परीक्षा..

परीक्षा..


Motivational Lines..


आजकाल सहज ब्रेकिंग न्युजमध्ये तरुण मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना ऐकायला मिळतात.. आणि त्याच स्क्रीनवर खाली 18 - 19 वर्षांचे तरुण शहीद झाल्याची बातमी फ्लॅश होते.. दुर्दैवाने वरची ब्रेकिंग न्युज आपल्या मनाचा ताबा घेते आणि खालची न्यूज फक्त नजरेखालून घालवली जाते.. त्यामुळे निराश मनाने आणखी कुणीतरी आत्महत्या करतं.. नावं फक्त बदलतात..

आयुष्य संपवायचा विचार करण्याआधी एकदा ही स्क्रीन डोळ्यासमोर आणा.. आणि स्वतःलाच विचारा.. की आपण काय म्हणून या वयात आयुष्य संपवतोय.. तिकडे तो माझ्यापेक्षा वयाने लहान असणारा पण कर्तृत्व सिद्ध करून मायभूमीच्या रक्षणासाठी हसत हसत आपला प्राण देतोय.. त्याच्यात आणि आपल्यात किती तो फरक.. कुठे मी जों या आयुष्यातल्या क्षुल्लक घडामोडीना कंटाळून आत्महत्या करतोय आणि कुठे तो वीरजवान, जों मौजमजा करायच्या वयात देशासाठी प्राण समर्पित करतोय.. आणि आपण पैसे कमी पडतायत, नोकरीं नाही, सुख नाही म्हणून आयुष्य संपवायचा विचार करतोय.. किती चूकीचं आहे हे, हे तुमचं तुम्हालाच कळेल..


हेही दिवस सरतील,
तुझेही दिवस येतील


मैफिल रंगतेय
तुझ्या आप्तस्वकीयांची
म्हणून निराशेने
गाठोडी बांधू नकोस
तुझ्या स्वप्नांची..


धीर धर जरा
तुझी मैफिल जरा जास्त
खुलणार आहे..
कारण त्या दिवसासाठी
आताचा प्रत्येक दिवस तू
वेगवेगळी अग्नीपरीक्षा देणार
आहेस..