Rent agreement

Rent agreement

रेंट एग्रीमेंट(भाडे करार)                                                                                                      जेव्हा आपण कोणतीही जागा भाडेतत्त्वावर घेतो किंवा देतो तेव्हा रेंट एग्रीमेंट करतो जे ११ महिन्यांचे असते. कधी तुम्ही विचार केला आहे का की हे ११च महिन्यांचे का असते? जमीनमालक, रियल इस्टेट एजेंट किंवा खुद्द भाडेकरूला देखील यामागील कारण कित्येकदा माहीत नसते.आणि मुळात रेंट एग्रीमेंट करणं आवश्यक आहे का? तर हो, हे घरमालक आणि भाडेकरू या दोहोंचे हित जपण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि म्हणूनच याबद्दल डोळस असणं, जागरूक असणं आवश्यक आहे.रेंट एग्रीमेंट भाडेकरार किंवा रेंट एग्रीमेंट यालाच लीज एग्रीमेंट असे देखील म्हटलेे जाते. हा जागेचा मालक आणि भाडेकरू यांच्यातील लिखित करार असतो आणि तो या दोन्ही पक्षांच्या हिताचा असतो. जमिनीवर हक्क सांगणारा माणूस हा एकतर जागेचा मालक असायला हवा किंवा जागेच्या मालकाने त्याला त्या जागेबद्दल निर्णय घेण्याचा हक्क पॉवर ऑफ अर्ट्रोनी मधून त्या व्यक्तीला दिलेला असावा.मात्र या एग्रीमेंटमध्ये काही बदल करायचा असेल तर तो दोन्ही पक्षांच्या स्वाक्षरीपूर्वी केला जातो. एकदा सह्या झाल्या की यात कोणताही बदल केला जात नाही. घरमालक तसेच भाडेकरू या दोघांचे हित जपण्यासाठी हा करार केला जातो.                                                                            रेंट अग्रीमेंट ११ महिन्यांचे असण्यामागील कारण: बहुतांश रेंट एग्रीमेंट ११ महिन्यांच्या कालावधीसाठी केली जातात. रजिस्ट्रेशन ॲक्ट १९०८ नुसार भाडेकरार जर १२ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठीचा असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक ठरते.                                                    रजिस्ट्रेशन केल्यास खर्च किती येतो? उदाहरण देऊन समजून घ्यायचे झाले तर दिल्लीमध्ये पाच वर्षांच्या भाडेकरारासाठी स्टॅम्प पेपरची किंमत वर्षभराच्या एकूण भाड्याच्या २% इतकी असते. सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा एग्रीमेंटचा भाग असेल तर यात अजून १०० रुपयांची भर पडयापासुन चार्जेस  वाचण्यासाठी जागेचा मालक आणि भाडेकरू आपापसात ठरवून भाडेकराराचे रजिस्ट्रेशन करत नाहीत. जर दोघांनी मिळून भाडेकराराचे रजिस्ट्रेशन करण्याचे ठरवले तर मालक आणि भाडेकरू यांना दोघांना मिळून याचा खर्च करावा लागतो.                                                                           तर हे आहे भाडेकरार (रेंट एग्रीमेंट) ११ महिन्याचे करण्यामागील खरं कारण.