प्रिय पंकज,
काय ओ कसे आहात...सगळ ठिक ना शिपवर.सहज वाटलं तुम्हाला पत्र लिहावं म्हणून लिहिते.बघाना किती छान वाटतंय हे अस पत्र लिहिताना.ते जुन्या काळातल्या पिक्चर सारख.त्यावेळेस लव्हबर्ड असेच पत्र लिहायचे ना.अरे हो आता आठवलं तो पिक्चर नाही का"मेंने प्यार किया" त्यात असच ती हिरोईन पत्र लिहुन हिरो ला पाठवते ना.हा हा हा हा .किती छान ना.पण माझं पत्र पोहोचेल का ओ तुमच्या परेनंतर.तुम्ही तिकडे सात समुद्रा पलीकडे मी इथे मुंबई मध्ये.खुप आठवण येते ओ तुमची.तुम्हाला आठवत.आपल नवीन लग्न झालं तेव्हा तुम्ही असेच मला एका महिन्यात सोडुन शिप वर गेलात. एअरपोर्ट वर तुम्ही निघताना किती हंगामा केलेला मी.अजुनही आठवल तरी हसायला येत काय करणार नवीन होतेना मी.इकडे आपल्या जॉईंट फॅमिली मध्ये कस ऍडजस्ट करायच काहीच कळत नव्हत.नवीनच लग्न त्यात घरात आठ माणस. अगदी टेन्शन आलेल मला.पण खर सांगु सगळ्यानी खुप सांभाळुन घेतल मला.आणि आजही सांभाळुन घेतात.बर मला सांगा तिकडे पाण्यात सारख राहवुन राहवुन कंटाळा नाही येत का तुम्हाला म्हणजे पाण्यात एवढी मोठी जहाज सारखी हलत राहतेना म्हणुन विचारलं
पंकज खर सांगु खुप आठवण येते तुमची मला.आपल्या घरात माझी मोठी जाऊबई आणि दीर आहेत. ते कसे एकत्र राहतात.तसच मला पण वाटत एकत्र रहावस पण काय करणार तुमचा जॉब असा आहे की नऊ महिने परदेशात आणि दोन महिने घरात काय करणार उपायच नाही त्याच्यावर.तुम्हाला सांगु जेव्हा तुम्ही येणार ना तेव्हा मी तुमच्याकडुन माझे सगळे हट्ट पुरवुन घेणार.नाहीतरी मी माझी विश लिस्ट बनवलीच आहे.आहे का नाही मज्जा आणि हो मी हे खरं सांगते कळलं.आपल नवीन लग्न झाल तेव्हा तुम्ही मला एका महिन्यात सोडुन तुमच्या कामावर गेलात आणि मला चांगलच लक्षात आहे तुम्ही सासुबाईना आवर्जुन सांगितल सोनलच्या वाढदिवसाला तिला अंगठी बनव. मी इकडे नाहीये पण माझ्याकडुन तिला भेट.पण माहितीये मी नाही बनवली कारण मला अस वाटत होतं की ती तुम्ही स्वतः बनवावी आणि माझ्या हातात घालावी.आणि तुम्ही तेच केल.तुम्ही जेव्हा आलात तेव्हा मला आणि जावेसाठी छान गोल्ड रिंग बनवली.खुप आनंद झालेला मला तेव्हा.पण पंकज अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या मिसिंग आहेत आपल्या .जस की पहिली वटपौर्णिमा, पहिला दिवाळी सण, नवीन वर्षे, पण मी ते सगळ लिहुन ठेवलं आहे एका डायरीमध्ये म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मी त्यावेळेस सेलिब्रेट करेल.अशा खुप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपण कधी एकत्र अनुभवल्या नाही.तुम्ही तिकडे मी इकडे खुप रडु यायच मला.आपल्या घरात जावं आणि दीर कसे एकत्र सगळ्या गोष्टी आनंदाने सेलिब्रेट करायचे त्यांना बघुन कधी कधी माझ्या पण मनात यायच तुम्ही असता तर आपण पण एकत्र हसत खेळत आनंद घेतला असता.तुम्हाला सांगु पंकज मी मला कुठे कुठे फिरायला जायचय ते सगळ एका डायरीमध्ये लिहुन ठेवल आहे ज्याने करून विसरायला नको.खर सांगु कधी कधी सगळे घरात असुन सुद्धा खुप एकट एकट वाटत.सतत डोक्यात तुमच्या बद्दलचे विचार चालु असतात.आपल्याला दोन छान मुली देवाने दिल्या पण त्यांच्यासाठी मला आई आणि बाबा ह्या दोघांची भुमिका साकारावी लागते.काय करणार त्या बिचाऱ्या पण कधी कधी विचारतात डॅडी कधी येणार मम्मा.काय उत्तर देऊ तेच कळत नाही कारण उद्या त्यांच फ्युचर चांगल व्हाव म्हणुन तुम्ही आम्हाला सोडुन एवढ्या लांब जातात.पंकज तुम्ही काळजी नका करू तुम्ही जरी इकडे नसलात तरी मी मुलांना आपल्या दोघांच प्रेम देत जाईल. माझी एवढीच इच्छा आहे तुम्ही कायम आमच्या सोबत असावे.जमल तर लवकर तुम्ही तुमच फ्युचर इकडे इंडिया मध्ये सेटल करा.आणि हो लक्ष्यात ठेवा मी बरेच प्लॅन आपल्या डायरी मध्ये लिहुन ठेवलेत नक्की पुर्ण करा .ठिके ......असेच आनंदी रहा खुश रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
तुमची सोनाली
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा