांगुलपणा पाहिला.त्यांचा संसार खुप आनंदात सुरू आहे.निखिलपण पुढचं शिक्षण घेत आहे.आता वडिल एकटेच पडलेत रिटायर झालेत.सगळे आपापला विचार करतायत हे पाहुन त्यांना त्यांची चुक उमगली.पण आता खुप उशीर झालाय, वेळ निघुन गेली. मुलींची लग्न झाल्यावर मुलींनी आईला कधीही अंतर दिले नाही.

या सगळ्यात प्रिया,प्रेमा आणि तिच्या आईची नेमकी चुक काय ???  २-३ वर्षांच्या मुलांना आईपासुन वेगळ करून यांना काय मिळाले काय माहित ?? काय अवस्था झाली असेल त्या आईची हे फक्त एक आईच समजु शकते........

  २१ व्या शतकात समाजात अजुनही असे प्रकार घडतात याचं खरच वाईट वाटत. एक आई मुलांना जन्म देते तर तिला आपल्या मुलांच बालपण अनुभवायचा ,त्यांच आयुष्य घडवण्याचा अधिकार असायलाच हवा.

##  अक्षया राऊत  ##

प्रिय वाचकहो, माझा लेख आवडला तर कमेंट आणि लाईक करा  आणि मला फॉलो करा.