प्रेमाचे क्षण गवसले
भाग 23
"म्हणजे ??"
"सगळ्यात जास्त जास्त आई दुखावली गेली आहे ,त्याचे प्रायश्चित करायचे आहे मला..सॉरी म्हणून नाही चालणार.." ती रडत
"तिला आपला अभिमान वाटेल असे काही करू आपण " तो
दोघे आता दिलेली शिक्षा भोगायला तयार करत होते एकमेकांना..त्यांचे मन दुखावले गेले होते..आई बाबा आजी आज बोलले नाही..
इकडे ती बेडरूम मध्ये आली होती ,नवरा ही त्याच्या पाठोपाठ आला होता..
इकडे ती बेडरूम मध्ये आली होती ,नवरा ही त्याच्या पाठोपाठ आला होता..
"ऐक ना हे योग्य आहे का ??"
"तुला बरोबर नाही का वाटत हे, किती सहन करायचे तू मी पाठीशी घालणे चूक होते मीच वेळोवेळी चूक तिथे चूक म्हंटले असते तर त्यांना चोप बसला असता ,इतकी मजल गेली नसती त्यांची..आईच्या चांगुलपणावर बोट उचलायची सहज हिम्मत होते मुलांची ,का तर बाबा सोबत उभा आहे ,तो रक्षण करतो म्हणून..पण इथेच त्यांनी चूक केली..आणि मी शिक्षा केली..आता असू दे..शिक्षा म्हणजे शिक्षण ही असते सतत त्रास समजायचा नसतो..ह्यातून काहीतरी चांगले घडेल..ते सुधारतील समजदारीने जमत नसेल तेव्हा कान पिळावे लागतात तेच मी केले आहे फक्त तू पाठीशी घालून मी केले त्याला चूक ठरवू नकोस..?"
त्याने तिला ही समज दिली ,जर खरंच आपण पाहिले तर घरात भेगा पडल्या तर सिमेंट लावतो ,तेव्हा ठाक ठुक करावी लागते ,मग त्या भेगा बुजवता...ते सिमेंट ओले असते तोपर्यंत त्यावर पाणी टाकत नसतो ,का की नवीन ओल आहे ,पाणी टाकल्याने ते सिमेंट निघून जाऊ शकते आणि त्या भेगा भरून येत नाहीत..
तसेच घरात जर एकाने मुलांना त्यांच्या चांगल्यासाठी रागावले तर दुसऱ्याने त्याची साथ द्यावी किंवा मुलांना समजून सांगण्याच्या नादात पडू नये..जेणे करून त्या व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात राग द्वेष वाढीस लागेल ,आणि समजवणारा चांगला ठरेल..ह्यावेळी शांत बसावे..
"मी चहा घेऊन येते ,हे विसरू आपण..मूड प्रेश करू चहाने.. आईंना ही इथे बोलवते त्या ही रागात होत्या ,त्यांना ही त्रास झालाच.." ती
पटापट आवरत असतांना नवऱ्याने पाहिले आज आपल्या बायकोने केस मोकळे सोडले होते..बाजूला सन ग्लासाचे पॅक होते..ती वेगळी वाटत होती..सेंट चा सुगंध येत होता..इतका वेळ त्या प्रकरणात त्याला हे लक्षात नाही आले..पण ती छान दिसत होती..किती वर्षांनी ती छान दिसत होती..
"थांब थांब जरा ,इकडे ये.."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा