प्रेमाचे क्षण गवसले
भाग 22
श्रुतीला हे ऐकून बरे वाटले की ज्या पैश्यामुळे घरच्यांच्या नजरेत वाईट झाले तो आता इथून पुढे नकोय..सगळ्यांसाठी सुख देणारी आई, सून,व्यवहार सांभाळताना स्व सुखासाठी थोडी ही जगली नाही..तरी इतके करून ही तिला कौतुक म्हणून कधी दोन शब्द लाभले नाही...पैसे वाचवतांना स्वतः पुढे ,आणि पैसे खर्च करताना ,इतरांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या वेळी घरातल्यांचे सुख पुढे..हे करत करत आपण स्वतःला किती मागे पाडले हे समजलच नाही..स्वतः मागे राहिलो पण ज्यांच्या साठी मागे राहिलो त्यांना ही कधी वाटले नाही की तिला ही आपण पुढे घ्यावे ,सोबत घेऊन चालावे.. तिच्या आवडीला ही प्राधान्य द्यावे..तिच्या आवडी ही जपाव्यात..काळाच्या ओघात तिला वाटले इतरांनी विसरले हरकत नाही पण नवरा विसरला ?? ,तो कसा विसरू शकतो...तो तर साक्षी होताच ना माझ्या केलेल्या त्यागाचा...
पण आज त्याने तिची बाजू घेऊन तिला पुरावा दिला की तिचे त्याग त्याला लक्षात होते ,पण तशी वेळ आली नव्हती..आज ती वेळ आली होती..मुलांना त्यांच्या घोर चुकीची जाणीव करून तर द्यायची होतीच पण अद्दल ही घडवायची होती..
"काय हे बाबा,आम्हाला नकोय पैसे.."
"आता ठरलंय ,आता ह्यात बदल नाही.."
"मी तर आईकडून घेईल पैसे,पण मला ही जबाबदारी नकोय.." समर्था
"आता हुशारी नकोय..हे पैसे घे आणि वाटल्यास आज उडव ,उद्या उडव पण लक्षात ठेव हे संपल्यावर तुम्ही कमाई करून फी जमा करायची आहे..तुमचे खाणे आवडी ही त्यात पूर्ण होतील ,पण रोजच्या आवडी पूर्ण करायच्या असतील तर स्वतःच्या जबाबदारीवर करा..."
आता सगळे शांतच झाले होते बाबांनी त्यांचा निर्णय ऐकवला होता हीच मुलांची शिक्षा होती...दोघे मुले ही आई कडे बघत होते..पण तिलाच पुन्हा जाऊन माफी मागण्याची हिम्मत करू शकले नाही..आजीला ही सॉरी म्हणायचे ठरवत होते पण आजी ही निघून गेली...
आता दोघे समोर समोर बसले होते.. दोघे एक एकमेकांकडे बघत होते..त्यांच्या डोळ्यात घडलेल्या चुकी बद्दल लाजेची भावना होती..
"झालं ना आपल्या मनासारखे..?" शशु
"अतिरेख झाला होता रे आपल्या वागण्याचा आज.."
"हो झालाच अतिरेक ,आता भोगू शिक्षा.." ती
"बरेच झालं शिक्षा मिळाली ती.." तो
"मी तर ठरवलं आहे बाबा म्हणतील तेच करणार आहे..नौकरी करून शिक्षण करणार..आपली हीच लायकी आहे..आई वडिलांच्या आधारावर मस्त जगत होतो पण ज्यांच्या आधारावर जगत होतो त्यांनाच आपण कापत होतो...शब्द किती लागतात हे आईला कळत होते ,आपण शब्दाने हर्ट करत राहिलो ,त्यात बाबा आणि आजी आपल्या सोबत आहेत हे पाहून जास्तच सोपं झालं होतं तिला दुखावणे...पण शेवटी बाबांनी आणि आजीने तिची बाजू घेतली...तेव्हा ही आपण आगाऊपणे आजीला बोललो ,बाबाला बोललो.. मी चूक केली...आता मी शिक्षा ही भोगणार.."
"हम्म भोगावीच.." तो
"पण प्रायश्चित कसे करू ?" ती
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा