भेट झाली नसती आपली तर..

भेट झाली नसती आपली तर..

भेट झाली नसती आपली तर.. 

भेटीची ओढ शमली नसती.. 

ओढ कायम राहून वाचाही अबोल राहिली असती.. 


भेट झाली नसती आपली तर.. 

प्रेम म्हणजे काय कळले नसते.. 

इशाऱ्यातले संवाद मात्र पुसटंच वाटले असते.. 


भेट झाली नसती आपली तर.. 

मिठीचा तो स्पर्शही अनोळखीच भासला असता.. 

आलेला प्रेमानुभवंही खोटाच भासला असता.. 


भेट झाली नसती आपली तर.. 

प्रेमात तुझ्या मी पडलेच नसते.. 

आपल्या भविष्याचे स्वप्न रंगवले नसते.. 


भेट झाली नसती आपली तर.. 

प्रेमाचा अंधार माझ्या आयुष्यात अधिकंच दाटला असता.. 

प्रेमापासून अंतर कायम राखण्यासाठी पळवाटेचाच रस्ता मी कायम निवडला असता.. 


भेट झाली नसती आपली तर.. 

दुरावा आणि अंतरातील प्रेमाचा गोडवा चाखला नसता.. 

मात्र अंधारातल्या सावल्यांसह वाटेतल्या पाऊलखुणा ही धुसर झाल्या असत्या.. 


म्हणून भेट झाली आपली तर.. 

योग्यच झाले, तू माझा आहे अन् मी तुझीच आहे हे निष्कर्ष काढता आले.. 

भेटीच्या या क्षणांना हृदयात साठवता आले..