बदलते नाते.

नाते कसे असावेत हे सांगण्याचा प्रयत्न
बदलती नाती :

आजकाल नाती किती म्हणजे किती बदलली आहेत ना ?? का बदलली ?? काळ बदलला म्हणून की माणसांचे विचार बदलले म्हणून. बदल हा निसर्गाचा नियम आहे अगदीच मान्य. पण बदल जर चांगला असेल तर तो नक्कीच स्वीकारावा पण काही बदल नाहीतच सहन होत. नात्यांचा विचित्र बदल कसा स्वीकारावा आणि का ?? 

पण याला पर्याय नाहीच बहुतेक. आजकाल कोणत्याही नात्यात प्रेम, आपुलकी, विश्वास, आपलेपणा, जपणूक, आदर कुठेच दिसून येत नाही. मग ते नाते कोणतेही असो. जो तो नात्याचा वापर शिडीप्रमाणे करून पुढे जात आहे. स्वार्थी हेतू ठेवून नाते वापरत आहे. पण ज्या नात्यांच्या आधारे आपण जगतो ज्यांना आपले मानतो अशीच नाती जर स्वार्थी असतील तर मग आयुष्य जगायचे तरी कसे आणि संपूर्ण आयुष्य अशी नाती ढकलत तरी कशी न्यायची ?? सगळ्या गोष्टीची कल्पना असतानाही ??

कठीण आहे ना ?? पूर्वीचा काळ किती छान होता ना ?? नात्यात प्रेम होते, आदर होता, मान होता. घरातील मोठी माणसे लग्न जमावताना कसलाही ज्याला लग्न करायचे आहे त्याचा कसलाही विचार घेत नसत.तरीही दोन अगदी अनोळखी व्यक्ती एकमेकांच्या सोबत संपूर्ण आयुष्य कसे घालवत असतील ? एकमेकांचे स्वभाव , चांगल्या वाईट सवई, विचार पटतच नसतील अगदी पूर्णपणे. पण तरीही नाते शेवटपर्यंत टिकून रहात असे. नात्यातला गोडवा कधी कमी झाला नाही पूर्वीच्या काळी. करणं काहीही असतील. समाजाची भीती, मोठ्यांचा धाक / दरारा, नाते संपले तर उर्वरित आयुष्य कसे जाईल याचा विचार, मुलांचे विचार असे काहीही असेल पण नाते टिकविले जात होते अगदी कडे पर्यंत. फक्त नवरा बायको चे नव्हे तर सगळ्याच नात्यात एक प्रकारचा आदर, मान, प्रेम, आदर, सन्मान होता जाणीव होती आणि ती टिकवली जात होती हे खरेच. त्यामुळे पूर्वीचा काळ खूप चांगला होता असे नेहमीच वाटते. पूर्वीच्या काळी अजून एक सुंदर गोष्ट टिकून होती आणि ती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. घरात अनेक लोकं होती. मोठ्यांचा म्हणजेच आजी आजोबा या मंडळींचा एक वेगळाच आधार कायम टिकून होता.

पण हल्ली सगळ्याच नात्यांचा ट्रेण्ड खूप नकारात्मक पद्धतीने बदलत आहे. नात्याची परिभाषा बदलली आहे. प्रेम, जिव्हाळा, माणुसकी उरकीच नाही. मोठ्यांचा आदर राहिला नाही, आजी आजोबाचे प्रेमाचे पांघरून नाही. मायेचा ओलावा नाही. त्यामुळे एकलकोंडी स्वभाव बनत आहेत. विकृत बनत आहेत लोकं. नात्यात पुन्हा प्रेम निर्माण होण्यासाठी काय करायला हवे ?? आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण हे प्रेम, आपलेपणा देण्याचा, त्यांच्यात माणुसकी रुजविण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच पुढची पिढी निकोप वाढेल, माणूस म्हणून लायक बनेल. याचा प्रत्येकाने एकदा शांतपणे विचार करायला हवा. कदाचित उत्तर सापडेल. आपल्यातील द्वेष, मत्सर, राग, हेवेदावे विसरून रादर सोडून देऊन पुढचा विचार करायला हवा. नाहीतर सगळेच होरपळून जाईल. याला कुठे ना कुठे आपले वागणे आणि आपले विचार कारणीभूत आहेत का ? आणि असतील तर त्यात आपण काय बदल करणे अपेक्षित आहे याचा विचार व्हायलाच हवा. कदाचित नात्यांची वीण पुन्हा घट्ट होईल.