Login

पातळ भाजी भाग 41

पातळ
पातळ भाजी भाग 41


मेधाला काकूंच्या स्वभावाचे आणि त्यांच्या तिच्यासोबत तुटक वागण्यामागचे सत्य कळले होते..

तिला काकू आणि वीणा ह्यांच्या गप्पा काय चालू म्हणून सहज गेली होती ,त्यात अरविंद ही अमेरिकेत जाणार याचे जितके दुःख तिला झाले होते तितकेच दुःख आता काकुला ही झालेच असेल आणि म्हणून तिला वाटले काकूच्या सोबत जाऊन तिला समजावून सांगावे..तर तेव्हा काकू आपली चूक कबूल करत होती..


तिने ते ऐकताच तिला चक्कर आल्या सारखी झाली पण ती सावरली आणि त्यात वेळी रागात असलेली मेधा काकुकडे जाब विचारण्यासाठी तशीच उभी राहील ,सगळा राग अनावर होत होता..

वीणा तिला सावरण्यासाठी उठली ,"मेधा ताई आता तू काहीच नको बोलू प्लिज..! ही वेळ नाही ग..!! आईने चूक केली ,खूप मोठी चूक केली..मान्य केली तिने तिची चूक..पण म्हणून तू स्वतःच्या जीवावर बेतेल असा त्रास करून घेऊ नकोस प्लिज..!! सगळे ऐकतील.. लोक काही ही विचार करतील !! तू हवे तर नंतर राग काढ..!"



ती म्हणाली,"नाही आता तर मला काही ही होऊ दे ,आता तर मी स्वतःला काही होऊ देत नसते..जोपर्यंत मी खरे के ,खोटे काय जाणून घेत नाही ,मी आता काकू समोरून हलणार नाही ,त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्या शिवाय मी ही सासरी जाणार नाही..मी आईच्या पोटी जन्म घेतला असेल तर ,आणि माझी काही एक चूक असेल नसेल तरी मी ह्या घरात पुन्हा येणार नाही.." मेधा चवताळून बोलत होती


ती अजून काही बोलणार इतक्यात ती चक्कर येऊन पडली..तिला काही सूद राहिली नाही ,तिचा bp लो झाला होता ,तिने स्वतःला खूप त्रास करून घेतला होता .

"मी मी बघते तुम्ही पाणी आणा ,डॉक्टर ला बोलवा.." वीणा घाबरत बोलत होती

तिला काही सुचत नव्हते ,ती आजूबाजूला बघत होती पण इतक्यात इथे दादा आणि रोहित होते ते नव्हते ,तिने लगेच प्राचीला हाक मारली..

"वहिनीssss वहिनीsss प्लिज पळत ये ,धावत ये ,दादाला बोलवा, रोहित ला बोलवा इथे मेधा ताई चक्कर येऊन पडली आहे ,bp लो झाला आहे बहुतेक..." वीणा

इडे काकू ही घामा घुम झाली होती ,ती थरथरत होती ,तिने आलेल्या बायकांना घरी जायला सांगितले...

सगळ्या बायका घरी गेल्या ,जातांना एकीने रोहितला घरी जायला सांगितले ,दादा ही धावत पळत घरी आला होता ,प्राचीने पाणी आणले ,रोहितला डॉक्टरांचा फोन घेऊन फोन लावायला सांगितला ,तोच बाबा bp ची मशीन घेऊन आले होते त्यांनी प्राची कडे मशीन दिले ,विणाने मशीन घेऊन मेधाचा bp मोजला...तोच जसे वाटले तसेच झाले ,bp लो झाला होता...तिला अजून ही शुद्ध आली नव्हती..

प्राचीने तिच्या मैत्रिणीला फोन करून emergency ambulence पाठयला लावली..तिने आणि विणाने मेधाला उठवायचे प्रयत्न केले ,त्यात रोहित आणि दादाने लगेच मिळून हात लावत तिला सोफ्यावर झोपवले..

तितक्यात दोघे भाऊ लगेच ambulence ला कॉल करून पत्ता सांगत होते..

