पातळ भाजी भाग 44
अरे वहिनी तुम्ही इथे.?? तुम्ही इथे कश्या काय..?"
कोण असेल हा डॉक्टर आणि काय असेल मेधाचे आणि त्यांचे नाते..? त्यांची ओळख कशी कुठली.?
सगळे बोलता बोलता थांबले आणि डॉक्टर येताच मेधा पासून लांब उभे राहिले..
काकू आत होती ती डॉक्टर आले म्हणून बाहेर आली ,स्वयंपाक घरात तिने फिक्या सांज्याची प्लेट भरून ठेवली होती ,आणि हात धावून बाहेर नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली..
"देऊ का मेधु तुला खायला थोडे..?" हळूच बोलली
"नको अग आई थांब थोडे..मग बघू पण तू ये ना बाहेर बघ कोण आले ते.."
"हो डॉक्टर आलेत " काकू
"हे फक्त डॉक्टर नाहीत ग ते खास डॉक्टर आहेत.." मेधा काकुला सांगत होती
तेव्हाच बाबा ही म्हणाले ,"अग डॉक्टर आणि मेधा एकमेकांना ओळखतात बरं.. त्यांची जुनी ओळख आहे.."
रोहित आणि दादा ने लगेच त्यांना खुर्ची दिली तोपर्यंत ते सोफ्यावर बसले होते..त्यांनी पाणी आणून दिले...तशी डॉक्टर ताईच्या ओळखीचे आहेत ,पण कुठली ओळख असावी हा विचार करत उभी वीणा डॉक्टर चा चेहरा वारंवार बघत होती...कोण असावा हा ?? शाळेतला की कॉलेजमध्ये असावा...की ट्युशन मध्ये असावा..?
"वीणा जा जरा छान चहा ठेव डॉक्टरांसाठी.." आई
"चहाचे काही नाही मी वहिनीला आधी तपासून घेतो..मला घाई ही आहे थोडी.." डॉक्टर
"प्राची काय कर जरा पोहे कर .." सासू
"वहिनी पोहे ,पोहे करायचे आहेत बरं जमतील ना ??" वीणा हळूच म्हणत होती..
प्राची तिच्या कडे बघून म्हणाली ,"ते जमतात मला..पण डॉक्टरांना पोहे जमतील का तुम्ही विचारा वीणा ताई...हम्मम" प्राचीला कळले की वीणा टोमणा मारत आहे..
"बरं आता तपासून झाले आहे थोडे दिवस आराम करू द्या वहिनीला...मग ok वाटेल..." डॉक्टर
सगळे बघत होते हा डॉक्टर वहिनी म्हणत आहे म्हणजे नक्कीच तिच्या सासरच्या नात्यातील असावा असा अंदाज लावत होते पण अजून ही मेधाने ओळख सांगितली नाही..
"मेधा सांग ना आता त्यांची तुझी ओळख नाते कुठले आहे ते..?" रोहित लगेच म्हणाला त्याला जाणून घ्यायची घाई होती,
रोहित जो गेस करत होता आक्का बाईन यांनी वीणा साठी सुचवलेले डॉक्टर चे ते ते स्थळ हे ह्या डॉक्टरांचे तर नाही ना..! ते असेल तर विणाला लग्न करायला तयार करायला हरकत नाही.. मुलगा मस्तच आहे दिसायला ही आणि बोलायला ही..आणि आपल्याच शहरात असेल...मोठा डॉक्टर आहे म्हणजे घराचा वैद्य होईल...विणीला समजावून सांगावे लागेल...जमतंय तर हातचे सोडू नकोस..
"सांग त्यांची तुझी ओळख कुठली..?" वीणा
तिला अजून ही वाटत होते हा आमच्या कॉलेज मधला असेल आणि आता डॉक्टर झाला असेल
मग म्हणत तो ताईला वहिनी का म्हणेन...मग हा जिजूचा मित्र असेल का ?? काय हे कळत नाही
मग म्हणत तो ताईला वहिनी का म्हणेन...मग हा जिजूचा मित्र असेल का ?? काय हे कळत नाही
"सांगावे पंडित मॅडम हे कोण आहे.." वीणा इशाऱ्याने विचारत होती
"मेधा आणि मी जवळचे नातेवाई आहोत " डॉक्टर विणाकडे बघून म्हणाले त्यांना कळले की विणा खूप खोदून खोदून मेधाला इशारे करून हळूच विचारत होती..
त्यांनाच रहावले गेले नाही ,विणाची उत्सुकता जास्त ताणून ठेवणे योग्य नाही नाहीतर ही patient ला नुसता त्रास देऊन सोडेन..
"हो वीणा हे डॉक्टर हर्ष आहेत बरं.."
"इतकीच ओळख आहे का यांची..पण वहिनी कोणत्या नात्याने म्हणत आहे ते ही सांग.." वीणा
सगळे विणाकडे डोळे मोठे करून गप्प बसायला सांगत होते ,रोहित ने तिच्या हाताचा चिमटा घेतला..ती ओरडली
मग पुन्हा हर्ष पुढे येऊन म्हणाले ,"त्यांच्या सासूबाई त्यांच्या भावाचा मी मुलगा ,वहिनीच्या सासूबाई माझ्या आत्या लागतात..मी ह्यांच्या आहोंचा भाऊ...मग ह्या नात्याने त्या माझ्या वहिनी ..अजून जास्त त्या सांगतील पण आधी त्यांना आराम करू द्या.." तो रागात पण गोड बोलून विणाला म्हणाला
सगळे जरा आता हे नाते कसे जाणून घेतल्यावर पर्वा ज्या स्थळा बद्दल आक्का म्हणत होत्या तो डॉक्टर हर्ष हा हे समजून चुकले होते..
"तर हा तो आक्का बाईंचे मोठा डॉक्टर हर्ष..ज्याला मी नको नको म्हणून टाळले..हा तर भारीच राजबिंडा दिसतो..मी आता हो म्हणू शकते का विचारते अक्का आत्याला..? मला आज दोन गुड news मिळतील हे माझ्या राशी भविष्यात सांगितले होते...पहिले प्रेम आणि तो.."
वीणा त्याच्या कडे बघत होती ,मेधा तिच्या कडे बघत होती..मेधाला कालच सासूबाई म्हणत होत्या वीणा साठी हर्षचे स्थळ करायला काय कमीपणा वाटतो तुझ्या माहेरच्यांना...मुलगी चांगली आहे ,मुलगा योग्य आहे..तो एकाच शहरात आहे..तेव्हा नाही कळले पण आता मेधाला कळले..सासूबाई ने हे मात्र अगदी योग्य ओळखले होते..
"मग काय वीणा आत जाऊन कांदे पोहे आणि चहा तूच घेऊन येशील ,तसे ही प्राचीला कुठे काय जमते पोहे.." मेधा हळूच हसत म्हणाली
आता डॉक्टर कडे विणाच्या आणि त्यांच्या लग्नाचा विषय कसा काढला जाईल ,कोण ह्या विषयाला हात घालेन..कोणाची हिम्मत होईल त्यांना वीणा सोबत लग्न करावे म्हणायची..
डॉक्टरला काही लिंक लागेल का ह्या कांदे पोह्याची बघू तर पुढे काय होते.. वीणा मन जिंकेल काय डॉक्टर चे इथे..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा