मंतरलेला स्वर

लतादीदींच्या स्वरांना दिलेली मानवंदना

आज सकाळी उठून फोन हातात घेतला.मित्राच्या स्टेटस ला तुझा फोटो होता.पण या फोटोत तुला समावायची गरजच नाही कारण…..….......
जेव्हा एखादा तरुण थकून भागून घरी येत असतो,जीवनातील कलह, कटकटी नकोशा वाटत असतात,आंबुन गेलेलं अंग तो कॅब मध्ये कोंबतो आणि अचानक रेडिओ वर तुझा स्वर ऐकू येतो. *आज फिर जिने की तमन्ना है* क्षणात माहोल पालटतो, चैतन्य सगळीकडे भरत तुझा स्वर महोलच बदलून टाकतो.
????????????????????????????????????

तो आज 3 वर्षांनी बॉर्डर वरून घरी चाललाय. रेल्वेत एका कोपऱ्यात अंग चोरून उभा आहे, सगळीकडे गर्दीच गर्दी तेवढ्यात गर्दीतून अचानक तुझा स्वर आर्तपणे ऐकू येऊ लागतो, *ऐ मेरे वेतन के लोगो* क्षणात माहोल पालटतो मघाशी टुकार उभा असणारा तरुण आदराने त्या सैनिकाला स्वतःच्या जागेवर बसवतो आणि एक कडक सॅल्युट मारतो.
????????????????????????????????

ती नववधू, नुकतेच लग्न झालेली.प्रियाची वाट पाहणारी.दूर नोकरीच्या गावी एकटी असणारी, आणि अचानक रेडिओ वर तुझा स्वर बरसू लागतो, *निळ्या आभाळी कातरवेळी* तिच्या डोळ्याला धारा लागतात आणि ती त्याच्या आठवणीत तुझ्या आवाजासकट हरवते.
????‍❤️‍????‍????????‍❤️‍????‍????????‍❤️‍????‍????????‍❤️‍????‍????????‍❤️‍????‍????????‍❤️‍????‍????????‍❤️‍????‍????????‍❤️‍????‍????????‍❤️‍????‍????

ती आज खूप दिवसांनी माहेरी जाणार असते .आई -बाबा ,भाऊ वाहिनी,भाचर सगळे सगळे भेटणार असतात.ती सहज आवरत असताना टी व्ही ऑन करते आणि *सावळा बंधुराया,साजिरी वयनी बाई,गोजीरी शिरपा हौसा माहेरी माझ्या हाई* तुझा लडिवाळ आवाज तिला त्याक्षणी माहेरी घेऊन जातो.

तो वय वर्ष ऐंशी ,विविध व्याधी जडलेल्या,तरीही मनाचे पाश,अहं कायम असणारा.आता रुग्णालयात पडून सुद्धा सतत चिडचिड करणारा.इतक्यात नेहमीची नर्स येते वॉर्ड मध्ये तिच्या फोनवर तू शांत स्वरात गात असतेस, *आता विश्वातमके देवे* तो शांतपणे तयार होतो मृत्यू हसत स्वीकारायला.

असा तुझा स्वर व्यापून उरतो चिरंतन अवकाश म्हणूनच मोजवत नाही तुझ्या वाढदिवसाचा आकडा कारण...
अक्षय गोष्टी अश्या मोजायचा नसतात तर चिरंतन अनुभवायचा असतात.
या आवाजाच्या सम्राज्ञी ला *स्वरलतेला* फक्त आणि फक्त असेच अक्षय राहू दे!!

(लता दिदीं च्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा नाही तर मान वंदना)
*लेखन:प्रशांत कुंजीर*