वीर आणि संगीताच्या लग्नाची तयारी सुरू होते. पत्रिका छापल्या जातात. चि.सौ.का.संगीता आणि चि. वीर यांचा विवाह संपन्न होणार असतो. सगळ्या नातेवाईकांमध्ये पत्रिका वाटल्या जातात. सगळ्यांना लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण मिळते. अशीच वीर आणि संगीताच्या लग्नाची पत्रिका ठाकूर सरांच्या घरी पण येते. ठाकूर सरांची मुलगी वैशू आनंदित होते.
वैशू तिच्या आईला म्हणते,"आई किती दिवस झाले आपण कुठेच नाही गेलो आणि मी आपल्या समाजातल एकही लग्न नाही बघितलं अजून पर्यंत. आपण जायचं का?"
त्यावर सर्व घरचेही लग्नाला जायचं ठरवतात.
तिकडे वीरची वरात निघते. त्याच्या गावावरून संगीताच्या गावाकडे. हळदीचा प्रोग्राम होतो. आता दुसऱ्या दिवशी लग्न होणार असते. वीर खूप आनंदात असतो. सगळे हळदीचा समारंभ संपवून बसलेले असतात. तेवढ्यात एक मुलगा धावतच वर पाहुण्या जवळ येतो. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असतो तो. वीर त्याला विचारतो,"काय रे काय झालं? तू इतका का घाबरला?"
त्यावर तो मुलगा धापा टाकत, घाबरून,"दादा, नवरी पळून गेली." वीर च्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला एकदम धक्का बसतो. "काय??????????????"
सगळे एकदम अवाक् होतात. मिरज चे वडील, भाऊ संगीता च्या घरी जातात. संगीताची आई रडत असते आणि संगीताची मोठी बहीण जी वीरची बहिणी असते. तिला तर काय करावं? काय बोलावं काहीच सुचत नसते.
वीर वहिनीला-"वहिनी सांगा ना संगीत कुठेय? कसं काय ती अशी निघून गेली?"
वहिनीला तर काहीच सुचत नसते. तीही रडायला लागते. वहिनी विरला,"भाऊजी, मला काहीच माहित नाही. संगीता काहीही न सांगता गेलीये."
वीर संगीताच्या मैत्रिणीकडे जाते. तिला विचारतो,"सांग, तुला माहिती आहे का? संगीता कुठे आहे?" तेव्हा ती विरला सांगते,"वीर, संगीता बाळू सोबत पळून गेली. आणि ते दोघे लग्न करणार आहे."
वीरला हा पण एक मोठा धक्का असतो."काय!!!!!!!संगीताने माझ्यासोबत असं का केलं? जर तिला माझ्यासोबत लग्न नव्हतं करायचं तर तिने मला सांगायचं होतं. मला असं न सांगता का गेली ती? माझ्या सगळ्या परिवाराची अशी बदनामी तिला का करावी घातली?"
वीर खूप रडतो. वीर ला वाटतच नव्हते की संगीता असं करू शकते. म्हणून तो तिला शोधायला निघतो. वीर बस स्टैंड वर गेला. रेल्वे स्टेशन वर गेला. सगळीकडे तिला शोधले. ती कुठेच नव्हती.
वीर हताश झाला. निराश झाला. त्याला हे जीवन नकोसे वाटू लागले. त्याला वाटले की आता आत्महत्या करून घ्यावे तेव्हाच आपल्याला शांती मिळेल.
पुढे काय होते बघूया पुढच्या भागात........
क्रमशः...........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा