प्रेमवीर
ही गोष्ट तशी थोडी फिल्मी आहे. प्रेमाची गोष्ट. तरुणाई ची गोष्ट. गोष्ट जुनी आहे परंतु, जीवनात काहीतरी शिकवून जाणारी आहे.
तर गोष्ट सुरू होते, 80- 90 च्या दशकातील. एकदम हम आपके है कौन? Style. एक सलमान आणि एक माधुरी. त्यांची जशी त्यांच्या भाऊ बहिणीच्या लग्नात भेट होते तशीच. इतिहास सलमान हा वीर आहे आणि माधुरी ही संगीता. वीर च्या मोठ्या भावाचं लग्न ठरतं, संगीताच्या मोठ्या बहिणीशी. तेव्हाच वीर आणि संगीताची ओळख होते. मैत्री होते.
वीर सायन्स चा विद्यार्थी. उंचपुरा. पहिलवान बांधा. निमगोरा रंगाचा. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतो. संगीता ही आर्ट्सची विद्यार्थिनी. मध्यम बांधा. सावळा रंग. कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत असते.
संगीताला नावाप्रमाणे संगीताची आवड असते. वीरला ही गायन व वादनाची आवड असते. दोघांच्या या एकच आवडीमुळे त्यांची मैत्री होते. वीर कधीतरी संगीताला भेटायला जात असे. दोघेही गायनाचा रियाज करत असे. असेच दिवसामागून दिवस जात होते. दोघांच्या भेटीगाठी वाढत होत्या. वीर होस्टेलला राहत असे. त्यामुळे नेहमी भेटणं कधीकधी शक्य होत नसे. म्हणून आता दोघांचे पत्रव्यवहार सुरू झाले.
वीर संगीताच्या पत्राची वाट पाहे. संगीता ही विरच्या पत्राची वाट बघू लागली. वीर ला संगीताला भेटण्याची ओढ लागे. वीर ला संगीता मनोमन आवडू लागली होती. परंतु, संगीताच्या मनात काय आहे हे वीर ला माहित नव्हते.
वीर ने आता संगीताला भेटायचे ठरवले. तो संगीताला त्याच्या प्रेमाची कबुली देणार होता.
वीर संगीताला आपल्या प्रेमाची कबुली कशी देतो? आणि काय असेल संगीताचे उत्तर?
बघूया पुढच्या भागात............
क्रमशः............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा