प्रेमाची कबुली

समीर आणि निधीच प्रेम

      समीर कॉलेजमध्ये शिकत होता. इंजिनिअरिंगच्या 3 वर्ष सुरू होत. समीर हा दिसायला छान आणि स्वभाव पण खूप छान होता त्याच एक होत की कोणाला पण मदत लागली तर सर्वात पहिले तो हजर राहायचा नाही हा शब्द तर त्याला माहीतच नव्हता त्यामुळे तो कॉलेजच्या हिरो होता. त्याच्या हाच स्वभावमुळे किती मुली त्याचावर impress  होत्या. पण त्याच याकडे कुठे लक्ष तो तर त्याचा कामाशी काम ठेवत होता आणि त्यात तो कॉलेज Topper होता  मग तर त्याची प्रत्येक गोष्ट ही वेगळी होती.

इंजिनिअरिंग 3 वर्ष सुरू असताना त्याचा कॉलेजमध्ये एक मुलीने admission घेतील ती म्हणजे निधी. निधीच्या स्वभाव थोडा वेगळा होता ती जास्त कोणासोबत बोलत नव्हती जितकं बोल ती तितकीच बोलायची. निधीच्या स्वभाव पण छान होता तिला पण आवडत होत बाकी मुलामुलींन सोबत बोलायला बाकीच्यांसारखं free रहायच पण निधीच्या घरच वातावरण खूप कडक होत म्हणूनच तिला दुसऱ्या कॉलेजमध्ये admission घ्यावी लागली.

     निधी आणि समीर हे एकमेकांचे clasament होते. समीर हा class मध्ये सर्वांना सोबत बोलत होता त्याने निधी सोबत पण बोलायलाच्या प्रयत्न केला पण ती जितकंच तितकंच उत्तर देत होती ,म्हणून मग त्याने पण नंतर तिच्या सोबत नाही बोलायच अस मनोमन ठरवल. निधी ही अभ्यासात हुशार होती ती कॉलेजमध्ये आला नंतर क्लासमध्ये त्याची unit test झाली आणि त्यात तिला आणि समीरला सारखेच मार्क्स होते त्यात तीने सर्वांना दाखवून दिलं आणि समीरने कधी नव्हे तिचा बदल टीका केली की मनाने तर हुशार नाही पण डोक्याने हुशार आहे मनोमन म्हणून एक उसाना सोडला. आणि त्याच test मध्ये जे टॉपर आले मुळे आणि त्याना कॉलेजच्या एक इव्हेंट प्रोग्राम हँडल करायचा होता आणि, त्यात समीर आणि निधी ने टॉप केलं होतं म्हणून त्याच दोघाना हा इव्हेंट पाहायचा होता आणि, हे सर्व प्रिंसिपल सरनी ठरवलं होतं.

समीरला जेव्हा माहीत पडलं तेव्हा तो खूप खुश होता की कॉलेजच एक इव्हेंट त्याला पार करायचा होता पण जेव्हा त्याला माहित पडलं की त्याला  निधीसोबत इव्हेंट ची तयारी करायची आहे तर तेव्हा, त्याला खूप मोठा प्रश्न पडला की ती बोलतच नाही तर event कसा करायचा जर आमच्यात बरोबर बोलणंच नाही झालं ,तर ती जर आपल्या सोबत बोललीच नाही तर ,असे किती प्रश्न त्याला पडले होते इव्हेंट कसा करायच्या समीरने याबद्दल सरांन सोबत पण बोला पण सरांनी सांगितलं मी काहीच नाही करू शकत हे सर्व प्रिंसिपल सरांनी ठरवलं आहे. सरांनी त्याला विचार की तू का नाही म्हणत आहे निधी सोबत इव्हेंट करायला तर त्याने सांगितलं की निधी एकतर काहीच नाही बोलत जितकं विचारलं तितकंच बोलते यावर एक शब्द पण नाही बोलत मी बाकी गोष्टीमध्ये addjustment करायला तयार आहे पण कॉलेज event मी नाही addjust करू शकत पण सरांनी त्याला तेच सांगितलं मी काहीच नाही करु शकत.

नंतर तो क्लासमध्ये आला तर पाहतो तर काय?आज निधीच नाही आली मग त्याने ब्रेक मध्ये मुलींना विचारलं तिचा मोबाईल नंबर बदल पण कोणाकडे तीचा नंबर नव्हता खूप वेळा नंतर त्याला कोणीतरी तिच्या नंबर दिला. तो घेऊन पटकन त्याने त्यावर कॉल केला पण तिने उचलला नाही त्याला खूप राग येत होता पण तो काहीच नाही करू शकत होता ,मग जिने नंबर दिला तिच्या मोबाईल वरून कॉल केला तेव्हा कुठे तिने उचलला मग त्या मुलीने तो कॉल समीर कडे दिला तो निधीला खूप बोलला पण ही फक्त हो /नाही मध्येच बोलत होती आणि लगेच तिने कॉल कट करून टाकला आणि समीर फोन कडे पाहतच राहिला.काय? मुलगी आहे ही.

दुसऱ्या दिवशी समीर कॉलेजमध्ये यायच्या पहिले निधी आली होती. तेवढ तरी बर! समीर आला बरोबर निधीशी कामाबद्दल बोलला आणि लगेच दोघे पण कामाला लागले कारण इव्हेंट फक्त 15 दिवसांवर होता आणि याची काहीच तयारी नव्हती त्यात पण निधी सुरूवातीला काहीच बोलत नव्हती त्यामुळे त्याला सुरुवातीला खूप त्रास झाला पण त्याने मनोमन ठरवलं होतं या 15 दिवसात आपण निधीला मोकळेपणाने बोलायला लावणे. असाच एक एक दिवस जात होता आणि इव्हेंट ची तयारी हळूहळू पूर्ण होत होती आणि निधी पण हो/नाही च्या पुढे काही बोलत होती. 

समीरला निधीची Planning, Organization, Perfect decision, आणि Properly Management etc. या सर्व गोष्टी खूप आवडला होता या सर्वांना सोबत त्याची मैत्री पण छान होत होती आणि मैत्री पाहतात पाहता समीरच मन निधी वर आल पण ते त्याने तिला जाणून नाही दिल आणि इकडे निधीला याची काहीच कल्पना नव्हती .

इव्हेंट चा तो दिवस आला इव्हेंट छान झाला आणि इव्हेंटमध्ये दोघांनी एकमेकांची खूप छान साथ दिली.सर्व कॉलेजमध्ये  यादोघाच नावाची चर्चा होती आणि, आजच समीरने इव्हेंट झाला की आपल्या मनातल निधीला  सांगायच अस ठरवलं होतं पण ते त्याला नाही जमलं .

दुसऱ्या दिवशी दोघे पण कॉलेजमध्ये आले नेहमी प्रमाणे एकमेकांशी बोलत होते. समीर ने निधीला म्हणला की, आपण कॅन्टीनमध्ये जाऊ निधी म्हणाली ठीक आहे .समीर ने निधीला तिच्या past बदल विचारलं म्हणजे आधी 2 वर्ष कोणत्या कॉलेजमध्ये होती, ते का सोडलं वगैरे  तेव्हा निधीने त्याला सर्व सर्व सांगितलं की , माझा घरचे खूप कडक आहे मागच्या कॉलेजमध्ये एक मुलगा मला खूप त्रास देत होता हे बाबाना माहीत झालं बाबांनी त्या मुलाला खूप मारलं आणि माझं त्या कॉलेजमधून नाव काढून या कॉलेजमध्ये टाकलं. तु मला इव्हेंटच्या पहिले कॉल केला होता तेव्हा नी unknown no. होता म्हणून कॉल नाही उचलला तर तु मला कॉल करत होता म्हणून मी नाही उचलला जर माझ्या बाबाना माहीत झालं की तू मला कॉल करत आहे तुझं काय झालं असत मला माहित नाही आणि मला घरीच बसावं लागल असत  हे सर्व ऐकून समीर शॉक लागला सारखा तिचाकडे पाहत होता. आणि ती त्याचाकडे पाहून हसत होती.

