लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा......
ही उक्ती किती निरागस आहे.जसा मुंगीला साखरेचा रवा म्हणजे कण मिळाल्यावर आनंद होतो तसा आनंद मला बालपण मिळाल्यावर होईल .निरागस भाबडा आनंद... वाटते जेंव्हा लहान होतो.तेंव्हा किती मज्जा होती.खाणे पिणे खेळणे..... ना कशाची चिंता , ना कशाचा घोर....
तोंडात चघळायला काही चालायचे .अगदी सुपात आई तांदूळ निवडायला घेतली की मूठभर तांदळाचा बकाना भरायचा. मग आई म्हणायची " लग्नात पाऊस पडेल तुझ्या, " मला खूप आवडायचे तांदूळ खायला .त्याची कडम कड वाजणारे पांढरशुभ्र दाणे चावून चावून त्याची झालेली रवाळ कणी तोंडात घोळवत राहायची. एक दोनदा आई गप्प बसायची.तिसऱ्यांदा धपाटा पडायचा पाठीत.मोठे झाल्यावर लग्नाच्या दिवशी मनात विचार चमकून गेला .खरंच पावूसre पडला.तर या दोन महिने चाललेल्या अथक नियोजनावर पाणी फिरेल. मनात विचार येताच खुदकन हसू आले स्वतःचाच बालिश विचारांवर. पण आता उमगले होते.काही पाऊस बिवुस पडत नाही लग्नात लहानपणी तांदूळ खाल्यावर. कच्चे तांदूळ खाल्यावर पोटात दुखेल म्हणून पूर्वीच्या आज्या गंमत करायच्या.
आणखी एक आठवण आजी आम्हाला सारखे काम सांगायची.नवीन काम म्हणून उत्साह थोडा वेळच टिकायचा.मग काहीतरी कारण पुढे करून तिथून पळ काढायला बघितले की आजी खेकसायची." काम अर्धवट केले की संसार अर्थवट होतो." मग काय रडत कुढत काम पूर्ण करायचेच.आता मोठे झाल्यावर कळते.संसार करायला जी चिकाटी व सहनशीलता लागते तीच तर बिंबवत नसायच्या या प्रौढ बायका......
अशीच गंमत मोठी ताई वयात आली.तिला एका खोलीत पथारी अंथरूण बसविले. अळीतल्या सवाष्ण बायका रोज पाणी घालायला यायच्या.येताना पोळ्या खीर असे काहीसे गोडधोड तिच्या साठी करून घेवून यायच्या.तिला नहायला घालून ते गोडधोड खावू घालून जायच्या.म्हणायच्या हळदीकुंकू आणले आहे. आणि मी एकदा असे का म्हटल्यावर म्हणाल्या ती बाहेरची झाली आहे ना? .....मला हेच कळेना तू खोलीत बसून ती बाहेर बसली असे का म्हणायच्या .आता कळते आहे.ती स्त्री पणाचा सोहळा साजरा करण्यासाठी तिला गोडधोड खावू घालत असतात. आपल्या आताच्या भाषेत कोडवर्ड असतात तसा कावळा शिवला नाहीतर बाहेरची झालीय हे कोडवर्ड असायचे. सोवळ हे निम्मित स्त्री ला विश्रांती मिळावी हाच मुख्य उद्देश.आता सर्व बालिशपण लोप लावून शहाणपण आलेय.पण ते बालपनीचे अबोध प्रश्न त्याची आता सापडलेली उत्तरे समजून वाटते . किती गहन अर्थ होता प्रत्येक गोष्टीत.जो तुमच्या आमच्या बालपणाचा पाया होता.त्यावेळच्या भाबड्या कल्पना मागे किती मोठा अर्थ दडला होता.आता मोठेपणी वाटते .
"जा जा जा मेरे बचपन
कही जा छुप नादान ".....….
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा