Login

पाळी

मासिक पाळी विषयी... गैरसमज दूर करणारी कथा..
पाळी


फार जुनी कथा आहे. भारताच्या दक्षिणेला देवनगर नावाचे समृद्ध राज्य होते.या नगराचा राजा सूर्यदेव अतिशय न्यायी व पराक्रमी होता. त्याच्या न्यायदानाची व पराक्रमाची ख्याती सर्वदूर पसरली होती.
देवनागरी चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्याचा प्रमुख सल्लागार रामामुर्ती.
रामामुर्तीच्या बुद्दीचतुर्या मुळे राज्याची अर्थव्यवस्था, सुरक्षा तसेच न्याय व्यवस्था अतिशय सुरळीत चालु होती.
या आनंदी आणि समृद्ध राज्यात आज मात्र फार शांतता व चिंतेचे वातावरण पसरले होते. कारण प्रमुख सल्लागार रामामुर्ती यांना एका असाध्य कर्करोगाने ग्रासले होते. आज तर त्यांची तब्बेत फारच खालावली होती. राजा सूर्यदेव व प्रजेची चिंता वाढली. सर्व प्रयत्न करुन देखील शेवटी रामामुर्तीला ते वाचवू शकले नाही.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्यात शोककळा पसरली. राजा देखील फार दुःखी झाला. कारण रामामुर्तीच्या योग्य सल्ल्यानेच राज्याचा कारभार आजपर्यंत व्यवस्थित सुरू होता. आता त्यांची जागा घेण्यासारखा एकही पात्र उमेदवार त्याच्या मंत्रिमंडळात नव्हता. त्यामुळे राजाची चिंता आणखीन वाढली.
रामामुर्तीच्या निधनानंतर काही दिवसांनी राजाने मंत्रिमंडळाची विशेष सभा बोलावली. प्रमुख सल्लागार पदी कोणाची निवड करायची याबाबत मंत्रिमंडळात फार गहन चर्चा झाली. शेवटी एकमत न झाल्याने राजाने निर्णय काही दिवस पुढे ढकलला.
संध्याकाळी राजा सूर्यदेव आपल्या छोट्या राजकन्या सोबत बागेत फिरत होता. त्याच मन त्याच गंभीर समस्स्या बद्द्ल विचार करत होते. विचारमग्न असतांनाच राजकन्येचा रडण्याचा आवाज ऐकून तो दचकला. काय झाल?काय झाल? आमच्या राजकुमारीला राजाने लाडीक स्वरात विचारले. त्यांवर मुंगी चावली अस तिने रडत रडत उतर दिले. अस! कुठं गेली? कुठं गेली?? थांब त्या मुंगीला पकडुन तीच दूध काढून तुला प्यायला देतो. अस राजा गंमतीने म्हणाला त्याच बरोबर राजकुमारी टाळ्या वाजवत आनंदाने नाचू लागली. तीन हट्ट धरला तेंव्हा उद्या काढू अस राजा म्हणाला व वेळ मारून नेली.
दुसऱ्या दिवशी दरबार आटोपून राजा भोजनासाठी राजमहालात आला. राजाला पाहताक्षणी राजकुमारी धावतच त्याच्या जवळ आली.राजाला मिठी मारून लगेच विचारले. बाबा! बाबा!! आणले का मुंगीचे दूध? राजा काहीसा संभ्रमात पडला पण लगेचच त्याला कालचा प्रसंग आठवला व तो मनाशीच हसला. हो!आणु बरं आमच्या राजकुमारीसाठी मुंगीचे दूध !!या ऊतराने ती नाराज झाली. तीन हट्ट्च धरला मला मुंगीचे दूध पाहीजे म्हणजे पाहीजे. सुरवातीला राजा आणि महाराणी मंदाकिनीने हे प्रकरण हसण्यावारी नेले. पण नंतर नंतर तीन हट्टच धरला. जोपर्यंत मी मुंगीचे दूध पिणार नाही तो पर्यंत अन्न ग्रहण करणार नाही.
दहा वर्षाची चिमुकली पण तिचा हट्ट आणि इच्छाशक्ती पाहुन राजा व महारणी आवाक झाले. कारण तिने खरंच अन्नत्याग केला.
