मटणाचा बेत - विनोदी अलक

ही मटणाची रेसिपी एकदा Try करून बघाच ?


गावची अंगावर काटा आणणारी थंडी. त्यात रविवार आणि मटणाचा बेत म्हणजे सोने पे सुहागाच. बाबांनी सकाळीच फ्रेश मटण आणून दिलं आणि ते काही कामानिमित्त बाहेर गेले. आईने दुपारच्या जेवणाची सगळी तयारी केली. तिला म्हणाली, "बाहेरून चांगला कडीपत्ता तोडून आण. फोडणीसाठी हवाय,लवकर आण." ती बाहेर गेली. घराला एक प्रदक्षिणा घालून झाली पण कडीपत्ता काही सापडला नाही. मग परत आली. आईने परत पाठवलं. परत दुसरी प्रदक्षिणा मारून परत आली. शेवटी आईने तिला भांड्यात काही भाज्या शिल्लक होत्या,त्यात कडीपत्ता शोधायला सांगितला. तिने कसलीशी पानं हाताला लागली ती आईकडे दिली..


आईने घाईत फोडणी दिली. जेवताना सगळे जेवण कडू लागतंय असं म्हणायला लागले. कोणाला काहीच कळेना,असं कसं झालं. हिची मात्र हसून पुरेवाट झाली होती. कारण तिलाच माहित होतं की कडीपत्त्याची पानं समजून तिने कडुनिंबाची पानं दिली होती.
कडुनिंबच तो, कडवटपणा सहजी थोडीच जाणार! मग हिने आपला पराक्रम आईला सांगताच आईने करायचा तो साग्रसंगीत सत्कार केला.


संध्याकाळी चहाच्या वेळेला आईबाबांनी मिळून एकमेकांच्या हाताला हात लावून चहा गाळायच्या गाळणीने ते कालवण गाळलं. नम म्हणायला ही होतीच. त्यातून कडुनिंबाची पानं वेगळी केली आणि परत फोडणी दिली. यावेळेला मात्र कडीपत्ता आईने स्वतः जाऊन आणला.