प्रेमाचे क्षण गवसले
भाग 28 शेवट
"मी सांगतो ना कारण..हम्मम्म"
"हो तूच होतास कारण. "
"नाही कारण तुला मी जिंकले होते..तेव्हा तू माझी झाली होतीस हे कळले होते..सगळे तुला आणि मला चिडवत होते..ते challenge घेतले खरे पण तू हारणार हे सगळे ओरडून सांगत होते..तू ही मला खुणावत होतीस...नाही जमणार..माघार घे...तुला दुखावत होईल असा एका मैत्रिणीकडे संदेश दिला होतास...तेव्हा ठरवले होऊ दे दुखापत पण तुझ्यासाठी हे करेन.."
"मला तुझी काळजी होती रे..माझा मूर्खपणा तुला जीवानिशी माझ्या पासून दूर घेऊन गेला असता ह्याची भीती होती.." ती त्याच्या सोबत डान्स करत करत हळूहळू जुन्या आठवणी त्याज्या करत होती..
"पण तू मला जिंकवलेस शेवटी.."
"म्हणजे तुला माहितेय ते गुपित. "
"हो मी बघत होतो,तू मुद्दामच हारलीस..मोटार रेस मध्ये ठेवलेले ते अडथळे बाजूला करून घेतलेस..जेणे करून मी घसरून पडू नये..आणि मी वाचलो...सगळे झेंडे काढून ते तुझ्यापर्यंत दहा सेकंदात आणले.."
"मी ही मूर्खपणा करत होते,हे कोणी स्वीकारत नसत..मग मी ही विचित्र अट ठेवत.."
"पण मी हे पण जिंकलो.आणि...प्रेमात पडलो"
"आणि प्रेमात पाडले ही." तिने लाजून त्याला ही प्रमाची कबुली तेव्हा ही अशीच दिली होती आणि आज ही दिली होती. तेव्हा ही त्याच्या बाहुत बाहू देत डान्स करत होती ,आणि स्वतःचे सगळे मन त्याला समर्पित करून दिले होते..त्याच्या त्या डोळ्यात अजून ही बघू शकत नव्हती ,नजर मिळवली की ती चुर होऊन जायची..
"प्रेमात पडली पण मला सांगितले नाहीस तू कधीच. " तो
"तुला कळले नाही ही तुझी चूक "
"कळून जाण्यात अर्थ नव्हता ,जितका तुझ्या कडून कबूल करण्यात होता.."
इतक्यात दोघांच्या ह्या प्रेमाच्या खास प्रसंगाची साक्षी होऊन आई वडिलांचे हे प्रेम बघून हरकून गेलेली (त्यांचीच मुलगी )समर्था मागे उभे राहून बघत होती..
तिला कळले आई गेले कित्येक वर्षे हे असे प्रसंग मिस करत होती ,ते ही आमच्यामुळे..आम्ही ही गृहीत धरले..तिला कुठे काय कळत असेल असे रोमँटिक होने..प्रेम अश्या प्रकारे व्यक्त करणे..ती तर साधी गृहिणी..असे म्हणून हिनवले..गम्मत केली..
समर्था समोर जाणार होती ,त्यांना बघून तिला वाटले त्यांच्या ह्या क्षणात आपण त्यांना सोबत करावी..पण मग वाटले हा त्यांचा सोहळा आहे..सगळीकडे आपली लुडबुड का हवी असते..म्हणून ती हळूच निघून गेली..
पण जातांना काउंटर वर जाऊन सांगितले ,हे श्री श्रीमती मोहिते ह्यांचे सर्व बिल माझ्या कडून ,माझ्या पगारातून घ्या..त्यांना सांगा हॉटेल ची आज ऑफर आहे..पण माझे नाव सांगू नका..
दोघांना आपली लेक ह्या हॉटेल मध्ये जॉब करते हे माहीत नव्हते..कदाचित माहिती झाले असते तर त्यांनी असा क्षण साजरा केला नसता..जिथे मुलं नवरा बायकोच्या नात्यात येतात तिथे त्यांना स्वतःसाठी वेळ ही द्यावा हे समजत नसते..मग प्रेम बाजूला होऊन जाते आणि उरते ते आई वडिलांचे कर्तव्य आणि मुलांसाठी त्यांची जबाबदारी..
"पण तुम्ही ही जा आणि फॅमिली सोबत एन्जॉय करा मॅडम.." स्टाफ
"तेच गेले वीस वर्षे होत आले आहे, पण आता नाही..आत्ता परत त्यांना त्यांचे हरवलेले प्रेमाचे क्षण गवसले आहे..तर त्यात माझा अडथळा नकोय ." समर्था म्हणाली आणि ती तिथून निघून गेली.
©®अनुराधा आंधळे पालवे