एक दिवस गेला दोन दिवस गेले. राजा आणि महाराणीची चिंता वाढली काय कराव हे त्यांना सुचत नव्हते. राजकुमारीला सगळ्यानी फार समजावण्याचा प्रयत्न केला तरी काहीही उपयोग झाला नाही.
तिसऱ्या दिवशी राजाने मंत्रिमंडळाची बैठक घेतली.बैठकीत या बालहट्टा विषयी चर्चा केली. तेथेही काहीच तोडगा निघाला नाही. शेवटी राज्यात दवंडी देण्यात आली. जो कोणी या सम्स्सेवर उपाय सांगेल त्याला योग्य ते इनाम देण्यात येईल.
राजकुमारीची तब्बेत खालावली.तीला पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. इतक्यात द्वारपालाने निरोप आणला की, बाहेर एक तरुण आला आहे. आणि त्याचे म्हणणे आहे या सम्स्सेवर त्याच्या कडे उपाय आहे. राजाने लगेचच त्याला बोलाऊन घेतले. तो तरुण आत आला. कपडया वरून समजत होते की तो फार गरीब असावा. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र वेगळेच तेज दिसत होते.
महाराजांना अभिवादन करुन तो म्हणाला महाराज काळजी करू नका. राजकुमारीला मुंगीचे दूध प्यायचे आहे ना मग मी ते सोबतच घेऊन आलोय. हे तिला द्यावे म्हणजे तिचा हट्ट सुटेल व ती भोजन करेल. काहीही असु दे त्या तरुणाच्या बोलण्यात वेगळाच आत्मविश्वास होता.
राजाने आदेश दिल्या नंतर तो तरुण राजकुमारी जवळ गेला. हे घ्या राजकुमारी मुंगीचे दूध! एक लहानसा ग्लास समोर करुन तो म्हणाला.हे खरंच मुंगीचे दूध आहे ना? राजकुमारीने त्या तरुणाला विचारले.हो तर! मुंगीचेच दूध आहे!!आज सकाळीच काढले मी तुम्ही चाखून तर पहा. लगेचच राजकुमारीने एक घोट घेतला. आणि खरंच नेहमीच्या दुधापेक्षा तिला वेगळी चव आणि वासआला. तिला खात्री पटली की हे मुंगीचे दूध आहे. म्हणुन तिने सर्वच दूध पिऊन टाकले. तिचा हट्ट पुर्ण झाल्यामुळे लागलीच तिने भोजन केले. तिच्या चेहऱ्यावर तेजी दिसु लागली. सर्वाना आनंद झाला.
जेवण केल्यानंतर दासी राजकुमारीला तिला तिच्या कक्षात घेऊन गेल्या. राजा व महाराणी यांनी त्या तरुणाचे मनःपूर्वक आभार मानले. पण आभार मानताना त्यांचे दोघांचेही चेहरे काहीसे काळजीत दिसले. चाणाक्ष तरुणाने ते लगेचच हेरले आणि तो हसुन म्हणाला महाराज आपली पुढची काळजी मी समजु शकतो. राजकुमारी फार बुद्दीवान आहे .उद्या उठुन ती नक्की सांगेल की मला ती दूधवाली मुंगी पाहायची आहे. बरोबर ना? तरुणाच्या या प्रश्नावर दोघंही दचकले कारण त्यांच्या मनातील शंका त्या तरुणाने बरोबर ओळखली होती. हो! अगदी महाराज म्हणाले.आपल्याला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही महाराज कारण हे खरंच मुंगीचे दूध आहे अस तो म्हणाला. त्याचे ते उत्तर ऐकून राजा राणी एकमेकांकडे पाहु लागले.म्हणजे? आम्ही नाही समजलो?
महाराज! आपली दवंडी ऐकली तेव्हाच मी समजलो की, या प्रश्नावर सरळ उपाय अशक्य आहे.म्हणून मी माझ्या बकरीचे दूध काढून आणले आणि राजकुमारीला पाजले. मला खात्री होती की, राजकुमारीने या आधी बकरीच दूध पिले नसेल त्यामुळे तिला त्या दुधाची अलग चव आणि वास आला. तिची खात्री पटली हे मुंगीच दूध आहे. राहिला प्रश्न तो मुंगी पाहण्याचा तर आपण निश्चिंत रहा कारण माझी ती बकरी सर्वात हळू हळू चालते त्यामुळे लाडाने मी तीच नाव मुंगी अस ठेवले आहे. म्हणुन हे दूध मुंगीचेच आहे यात कसलीही शंका नाही. तरुणाच्या या वाक्यावर राजा राणी दोघंही खळखळून हसले व त्या तरुणाच्या बुद्दी कौशल्याच कौतुक केले.
छान! तूझ नाव काय? महाराजांनी त्या तरुणाला विचरले तो तरुण अतिशय अदबीने म्हणाला महाराज मी कृष्णाप्पा बालाजी आपल्याच राज्यात शबरीग्राम गावात राहतो. गरीब परिस्थीतीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि आता शेळ्या मेंढ्या चारतो.
अस! आम्ही तूझ्या बुद्दीचातूर्य आणि तूझ्या स्वभावावर प्रसन्न आहोत. आजच्या या कामाबद्दल आम्ही तुला योग्य ते बक्षिस देऊच पण तुझी काही इच्छा असेल तर सांग आम्ही ती देखील पुर्ण करू. राजाने आनंदाने विचारले .धन्यवाद महाराज! मी गरीब आहे मला बक्षिसापेक्षा राजवाड्यात काही काम मिळाले तर बरं होईल अशी त्याने विनंती केली. तसं महाराजांच्या मनांत तो बसलाच होता. त्यांनी आपला खाजगी सेवक म्हणून त्याची नियुक्ती केली.
सूर्यदेवच्या दरबारात नेहमीप्रमाणे न्यायदानाचे काम सुरळीत सुरु होते.
महाराजांच्या न्यायदानाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही निर्णय ते त्वरित करत नसत. प्रकरणाची शहानिशा करुन नंतर काही दिवसांनी निवडा करत त्यामुळे कोणावरही अन्याय होत नसे.
आज देखील महामंत्र्यांनी अनेक प्रकरण सादर केली. त्यांत एक वेगळेच प्रकरण होते. शबरीग्राम च्या ग्रामस्थांनी एका कुठूंबा विरुध्द तक्रार केली होती.
या प्रकरणात एक लहान कोवळी मुल.गी व तिच्या आईवडिलांना महाराजांसमोर उभे करण्यात आले.
महाराज हे सगळे शबरीग्राम गावचे ग्रामस्थ आहेत. या गावात एक प्रथा आहे. ज्या स्त्रीला मासिकधर्म आलेला आहे तिला गावाच्या शेजारी असलेल्या जंगलात बांधलेल्या एका झोपडीत मासिकधर्म असेपर्यंत रहावे लागते.फार वर्षानुवर्षे ही प्रथा या गावात चालत आली आहे. पण काल ही परंपरा या समोर उभ्या असलेल्या मुलीने व तिच्या आई वडलांनी मोडली. म्हणून शबरीग्राम ग्रामस्थांची मागणी आहे की, या कुठूंबाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी.
अस काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही ही प्रथा मोडली? महाराजांनी त्या कुठूंबाला बाजु मांडण्याची संधी दिली.
कस सांगु महाराज ही गौरी आमची एकुलती एक मुलगी. आंधळी आहे. आम्ही तिला लहानपणापासून फार लाडाने वाढवले आहे. आंधळेपनामुळं तिची व्यवस्थित काळजी घेता यावी म्हणून आम्ही दुसरे मूल होऊ दिल नाही.आता ती तेरा वर्षाची झाली आहे. तिचा हा पहिलाच मासिकधर्म तिला खूपच त्रास होत होता. आणि ती आजपर्यंत आमच्या पासुन कधीच दूर राहिलेली नाही. मुलीच्या जीवाला धोका नको म्हणुन आम्ही तिला झोपडीत पाठवले नाही.ही प्रथा मोडल्याबद्दल आपण जी शिक्षा द्याल ती आम्ही भोगायला तयार आहोत आईवडील म्हणाले.
दोन्ही कडील बाजु ऐकून या प्रकरणाचे पाच दिवसानंतर न्यायदान होईल महाराजांनी जाहीर केले. व दरबार बरखास्त केला. सर्व दरबारी आपापल्या घरी गेले पण ते कुठूंब दरबारातच थांबले.. महाराजाना बातमी समजल्या बरोबर त्यांनी विचारणा केली.ऊरातदाखल ते म्हणाले महाराज जर आम्ही घरी गेलो तर गावातील लोकं आम्हांला मारहाण करतील त्यामुळे आम्ही दरबारातच थांबलो. महाराज आम्हांला कोठडीत टाका पण आम्ही घरी जाणार नाही.
पण अजुन तुमच्यावर आरोप सिध्द होऊन तुम्हांला शिक्षा झालेली नाही. त्यामुळे मी तुम्हांला कोठडीत टाकू शकत नाही. या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत तुमची अतिथिनिवासात सोय करण्यात येईल तेथे तुम्हांला कसलाही धोका नाही महाराज म्हणाले त्या तिघांनीही महाराजांचे मनःपूर्वक आभार मानले. व त्यांचा जयजयकार केला.
संध्याकाळी महाराज नेहमी प्रमाणे बागेत फिरत होते. सेवेसाठी बालाजी देखील त्यांच्या मागे मागे फिरत होता. अरे बालाजी! आज जे शबरीग्राम चे प्रकरण आले.ते तूझेच गाव ना? होय महाराज बालाजी अदबीने म्हणाला. ही जुनी प्रथा मोडल्या बद्दल त्यांना कोणती शिक्षा करावी बालाजी? तुला काय वाटते?
तसं बालाजी स्वतःहून कधीच बोलत नसे. महाराजांनी कधी विचारले तरच तो बोलत असे.तो पुन्हा अदबीने म्हणाला माफी असावी महाराज लहान तोंडी मोठा घास पण त्या तिघांना शिक्षा करण्यापेक्षा उलट त्यांना भर दरबारात सत्कार करुन बक्षिस देण्यात यावे. काय? बक्षिस??महाराजांनी आश्चर्ययाने विचरले तसं महाराज बालाजीचे बुद्दी कौशल्य जाणून होते. महाराज आपला विश्वास असेल तर मला न्यायदानाच्या दिवशी त्या तिघांची बाजु मांडण्याची परवानगी मिळावी महाराज. बालाजी हात जोडून म्हणाला. महाराजांनी बालाजीची विनंती मान्य केली.
पाचव्या दिवशी शबरीग्राम प्रकरणा मुळे दरबार गजबजून गेला होता. त्यांत महिलांची संख्या लक्षणीय होती. सगळ्याना उत्सुकता होती की, महाराज या प्रकरणावर त्या तिघांना काय शिक्षा करणार?
दरबारात महाराजांनी प्रवेश केल्यानंतर मोठा जयजयकार झाला. दरबार शांत झाल्यावर महाराजांनी बोलायला सुरवात केल्यावर सगळ्या दरबाराची उत्सुकता वाढली. मी चारपाच दिवस या प्रकरणाची चौकशी केली तसेच मान्यवरांशी चर्चा केली. या प्रकरणी निर्णय देण्यापूर्वी माझा खाजगी सेवक बालाजीला आदेश देतो की या प्रकरणातील आरोपी कुठूंबाची त्याने बाजु मांडावी बालाजीचे नाव ऐकताच काहींच्या भुवया उंचावल्या. महाराजांना अभिवादन करुन बालाजीने तक्रार करणाऱ्या शबरीग्राम पंचांना विचारले कधी पासुन ही प्रथा सुरू आहे? याचा निश्चित कालावधी कोणाला माहीत नव्हता. कोणी शंभर - दीडशे वर्ष अस मोघम उतर दिले.तरी ही प्रथा फार जुनी आहे यांवर सगळ्यांचे एकमत होते.
तुमच्या घरात स्त्रीला मासिकधर्म असला तर तुम्हांला नक्की काय त्रास होतो? यांवर वेगवेगळे दावे व कारणे सांगण्यात आली.ही प्रथा शबरीग्राम मध्येच आहे. आपल्या राज्यातील इतर गावांत नाही याचे काही विशेष कारण? यावर गावांतील एका सावकाराने ही प्रथा चालु केली याची माहिती पंचानी दिली.
जर तुमच्या घरात स्त्रीला मासिकधर्म आला तर तुम्हांला नेमकी काय त्रास होतो? जेणेकरून तुम्ही त्यांना जंगलातील झोपडीत पाठवता? या प्रश्नाला वेगवेगळी उत्तरे मिळाली. म्हणजे या काळात जर स्त्रीने अन्न बनवले तर ते दूषित होते. तेअन्न शरीराला पचत नाही व उलट्या होतात,अश्या स्त्री चा वारा लागला तर जुने पुराणे दुखणे परत उफाळून येते अशी अनेक कारणे ग्रामस्थांनी सांगितली. बालाजीने पंचाचे बोलणे व्यवस्थित ऐकून घेतले.
महाराज मी पंचाची बाजु ऐकून घेतली. तसेच त्यांना काही प्रश्न देखील विचारले तशी फारशी समाधान कारक उतरे मला मिळाली नाहीत. असो आपल्या राज्यांत फक्त शबरीग्राम याच गावात अशी प्रथा असण्याचे कारण म्हणजे फार वर्षीपूर्वी या गावात कट्ट्पा नावाचा सावकार राहत होता. तो लोकांना कर्ज देऊन त्यांवर भरपुर व्याज लाऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत असे. ज्याला कर्ज फेड्ता आले नाही त्याची जमीन तो जुलूम जबरदस्तीने बळकावत असे.
त्याच वेळी कृष्णप्पा नावाचा शेतकरी त्याच्या पत्नी व आई सोबत त्या गावात राहत होता. वर्षा पूर्वी त्यांचे लग्न झाले होते. कृष्णप्पा ची पत्नी मोहिनी नावाप्रमाणे खूपच सुंदर होती.
कृष्णप्पाने आपल्या शेती साठी कटप्पा सावकाराकडुन कर्ज घेतल पण त्याच वर्षी दुर्दैवाने मोठा दुष्काळ पडला.आणि कृष्णप्पा कर्जबाजारी झाला. कर्ज फेडिसाठी सावकार दबाव आणु लागला. घर जमीन जप्त करण्याची भाषा बोलु लागला.घरी येऊन कर्ज भरता येत नसेल तर पत्नीला वाड्यावर पाठव अशी गलिच्छ भाषा वापरू लागला. या सगळ्याला कंटाळुन कृष्णप्पाने आपल्या शेतातच गळफास लाऊन आत्महत्या केली.
या घटनेमुळे मोहिनीला धक्काच बसला. या धक्क्याने ती महिनाभर आजारी पडली. सासूने तीची काळजी घेतली म्हणून ती वाचली.
कृष्णाप्पाच्या निधनानंतर परत दोनतीन महिन्यांनी सावकारान कर्जाची रक्कम वसुल करायला घरी आला. रक्कम भरता आली नाही तर मोहिनीला वाड्यावर पाठव अस तो तिच्या सासूला म्हणाला. पण सासु आणि मोहीनीने त्याला घरातुन हाकलून लावले.त्या दिवसापासून मोहिनीवर त्याने डाव ठेवला आणि कधीतरी सूड घेऊ असा चंग बांधला.या दरम्यान त्याने सर्व जमिनीवर कब्जा केला. तरिही मोहिनीने त्याला भीक घातली नाही. जमीन गेली तरी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करुन ती आपले घर चालवत होती. आपल्या ससुची देखील तिला चांगली साथ होती.
कृष्णप्पाच्या निधनाला वर्ष होत आले. वर्षश्राध्द करण्याची प्रथा असल्याने. त्या दिवशी त्यांनी भोजनाचा कार्यक्रम ठेवला. उद्या वर्षश्राध्द आहे. आणि आज तिला मासिकधर्म आला. ही बातमी सावकाराला त्याच्या मोलकरीण ने दिली ही बातमी समजताच सावकार विचार करू लागला. विचार करता करता त्याच्या डोक्यात एक भयंकर योजना आली.
ठरलेल्या मुहूर्तावर वर्षेश्राध्द पूजा झाली लोकांनी भोजन केले. भोजन केल्यानंतर काही काळातच त्यांना अस्वस्थ वाटु लागले. काहींना उलट्या व्हायला लागल्या. दोन लहान मुलांची प्रकृती तर फारच खालावली वैद्यबुवा येईपर्यत त्या दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला. त्या मुलांचे मातापिता आक्रोश करत होते. मोहिनीला तर काय चालले आहे हे समजत नव्हते. इतक्यात सावकार आपल्या माणसांसह आला व त्याने संगितले की, मोहिनीला मासिकधर्म सुरू आहे तरिही तीन स्वयंपाकाला स्पर्श केला. त्यामुळे हे अन्न दूषित झाले व या दोन मुलांचा अंत झाला.
दुर्दैवाने वर्षेश्राध्दच्या वेळेसच तिला मासिकधर्म होता. ती मुहूर्त देखील पुढे मागे करू शकत नव्हती. या काळात तीने कधीही स्वयंपाक किंव्हा पूजेत सहभाग घेतला नाही. सगळे तिच्या सासुने केले. मोहिनी निर्दोष होती. सावकाराने आधिच आपल्या माणसांकडून जेवणात विष टाकले होते त्यामुळे त्या मुलांचे निधन झाले मोहिनी निर्दोष होती पण सावकाराने लोकांना इतके भरवले होते की, तीच कोणी ऐकले नाही व तिलाच दोषी ठरवले. त्या दिवशी पासुन मासिक धर्म आलेल्या स्त्रीने जंगलात जाऊन रहायची ही प्रथा सुरू झाली.मोहिनी अतिशय स्वाभिमानी होती. तिने त्या जंगलातील झोपडीला गळफास लाऊन आपले जीवन संपवले.
महाराज ही कथा विस्ताराने सांगायचा उद्देश इतकाच की, यात सावकाराने षडयंत्र केल्यामुळं त्या दोन बालकांचा अंत झाला. यात मोहिनीच्या मासिकधर्माचा काडीमात्र संबध नाही. सावकाराचे हे षडयंत्र काही वर्षानी त्या मोलकरीणने उघड केले पण तत्पूर्वी ही प्रथा रूढ झाली होती. आणि ती आजपर्यंत सुरू आहे. खरतर ग्रामस्थांना देखील ही खरी कथा माहिती आहे.तरीही या प्रथेला विरोध करण्याची हिंमत झाली नाही.यात आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आजपर्यंत सुमारे बावीस स्त्रियांचे बळी त्या झोपडीत गेलेत त्यांत पंधरा लहान बालिकांचा समावेश आहे .कारण एकदा की स्त्री त्या झोपडीत गेली की कितीही त्रास झाला तरी तिला घरी आणले जात नाही किंव्हा उपचार केले जात नाही महाराज
बालाजी पुन्हा पंचाकडे वळला व त्याने मासिकधर्मात स्त्रीने स्वयंपाक खाल्ला की, अपचन किंव्हा उलटी होते. अस सांगणाऱ्या एका पंचाला विचारले. तुम्हांला हा त्रास कधीपासून होतो? जेव्हा पासुन मला समजायला लागले तेव्हपासून पंच उत्तरला यांवर बालाजीने पुन्हा त्याला विचारले तुम्ही सलग चारपाच दिवस उपवास केलाय का? त्यांवर नाही अस उत्तर आले.मग तुम्ही मोठे कसे झालात? कारण तुमच्या जन्मानंतर तुम्ही एक दोन वर्षे तरी आईचे दूध पिले असेल. मग त्यावेळेस तर तुमच्या आईला किती तरी वेळा मासिकधर्म आला असेल मग त्यावेळेस ते दूध तुम्हांला कस काय पचल? बालाजीच्या या प्रश्नावर सगळी सभा शांत झाली. त्या पंचाने देखील मान खाली घातली. कारण बालाजीच्या या प्रश्नात तथ्य होते.
महाराज अस काही होत नाही हा केवळ आपल्या मनाचा समज आहे. आणि त्यामुळेच आपण मन बनवतो की, आपल्याला हे अन्न पचणार नाही. कारण असे असते तर हे अन्न स्वतः त्या स्त्रीला देखील पचले नसते.
महाराज खरंतर या तिघांना ही प्रथा मोडल्या बद्दल शिक्षा देण्या ऐवजी आपण मोठ बक्षिस दिल पाहिजे अस मला वाटते. जुन्या परंपरा जोपासना करणे ही चांगली गोष्ट असली तरी अश्या चुकीच्या अघोरी प्रथा जपणे हे देखील चुकीचे आहे. बालाजीच्या या बोलण्याने काही दरबारी विचारात पडले तर काहींना आश्चर्य वाटले. म्हणून बालाजीने अजुन विस्तारपूर्वक संगितले.महाराज ही प्रथा आपल्या राज्यांत फक्त शबरीग्राम या गावातच आहे. ही प्रथा जर चांगली आणि बरोबर असती तर ही प्रथा आपल्या संपुर्ण राज्यांत असती. मी तर म्हणतो संपुर्ण भारतवर्षात असती. म्हणून ही प्रथा चुकीची आहे हे स्पष्ट होते.
महाराज मासिकधर्म येणे ही स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे. कारण ज्या स्त्रीला मासिकधर्म येतो म्हणजे ती गर्भवती राहु शकते. जर तिला मासिकधर्म आला नसता तर आज या धरती वर कोणाचाही जन्म झाला नसता. मासिकधर्म हे स्त्रीला मिळालेले वरदान आहे. म्हणून या काळात त्यांना वेगळी वागणूक न देता त्यांना नेहमीप्रमाणे वागणूक मिळवी व त्यांचा सन्मान राखावा.
आजपर्यंत या अमानुष प्रथे मुळे बावीस स्त्रियांचे बळी गेले आहेत. ही अशीच सुरू राहिली तर आणखी बळी जातच राहतील. त्यामुळे ही प्रथा बंद करुन स्त्रीजातीचा सन्मान राखावा अशी मी आपणांस विनंती करतो महाराज. बालाजीच्या या मागणीने दरबारातील उपस्थित महिलांनी बालाजी जयजयकार केला.
महाराजांनी बालाजीचे संपुर्ण कथन ऐकल्या नंतर निकाल दिला .या प्रथेबद्दल शबरी ग्रामस्थांमध्ये अनेक चुकीचे गैरसमज आहेत.आज बालाजीने या प्रथेचा अचूक उलगडा केला. या प्रथेमुळे या गावांतील स्त्रियांवर अन्याय होतो हे सिध्द होते. त्यामुळे शबरीग्राम येथील ही प्रथा कायमची बंद करण्याचा आदेश दिला जात आहे त्याच बरोबर या प्रकरणातील आरोपी ती मुलगी व तिचे आईवडील यांची निर्दोष मुक्तता करुन या अमानुष प्रथा मोडल्या बद्दल त्यांचा योग्य तो सत्कार करण्याचा आदेश देत आहोत. निर्णय ऐकताच सर्व दरबाराने राजा सूर्यदेवाचा जयघोष केला यात तेथे उपस्थित स्त्रियांचा आवाज मोठा होता.
त्या तिघांनीही महाराजांचे मनःपूर्वक आभार मानले. बालाजीच्या जवळ जाऊन त्या निरागस आंधळ्या गौरीने बालाजीला स्पर्श करुन त्याला बालाजीमामा अशी हाक मारुन आलिंगन दिले.
दरबारातील जयघोष थांबउन महाराजांनी आणखी एक घोषणा केली की, आजपासून आम्ही बालाजीची राज्याचा प्रमुख सल्लागार म्हणुन नियुक्ती करतो आहोत त्याच बरोबर या घटनेची आठवण व गौरीचा सन्मान म्हणुन आजपासून बालाजीचे बालाजीमामा असे नामकरण करत आहोत. यानंतर सगळेजण बालाजीला बालाजीमामा याच नावाने हाक मारतील व ओळखतील..पुन्हा एकदा दरबार महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला....

(सदर कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील नावे व स्थळे देखिल काल्पनिक आहेत...काही समानता असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

- चंद्रकांत घाटाळ
- 7350131480
0