प्रेमस्पर्श भाग ६

Love Is Backbone Of Life

उमेशचे हात थरथरत होते.पोटात अगदी खड्डा पडला होता.... पत्रिका पाहण्याआधीच मन घाबरले होते ..अनामिक भीती दाटुन आली होती ..काही तरी मनाविरुद्ध घडणारं ह्याची ग्वाही त्याचे थरथरनारे हात देत होते... पाय अगदी एकाएकी जड झाले...असे अचानक का व्हावे ह्याचे उत्तर ती पत्रिका देणार होते..आशाभुत नजरेने आणि देवाचा आर्त भावनेने धावा करत लग्न पत्रिका हातात घेतली तशी त्याच्या पायाखालची जमीन सरकली....नवरीचे नाव होते प्रिया ..हो प्रियाचेच लग्न होते ..त्याच्या डोळ्यावर अजिबात विश्वास बसत न्हवता.. त्याने नाव पाहिले सर्व आशांवर पाणी फिरले...एक क्षण स्तब्ध झाला..ते नाव प्रियाचेच होते..हो प्रियाचेच लग्न होते... ती प्रियाच्या लग्नाचीच पत्रिका होती ... कसं शक्य होते हे??...त्याला असं वाटलं की तो स्वप्न तर पहात नाही ना..स्वतःला अगदी चिमटे काढून पहात होता ...देवा हे स्वप्नच असू दे डोळे घट्ट मिटून प्रार्थना करत होता.पाठून आईने आवाज दिला "उमेश प्रियाच्या आईचा फोन होता सर्व कुटुंब या म्हणून पण बाबांचं महत्वाचे काम आहे म्हणून मी तसं सांगितले आहे नाही जमणार.. तुला जमत असेल तर जा... तसा तो भानावर आला.ते स्वप्न न्हवते...प्रियाचेच लग्न होते...

उमेश भरलेल्या गळ्याने आईला म्हणाला"बघतो"....त्याच्या तोंडातून शब्दही फुटत न्हवते..


प्रिया एका शब्दाने काही बोलली नाही..पण हे कसं शक्य आहे??का असं अचानक प्रियाने लग्न करण्याचा निर्णय घ्यावा..??


तो पळतच रूममध्ये गेला...आतून दार लावले.. जे गिफ्ट प्रियासाठी आणले होते ते उराशी कवटाळले आणि रडु लागला..त्याचे मन सुन्न झाले होते.डोळ्यासमोर प्रियाचा चेहरा दिसत होता. ह्रदयाची धडधड जलदगतीने वाढली होती..पुन्हा पुन्हा क्रॉस चेक करत होता..नक्की ते प्रियाचे नाव आहे की नाही ..रडत होता..डोळे पुसत होता पुन्हा पत्रिकेवर नजर फिरवत होता..त्याला अगदी वेड्यागत झाले ..स्वतःवरचा ताबा सुटला होता.रडून रडून घसा कोरडा झाला होता..त्याने डोळे घट्ट बंद केले आणि आजपर्यंत जे अनेक क्षण प्रियासोबत घालवले ते भरभर आठवू लागले.वाटलंही न्हवतं कधी की असं काही होईल.....डोळ्यातील पाणी थांबायचे नाव घेत न्हवते .. कोणी तरी हृदय चिरतं आहे असेच जाणवत होते. त्याचा त्रास जणू खोलवर झालेल्या जखमेवर कोणीतरी मीठ चोळावे असाच होता...तडफड होत होती....


मनातल्या मनात प्रियाशी बोलू लागला...."प्रिया तू असं का केले??एकदाही मला सांगावं असं तुला वाटलं नाही....मी तुझ्या आयुष्यात काहीच न्हवतो का?मी मित्राची जागा पण घेऊ शकलो नाही का?..आजवर अनेकदा तू भेटलीस खूपदा सांगावं वाटलं की मला लग्न करायचे आहे...पण मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते म्हणून नेहमीच तुझ्या प्रती असलेल्या भावनेलाही आवर घालत आलो....तुला कधी माझ्या डोळ्यात प्रेम जाणवलं नाही का??तुझ्या नजरेत नेहमी माझं खास स्थान जे मला नेहमीच जाणवत राहायचे तो माझा भ्रम होता का??प्रिया असं कसं करू शकते तू?का होतंय सगळं प्रिया..?तुझं लग्न होतंय मला अजूनही विश्वास बसत नाही..मला विश्वास होता माझ्या खऱ्या प्रेमावर पण आता मी आतून अगदी कोलमडून गेलो आहे.आपण ज्याच्यावर खरं प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला भेटतेच असं म्हणतात मग माझं प्रेम मला का मिळत नाही..प्रिया मला तू हवी आहेस..माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे..तुझ्याशिवाय मी जगू शकेल का?? प्रिया......प्रिया नको लग्न करुस .तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही ..तू माझ्या जीवनाचा आधार होतीस..तुझ्या सोबती जगण्याची मी स्वप्न अगदी लहानपणापासून पहात आलो.माझ्या मनात फक्त आणि फक्त तूच होतीस प्रिया आणि तू नेहमी राहणार ..प्रिया तुझं पत्रिकेवर नाव पाहून मी पुरता ढासाळलो आहे..असं वाटतंय की माझे श्वास आता बंद होतील...मला खूप त्रास होत आहे प्रिया..मला खूप त्रास होत आहे...
.प्लिज प्रिया...,प्लिज परत ये माझ्या आयुष्यात..परत ये...


आईने दार ठोठावले..."उमेश काय करतो आहे बाळा?

त्याने पटकन डोळे पुसले आणि तोंडावर पाणी मारले..
काही न झाल्याच्या अविर्भावात बाहेर आला....
"आई फ्रेश होत होतो"


आई:"बरं मग चल थोडंस खाऊन घे".....

उमेशने भूक नसतानाही कसेबसे दोन घास खाल्ले.....पुन्हा अमोलला भेटण्यासाठी निघून गेला....

अमोलला त्याने बाहेर भेटण्यासाठी बोलवले..

अमोल आला....

उमेशचा धीर गळून पडला होता,उमेशचा रडावलेला चेहेरा पाहून अमोलला जे समजायचे होते ते तो समजून गेला..

उमेश लहान मुलागत अमोलला घट्ट पकडून रडु लागला......
अमोल:"उमेश काय झाले का रडतो आहे?प्रिया तर लग्न करत नाही ना??


उमेशने प्रियाच्या लग्नाची पत्रिका समोर केली..
अमोलने निरखून पाहिले.प्रियाचे नाव दिसले..
अमोल उद्गारला"काय ?प्रियाचेच लग्न होत आहे..मला विश्वास बसत नाही...

अमोल:"उमेश पण हे असं अचानक... प्रिया का लग्न करते आहे?आपल्याला सांगितले नाही. ह्याबाबतीत काही कल्पनाही नाही दिली तीने.

उमेश:"मलाही विश्वास बसत नाही अमोल,घरी गेलो पत्रिकेवर प्रियाचे नाव पाहिले तसे माझ्याही हातापायातून जीव निघून गेला ...माझं डोकं आता बधिर झाले आहे..माझ्यासाठी तिचे लग्न होत आहे accept करणं खूप जड जातंय.. अमोल सर्व स्वप्न वाटतंय....

उमेशचा अश्रूंचा बांध आतापर्यंत सुटला होता....

अमोल:" जरा शांत हो उमेश,डोळे पूस आधी"
उमेश:"मी कसा शांत होऊ अमोल,माझं प्रेम काय खोटं होतं का??इतक्या वर्ष मी तीच्यावर नीस्वार्थ प्रेम करत राहिलो त्याला काहीच काहीच किंमत नाही का??प्रियाला कधीच जाणवलं नाही का माझं प्रेम ?तिच्या आयुष्यात माझी किंमत शून्यच होती...खरंच अमोल मी प्रेम केलंच नाही का?वर्षानुवर्षे ज्या आशेवर मी जगतो आहे ती आशा खोटी होती का...?.अमोल मीच खोटं प्रेम केलं बहुतेक म्ह्णून तर आज प्रिया इतका मोठा निर्णय घेते आणि त्याची खबरही मला लागू देत नाही. किती दिवस झाले मी वेड्यागत तिला फोन लावतो आहे ..किती दिवस झाले तिचा आवाज ऐकला नाही.किती दिवस झाले मी तरसतो आहे.प्रियाला खरंच माझी एकदा पण आठवण आली नाही का??अमोल खरं सांग आता तू माझ्या भावना ज्या प्रियासाठी जपल्या त्या सगळ्या पोकळ होत्या का..?अमोल तूच सांग मी काही चुकलो का??काय होऊन बसलं हे??मी उशीर केला का तिला सांगायला.??


उमेश अनेक प्रश्नांचा भडिमार करत होता..तो काय बोलतो आहे त्याची त्याला कळत न्हवते पण अमोलला प्रत्येक गोष्ट कळत होती..उमेशचे तुटलेलं हृदय चित्कार काढत होते.... अमोलला कळत न्हवते त्याचे सांत्वन कसे करायचे... त्यानेसुद्धा स्वतः पाहिले होते उमेशचे प्रेम खरं प्रेम प्रियाविषयी.. मग प्रियाला का दिसू नये उमेशचे प्रेम??त्याला स्वतःला प्रश्न पडला होता हे कसं ,कधी ,का होऊन बसलं... त्याच्याकडे एकाही प्रश्नाचे न्हवते... तोही उमेशसारखाच ..त्यालाही प्रियाने काहीच सांगितले न्हवते..


अमोलने पत्रिकेवर नजर फिरवली......तो उमेशला म्हणाला.."उमेश थांब धीर सोडू नकोस,हे बघ प्रियाचे लग्न उद्या आहे आपण आज निघू.तेथे गेल्यावर तू प्रियाला तिच्या घरच्यांना सर्व सांग ...कदाचीत काही तरी होईल.....


उमेशला एक नवीन आशा लागून राहिली...अमोल जे बोलत होता त्यात तथ्य तर होते पण खरंच शक्य होईल की नाही ह्यात उमेशला शंका होती.....


उमेश:"अमोल तू म्हणतो आहेस ते पटतंय पण प्रियाचे लग्न उद्या आहे ..आपण तेथे गेलो आणि मी तिच्यावर प्रेम करतो हे सांगितले तर घरचे तयार होतील..?त्यांच्या इज्जतीचे काय?..


अमोल:"उमेश तू खूप विचार करतो आहे ..समज जर हे लग्न प्रियाला मान्य नसेल.तिच्या मनाच्या विरोधात होत असेल तर तिचे काय ??तिच्या मनाचे काय??तिच्या आयुष्याचे काय??


उमेश:"अमोल मला काहीच सुचत नाहीये...काहीच..फक्त इतकं कळतंय माझं प्रेम माझ्यापासून दूर जात आहे....मला प्रचंड त्रास होत आहे"......

अमोल:"तू असा हात पाय गाळून बसू नको..आतापर्यंत तू मला धीर देत आला आहेस..माझ्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे मग असं करू नको...माझं ऐक आपण निघुया आता आणि पुढे काय होईल ते बघू.. तू खरंच प्रियावर प्रेम करतो तर आता ही वेळ हातावर हात ठेवून राहण्याची नाही..मला वाटत एकदा तू प्रियाशी बोलून बघावं.कदाचित तुझ्या भावना ऐकून काही तरी बदल होईल .....तुझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचने महत्वाचे..तू खरं प्रेम करतो तर नक्की ती तुझ्या आयुष्यात येईल बघ हा माझा तुझ्या प्रेमावरचा विश्वास आहे.....



गळून पडलेल्या उमेशच्या डोळ्यात एकाएकी उमेद जागी झाली.. तो अमोलला म्हणाला "हो तू बरोबर बोलतो आहेस.मला तिच्याशी एकदा तरी बोलावं लागेल...


अमोल आणि उमेश दोघेही त्याच क्षणाला प्रियाच्या गावी जाण्यासाठी निघाले....



जसजसे गाव जवळ येत होते तसतसे उमेशचं मन अनेक विचारांत गुंतले होते...मन चलबिचल होत होते...

प्रियाचे घर जवळ आले..प्रियाच्या आई बाबांनी अमोल आणि उमेशचे स्वागत केले....काही तासच लग्नासाठी बाकी होते..


उमेश:"काकू,प्रिया कुठे आहे??

प्रियाची आई:"ती तयार होते आहे,येईलच थोड्या वेळात बाहेर...

प्रियाच्या आईला कोणीतरी आवाज दिला आणि ती निघून गेली...

स्टेजवर नवरदेव उभा होता..अमोलने आणि उमेशने त्याला पाहिले ...दिसायला बरा होता पण उमेश मनोमन हाच विचार करत होता त्याच्या ठिकाणी मी असायला पाहिजे होतो..


भटजींचे मंत्र चालू होते, सनई चौघडे वाजत होते.. हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते.उमेशचे मन खूप उदास झाले ..त्याने चेहरा पाडला होता... अमोल त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत होता..


उमेशच्या मनाची चलबिचल वाढतच होती..




क्रमश:


©®अश्विनी ओगले..
कसा वाटला आजचा भाग नक्की अभिप्राय द्या..तुमचा अभिप्राय खूप मोलाचा आहे.…धन्यवाद.आजचा भाग आवडल्यास नक्की मला फॉलो करा...