प्राचीने सांगितलेली ambulence ही येता येत नव्हती..तितक्यात रोहित ने फोन करून बोलवलेली ambulence निघाली होती..

रोहित आता मेधाचा हात हातात घेऊन चोळू लागला होता ,अरविंद ही त्रास होता ,त्याला कळत नव्हते तिच्या नवऱ्याला काय सांगावे..आता सांगावे की नंतर...

"अरविंद अहो भाऊजींना फोन करा ते हवेत इथे."

"मी लगेच कळतो ते येतील.."

"मी काय म्हणते जरा थोडा वेळ थांबुया घाई करून ते पळपळत येतील ,रस्ता ही खराब आहे..डॉक्टर येतील ते तपासतील मग फोन कर हवं तर...." बाबा धीर देत म्हणाले

वीणा आणि प्राची त्यानं खूप काळजी वाटत होती मेधा ताईने टेन्शन घेतले पण ही वेळ नाही कसले ही टेन्शन घेण्याची हे दोघींना ही कळत होते..

"मेधा ताईने टेन्शन घेतले नक्कीच.."

"हो मेधा ताईने टेन्शन घेतले हो वहिनी.."

प्राची विणाकडे बघत राहिली ,तिला कळले नाही वीणा कोणत्या टेन्शन ची बात करत आहेत.

"कसले टेन्शन असेल त्यांना..?"

"खूप खूप टेन्शन घेते ती ,आता नवीन टेन्शन घेतले हो ,म्हणजे साहजिक ते येणारच कोणाला ही जेव्हा ती आपल्या आई सोबत कोणी इतके वाईट वागले हे ऐकून टेन्शन काय असे bp लो होऊन पडेलच ग..."

"पण कोण वागले वाईट काकू सोबत..?" रोहित

"आपलीच आई काकू सोबत खूप वाईट वागत होती ,त्यात आपल्या समोर तिलाच वाईट ठरवत होती ,त्याची कबुली खुद आईने आज माझ्या समोर दिली...आणि नेमके तेच मेधा ताईने ऐकले आणि तिला कळले की आई सोबत वाईट वागली ठीक पण त्याचा राग तिच्यावर ही काढत होती आई.."


रोहित आणि प्राची ही हे ऐकून हलल्या सारखे झाले ,खरंच होते की आई मेधा सोबत वाईट वागत होतीच हे कितीदा घरच्यांनी स्वतः पाहिले होते ,अनुभवले होते..आणि जेव्हा जेव्हा घरचे मेधाची बाजू घेत काकूंच्या स्वभातील चांगुलपणावर बोलत तेव्हा तेव्हा आई चिडत आणि ती वाईट कशी आणि मी चांगली कशी हे घरच्यांच्या मनावर बिंबवत..

"हे तर कठीण आहे ऐकायला " रोहित

"मग विचार कर मेधा ताईला काय वाटले असेल."

हे ऐकताच आईला भीती वाटू लागली तिचे हृदय आता दबावाखाली येत होते ,तिला जरा श्वास घेता येत नव्हता..आपलेच सत्य सांगून आपण आपल्याच माणसांच्या नजेरतून पडणार..आपली अव्हेलना होणार..नवरा तर खूप बोलणार..रोहित ज्याला काहीच माहीत नाही तो बोलणार , प्राचीच्या नजरेतून मी पडणार..वीणा तर फटकळ आहे तिला ही खरे कळल्यावर ती ही बोलणार..

"मला कसे तरी होत आहे ,मला श्वास घेता येत नाही ग..मी कोपऱ्यात बसते.."

असे म्हणते आईला दरारून घाम फुटला होता..सगळ्यांचे लक्ष फक्त मेधा कडे होते.. आई जणू अपराधी ठरली होती..

आता काय होणार काही ही कळत नव्हते...

आई निपचित बसून मेधा कडे बघत होती..हा प्रकार तिला सहन होत नव्हता.. सगळाच दोष तिचा होता ,तिच्यावर येणार होता...मेधा ही पाहुण्यांची जबाबदारी होती ,त्यांनी जाब विचारल्यावर आपण काय सांगणार हे विचार आईच्या मनात येत होते..

क्रमशः

🎭 Series Post

View all