Login

प्रेमवीर भाग 2

Short lovestory

विरने संगीतालाआपल्या प्रेमाची कबुली द्यायचे ठरविले. वीर संगीताला भेटायला जातो. वीर संगीताला,"संगीता, माझे तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे. तुझे उत्तर काय आहे?"संगीता हे ऐकून थोडी दचकली, घाबरली,लाजली. ती विरला म्हणाली,"वीर मला थोडा वेळ हवा आहे."विरही म्हणाला,"काही हरकत नाही. तू तुझा वेळ घे व मला कळव."

    काही दिवसानंतर परत संगीताची व विरची भेट झाली. वीरच्या मनात धाकधूक होती. आता संगीता काय बोलेलं? उत्सुकता होती. काय असेल संगीता चे उत्तर? परंतु नंतर संगीताने आपला होकार दर्शवला. वीरचा आनंद गगनात मावेना. तो बोलला, मी लगेच घरी सांगतो. आणि आपल्या लग्नाची तयारी करायला सांगतो. संगीता लग्नाचं ऐकून थोडी घाबरली. ती विरला म्हणाली, थोडं थांबूया एवढी काय घाई आहे?

      असेच दिवसामागून दिवस जात होते. वीर होस्टेलमध्ये राहत होता. नेहमी भेटन होत नसल्याने पत्रव्यवहार चालू होता. वीर ला संगीताला भेटण्याची ओढ लागली होती. एकदा सुट्टी असल्यामुळे विरने संगीताला सरप्राईज द्यायचे ठरवले. तो होस्टेल वरून तडक संगीताच्या घरी पोहोचला.

    संगीता घरीच होती. तिचा एक मित्र घरी आला होता. तिला भेटायला. वीर ला अचानक आलेला बघून संगीता दचकली.

संगीता - "अरे विर, तू असा अचानक कसा आलास?"

संगीताच्या आईनेही वीर चे स्वागत केले.

संगीताची आई- अरे बाळा विर, कसा आहेस? कसं काय येणं केलस?" संगीताच्या आईला वीर व संगीता बद्दल माहित नसते.

वीर संगीताच्या आईला,"काही नाही काकू, सुट्टी होती म्हणून म्हटलं चला तुम्हाला भेटून येऊ. माझा मित्र पण राहतो इकडे त्याला पण भेटायला आलो होतो."

संगीताची आई- अरे वा छान केलस. या बसा तुम्ही मी तुमच्यासाठी चहा टाकते."

संगीताच्या मित्राला तिथे बघून वीर ला थोडा राग येतो. वीर संगीताला,"हा कोण संगीता? माझी ओळख करून दे ना."

संगीता-"अरे हा माझा कॉलेजचा मित्र आहे बाळू. तो असाच नोट्स घ्यायला आला होता."

वीर जास्त काही बोलला नाही. थोड्यावेळाने बाळू निघून जातो. मग वीर संगीताला घेऊन घरा बाहेर जातो व रागावून विचारतो,"संगीता कोण आहे हा बाळू? आणि तुला असं घरी कशाला भेटायला यायचं त्याने? मला हे अजिबात आवडलेला नाही. इथून पुढे असं कोणत्या मुलाशी बोललेलं मला आवडणार नाही."

संगीता रागात,"काय आहे वीर? तू फक्त माझा मित्र आहे बाकी काही नाही. तू काय माझ्यावर संशय घेतोय का?"

दोघांचे भांडण होते. वीर निघून जातो.

नंतर घरी जाऊन तो संगीताला पत्र पाठवतो."मी आता लवकरात लवकर घरी आपल्या लग्नाविषयी बोलणार आहे तुही आईला कल्पना दे."

   त्यानंतर वीर घरी संगीता व त्याच्याबद्दल सांगतो."आई बाबा मला संगीता आवडते.मला तिच्याशी लग्न करायचे आहे."घरातल्यांना हे स्थळ काही आवडलेलं नसतं. कारण वीरच्या आईने त्याच्यासाठी दुसरी मुलगी बघितलेली असते.

 आता विर आणि संगीता यांचे लग्न होते का?

बघूया पुढच्या भागात.

क्रमशः................

🎭 Series Post

View all