अशेचमध्ये किती तरी दिवस गेले आणि समीरच मन तिचा वरून निघत नव्हतं तो अजून अजून तिच्यामध्ये कडकत होता. एक दिवस त्याने मनाशी विचार करून आज काही झालं तरी मी निधीला माझ्या मनाच सांगणार. समीर त्यादिवशी कॉलेजमध्ये नाही गेला सकाळची दुपार झाली आणि दुपारची संध्याकाळी झालं आणि संध्याकाळी ची रात्री झाली शेवटी त्याने मन एक करून त्याच्या प्रेमाची कबुली देत त्याचे हात कपात होते. पण अखेर त्याने मोबाईल वर शब्द टिपले " माझं तुझ्यावर प्रेम आहे." तिकडे निधीच्या msg ची tone वाजली आणि तिने msg वाचला ती msg वाचून थक्क झाली. ती त्याला कॉल पण नाही करू शकत होती कारण खूप रात्र झाली होती. उद्या कॉलेजमध्ये जाऊन त्याला समजवु तिने असा विचार केला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला तिने खूप समजव्याचा प्रयत्न केला पण तो काहीच समज नव्हता. त्याला त्याच मन सांगत होती की ती पण त्याचावर तिकच प्रेम करते पण फक्त मान्य नव्हती करत. तो तिला एकच प्रश्न वारंवार करत होता की तुझं पण माझं प्रेम आहे का?ती त्याला नाहीच म्हणत होती. शेवटी त्यांने तिच्या दोनी खांदेना पडून स्वतः समोर उभं केलं आणि म्हणाला की आता माझा डोळात पाहून सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे का म्हणून ती त्याचा हातातून सोटण्याच्या प्रयत्न करत होती पण त्याची पकड खूप घट्ट होती आणि पुन्हा त्याने तीला तोच प्रश्न विचारला शेवटी तिने त्याला घट्ट मिठी मारून सांगितलं की हो माझं तुझावर खूप प्रेम आहे अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ती हे सर्व मिठी मारून आणि रडत रडत सांगत होती आणि तो पण तिला घट्ट मिठीत पकडून रडत होता आणि हसत पण होता आज त्याला त्याच खर प्रेम मिळालं होतं. थोडा वेळाने ती बाजूला झाली आणि त्याला सांगितलं की मी माझ्या घरच्यां विरुद्धता नाही जाऊ शकत मला माफ कर तु मला विसरून जा म्हणून ती त्याला सांगते तो तिला खूप समजून सांगतो पण ती काहीच नाही ऐकत त्याच. शेवटी ती त्याला सांगते की तुझं माझ्यावर खर प्रेम असेल तु तुझा करिअर वर लक्ष दे म्हणून तो पण तिला हो म्हणतो आणि मनोमन विचार करतो तु फक्त माझीच आहे आणि पुढे दोघे पण आपल्या अभ्यासा कडे लक्ष देतात आणि असच त्याच 3 वर्ष संपते.  या 3 वर्षी पण समीरच टॉप करतो आणि इकडे निधी पण खुश असते की तो त्याचा करिअर कडे लक्ष देत आहे .4 वर्षे चालू असताना समीरला जॉब लागतो आणि त्याला जसा जॉब पाहिजे होता तसाच त्याला मिळाला होता म्हणून जरा जास्तच खुश होता आता त्याची त्याने सर्वात पहिले निधीला सांगितलं ती पण खूप खुश होती आणि त्याने त्याचा घरी सांगून दिल की माझ निधीवर खुप प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार, समीरच्या घरी काहीच अडचण नव्हती अडचण होती ती फक्त निधीच्या घरी . तो निधीच्या घरी डायरेक्ट गेला आणि तिचा बाबांना निधीच्या हात मागितला निधीचे बाबा आधी खूप चिडले त्यांनी समीरला धक्के मारून घरा बाहेर काढल. नंतर काही दिवसांनी समीरने त्याचा आईबाबा सोबत जाऊन निधीच्या बाबा सोबत बोलले आणि त्यांना खूप समजव्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे त्यांनी हो म्हटलं आणि नंतर काही दिवसांनी निधीला पण जॉब लागला. दोघांनी इंजिनीअरिंग झालं दोघानी पण जॉब केला आणि नंतर लग्न झालं.