काव्य प्रकार:- काव्यांजली
प्राजक्त तो देखणा
पहाट समयी
आला प्राजक्ताला बहर
वाऱ्याची लहर
मंद
आला प्राजक्ताला बहर
वाऱ्याची लहर
मंद
शुभ्र सुमन
कोमल,केशरी देठ
अवनीला भेट
पुष्पांची
कोमल,केशरी देठ
अवनीला भेट
पुष्पांची
दिमाखात उभा
प्राजक्त तो देखणा
शोभे अंगणा
तरू
प्राजक्त तो देखणा
शोभे अंगणा
तरू
झुळूक वाऱ्याची
येता येई गंध
सुगंधाने धुंद
मन
येता येई गंध
सुगंधाने धुंद
मन
धवल कुसमांची
सजे सुरेख रांगोळी
घेई ओंजळी
धरणी
सजे सुरेख रांगोळी
घेई ओंजळी
धरणी
हलवता वृक्ष
फुलांचा सडा अंगणी
शुभ्र चांदणी
जसे
फुलांचा सडा अंगणी
शुभ्र चांदणी
जसे
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा