पाल्य ते पालक

Parents Love

पाल्य ते पालक प्रवासातले

आम्ही नवखे जेव्हा जेव्हा मुलांकडे पाहून मनातल्या मनात खुश होतो..

तेव्हा आई बाबा नव्याने किंमत कळते तुमची....

आजारपणात रात्र रात्र उशाशी

बसून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो

आपलं लेकरू कधी बर होणार या

काळजीत झुरतो

तेव्हा आई बाबा नव्याने किंमत कळते तुमची....

लेकरू जेव्हा एखाद्या गोष्टीचा हट्ट करतो

आवाक्या बाहेर असत तरी देण्या साठी धडपडतो

तेव्हा आई बाबा नव्याने किंमत कळते तुमची.....

मुलांचं करता करता तुम्ही देखील असच

किंबहुना यापेक्षा खूप काही केलंय याची

जाणिव होते

तेव्हा आईबाबा नव्याने किंमत कळते तुमची.....

सुंदर अश्श्या या नात्यात कधी चढाओढ नाही, स्वार्थ नाही,जेव्हा असे निःस्वार्थी प्रेमाच नातं जगते

तेव्हा आई बाबा नव्याने किंमत कळते तुमची....

निसर्ग नियमा ने वृक्ष नेहमी ऊन वारा पाऊस,

पासून सावलीत वाढणाऱ्या रोपट्याची

जिवापली कडे काळजी घेतो

तेव्हा आई बाबा पुन्हा एकदा नव्याने किंमत कळते तुमची....

- प्रियंका योगेश  पाटील