Login

मयंक सन्मिशाची Crazy Love Story - Part 4 अंतिम भाग

सांगू शकेल का मयंक त्याच्या मनातलं?? की वोह राज, राज ही रेह जायेगा
आजकाल वडिलांच्या ऑफिसच्या कामात मयंक बिझी झाला झाला होता. समीरशीही त्याचं बोलणं होत नव्हतं.


एक दिवस तो कामात असताना त्याला मेसेज आला, "Hi."


त्याने उघडून पाहिलं तर अनोळखी नंबर होता.


मेसेज रीड करून रिप्लाय न आल्यामुळे समोरून "सन्मिशा here." असा मेसेज आला.


याच्या समोर पहिला प्रश्न, \"खरी की खोटी? \"


त्याने घाबरत रिप्लाय केला, " Hi. "


तिने "कसा आहेस? " विचारलं.


ह्याने उगाच shining मारायला फक्त "good" बोलून thumb चा smiley पाठवून दिला.


Actually, I am working on one project, so I need expert advice.. Will you help me ??


ह्याने भाव खात "yes" म्हटलं.


" Ok. So कधी भेटूया प्रोजेक्ट discuss करायला. तुला कधी वेळ आहे ते सांग मग तसं meeting schedule करू. " : सन्मीशा


त्याने पटकन schedule चेक केलं. खरंतर महिन्याभराचं schedule फुल्ल होतं पण सन्मीशाला भेटायची ही संधी गमवायची नव्हती त्याला.


त्याने संडे fix केलं आणि तिला सांगितलं.


दोघेही ठरल्याप्रमाणे भेटले. कामाचं बोलणं झालं आणि निघाले. अगदी प्रोफेशनली. वरचेवर भेटी होत राहिल्या. बोलणं व्हायचं पण फक्त कामासंदर्भात.


प्रोजेक्ट वर्क होऊ लागला. सन्मीशा त्यात व्यस्त झाली आणि मयंक त्याच्या कामात.


बघता बघता मयंकचे भारतातले दिवस संपत आले. त्याची परतण्याची तारीख जवळ आली पण अजूनही तो सन्मीशाशी मनातलं बोलू शकला नव्हता.


समीरला त्या दोघांना भेटवायला काहीतरी जबरी प्लॅन करावा असं वाटत होता पण करणार काय, कारण दोघंही एकमेकांच्या समोर आल्यावर फॉर्मल बोलतात हे त्याला पक्कं माहित होतं.


" आपण तुझा accident झालाय असं तिला सांगितलं तर.. " : समीर


" काय डोकं फिरलंय का तुझं? तिच्या प्रोजेक्टमध्ये मदत केल्यामुळे ती रिस्पेक्ट करते माझा आणि आता असं खोटं सांगितलं तर आयुष्यात तोंड बघणार नाही ती माझं. " : मयंक


" असं काही होणार नाही रे. मुली भावनिक होतात लगेच असं काही ऐकल्यावर आणि मनातलं भडाभडा बोलतात. " : समीर


" आपण असं काहीही करणार नाही आहोत. And it\"s final " : मयंक


" झालं. आता काय बोलणार पुढे." : समीर ( मनातल्या मनात )


समीरने सन्मीशाला मयंक दोन दिवसांनी निघतोय असा निरोप दिला.


तिने तेव्हा त्यावर ओके म्हटलं पण काहीतरी जाणवत होतं तिला आतल्या आत.. कसलीतरी अस्पष्ट चाहूल.. अबोल हुरहूर.. जी शब्दात मांडता येत नव्हती पण भावनेत गुंतवत होती.. मनातल्या मनात असंख्य धागे विणले जात होते.. पण जाणीवेची उणीव होती.


आपल्याला त्याने मदत केली म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने मयंक साठी काहीतरी गिफ्ट घेण्याचा विचार केला.


खूप विचार करून, search करून शेवटी watch फायनल केलं.


अखेर मयंकच्या जाण्याचा दिवस उजाडला. मयंक सगळ्यांचा निरोप घेऊन एअरपोर्टवर पोहोचला. समीर, सन्मीशाही त्याच्या पाठोपाठ एअरपोर्टला पोहोचले.


सन्मीशाने आणलेलं गिफ्ट मयंकच्या हातात ठेवलं.


त्याने "हे काय?" असं विचारलं.


Gratitude. Thanks once again for helping me. तिने छान smile दिली.


\"काश!मी हिला माझ्या मनातलं सांगू शकलो असतो.\"


" काही म्हणालास का?" : सन्मीशा


" नाही. काहीच नाही. " : मयंक


समीर सगळ्यांसाठी स्नॅक्स घेऊन आला.


सगळे खात एकमेकांशी बोलत होते.


सन्मीशाला ऑफिसमधून कोणाचातरी फोन आला. काहीतरी emergency होती. ती त्या दोघांना सांगून तिथून निघाली.


Flight यायला अजून वेळ होता.


समीर मयंकला मस्करी करून emotional stress कमी करण्याचा प्रयत्न करत होता.


बोलता बोलता मयंक एकदम शांत झाला.


" आज नाही बोलू शकलास, परत कधीतरी बोलशील.. इतका विचार नको करुस. " : समीर


" नव्हती ती माझ्या नशिबात. ठीक आहे. ये भी सही. " : मयंक


समीरने मयंकला मिठी मारली.


तेवढ्यात flight ची announcement झाली. पण ती दोन तास उशिराने येणार आहे अशी.


" अरे यार. अजून दोन तास. " : मयंक


" समीर, तू जा. कितीवेळ थांबशील इथे! " : मयंक


" नको.. थांबतो मी.. सुसाईड वगैरे केलंस तर वहिनी नाय भेटली म्हणून.. " : समीर टेर खेचत म्हणाला.


मयंकने त्याला दोन चार बुक्क्या घातल्या. बिचारा विव्हळायला लागला.


" अरे बस बस भाई. जान लोगे क्या बच्चे की." : समीर


मयंकने समीरला सोडलं, तसा तो खाली बसला.


मयंकने त्याला प्यायला पाणी दिलं.


एक तास असाच निघून गेला. मयंकने जबरदस्ती करून समीरला निघायला सांगितलं. कारण एव्हाना खूप उशीर झाला होता.


शेवटी मयंकने समीरला त्याच्या आईचं कारण सांगितल्यावर समीरला निघण्याशिवाय पर्याय नव्हता. समीर आणि त्याची आई दोघंच राहायचे.


समीर मयंकचा निरोप घेऊन निघाला.


इकडे सन्मीशा काम आटपून निघाली. गाडीत बसल्यावर तिने फोन बघितला. गाणी ऐकत Social media वर पोस्ट्स बघत होती.


आणि एक post तिच्या नजरेस पडली.


एअरपोर्टवर plane crash झाल्याची न्युज होती ती. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लगेच गाडी एअरपोर्टला घ्यायला लावली. ती मयंकचं नाव घेत वेड्यासारखं धावत होती.


प्लेन क्रॅश झाल्यामुळे strict security होती. माणसांची धावाधाव, पळापळ. जो तो आपल्या माणसाला शोधत होता.


सन्मीशाने खूप शोधलं पण मयंक कुठेच दिसला नाही.


तिने शेवटचा पर्याय म्हणून एअरपोर्टवर चौकशी केली.


तिने मयंक इतकंच थरथरत नाव घेतलं त्यावर समोरून Yes Madam, असं विचारलं.


पण सन्मीशाला भान उरलं नव्हतं. तिने विचारलेलं नाव आणि समोरून आलेलं Yes हे उत्तर इतकंच तिला कळलं होतं.


प्रचंड मोठा धक्का बसला होता तिला.


" Excuse me.. " : रांगेत उभं असलेलं कोणीतरी तिला बोललं..


पण तिचं लक्षच नव्हतं.


रांगेतून वाट काढत कोणीतरी counter वर "अजून flight यायला किती वेळ आहे?" असं विचारलं.


तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून सन्मीशाने त्यादिशेने बघितलं. तशी ती धावत त्याच्या दिशेने गेली. तो काही क्षण बिथरलाच. त्याला काहीच कळेना, काय होतंय ते.


" तू ठीक आहेस ना ?? " : सन्मीशा


" अगं हो.. मी ठीक आहे पण तुला काय झालंय.. तू का इतकी tension मध्ये दिसतेयस आणि तू इथे कशी आलीस??? " : मयंक


मयंक प्रश्नावर प्रश्न विचारत होता.. तिने मयंकला घट्ट मिठी मारली..


" सन्मीशा, Are you alright ?? " : मयंक


" काय केलं असतं मी तुला काही झालं असतं तर.. " : सन्मीशा


" मला काही झालं असतं तर म्हणजे.. तू आधी शांत हो.. नेमकं काय झालंय ते नीट सांग मला. " : मयंक


मला प्लेन क्रॅश ची न्यूज कळली social मीडियावर.. खूप घाबरले ते बघून आणि धावत एअरपोर्ट गाठलं.


" एक मिनिट.. मला दाखव ती न्यूज. " : मयंक


तिने मोबाईल काढून न्यूज दाखवली.


" अगं ही दोन तासांपूर्वीची post आहे.. दोन तासांपूर्वी प्लेन क्रॅश झालं म्हणून माझं flight late झालं.. आणि अजून किती वेळ वाट बघावी लागेल माहिती नाही. " : मयंक


" न्यूज बघितल्यावर काही सुचलंच नाही. तू सुरक्षित असणं, इतकंच महत्वाचं वाटलं तेव्हा. " : सन्मीशा


" सन्मीशा, मी ओके आहे बघ. एकदम व्यवस्थित. " : मयंक


त्या दोघांचं बोलणं सुरु असताना finally flight ची announcement झाली.


मयंक flight च्या दिशेने निघाला.


काहीतरी खुणावत होतं दोघांनाही.


सन्मीशाने मयंकचा हात हातात घेतला.


" जाणं गरजेचं आहे?? " : सन्मीशा


"हा काय प्रश्न आहे?" : मयंक


" सगळं कसं असं सांगू.. तू समजून घे. " : सन्मीशा


" सन्मीशा, पटकन सांग काय ते. flight ची वेळ झालीये. मला जाऊदे." : मयंक


" तेच तर म्हणतेय ना. नको जाऊस प्लीज. " : सन्मीशाचे डोळे नकळत पाणावले..


मयंकच्या नजरेतून ते सुटलं नाही.


" मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय." : सन्मीशा हळूच पुटपुटली.


"काय म्हणालीस?" : मयंक


" काही नाही.. " : सन्मीशा चिडून बोलली.


" काही नाही ना, ठीक आहे.. जातो मग मी.. " : मयंक


" मयंक, इडियट.. काय करू मी तुझं!" : सन्मीशा


" कुछ भी करो.. बंदा आपके लिये हमेशा हाज़िर है. " : मयंक


" परत येइन तेव्हा घरच्यांशी बोलू आपल्याबद्दल.. बाय.. बाय बोलवत नाहीये पण option नाहीये." : मयंक


" बाय" : सन्मीशा


" जरा हसून बोल. " : मयंक


" पोहोचल्यावर फोन कर. " : सन्मीशा


" हो, नक्की.. तूपण काळजी घे. " : मयंक


दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला खरा पण आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची कमिटमेंट घेऊन.