पडलंय मला सपान गो.. स्वरचित लोकगीत कोळीगीत

पडलंय मला सपान गो.. स्वरचित लोकगीत कोळीगीत

पडलंय मला सपान गो

हो सपान गो 

चिकना म्हावरा  ??

जाल्यात गावलाय ह्यो                || 2 ||


नाखवा व्हरी तू वल्हव वल्हव
हो वल्हव वल्हव
या निळ्या दर्याची सफर घडव


अरे एक दोन तीन चार
कोलीवाऱ्याची पोरं हुशार


भीत नाय वाऱ्यापावसाला
हो पावसाला
हा कोलीदादा
हो कोलीदादा
दर्याराजा पावला कोल्यांच्या नवसाला


आन रे होरी आता किनाऱ्याला
हो किनाऱ्याला
म्हावरा ताजा तळून
देते तुला खावाला


उठ गो पोरी
दिस वर आयला
म्हावरा इकाया जायचा तुला
हा जायचा तुला


डोले उघडल्यावर न्हाई तिथं समिंदर
हो समिंदर
वाट बघतोय माजी बंदर


पडलंय मला सपान गो
हो सपान गो
चिकना म्हावरा ??
जाल्यात गावलाय ह्यो


( किनारा या शब्दावरून कोळीगीत लिहावं असं वाटलं म्हणून लिहिलं.. पहिलाच प्रयत्न कोळीभाषेत लिहिण्याचा आणि तेही कोळीगीत ??.. काही चुकलं असेल तर माफ करा आणि गाणं एन्जॉय करा.. )