नैराश्य....एक अवघड वाट...

Depression is a big subject and we should speak out. It will definitely help yourself and Society to overcome the worst scenario.

नैराश्य…एक अवघड वाट…
कुठून सुरवात करावी तेच कळत नव्हतं. नैराश्य हा खरं तर खुप मोठा विषय आहे. पण तो सहजासहजी दिसून येत नाही हाच त्याचा खुप मोठा धोका आहे. स्वत:लाच कळायला जिकडे वेळ लागतो की तुम्ही नैराश्यात आहात तिथे दुस-यांकडून काय अपेक्षा करणार. या नैराश्याची मीदेखिल एकेकाळी शिकार होते. पुन्हा त्याच आठवणी जागवणं खरं तर खुप त्रासदायक आहे. परंतु यामुळे जर एखाद्याला त्याच्या नैराश्यातून  निघण्याचा मार्ग मिळत असेल तर काय हरकत आहे स्वत:चा अनुभव share करायला.
ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा मी नुकतीच दहावी पास होऊन नविन कॉलेजमध्ये जायला सुरवात केली होती. कॉलेज आणि घर हा प्रवास सोपा नसल्याने होस्टेल वर राहण्याचा निर्णय घेतला. डिप्लोमाला admission घेतली होती जिथे 6 महिन्यांचे सेमिस्टर असायचं. आणि 1 वर्ष practical work experience घ्यायचा. तर सुरवातीचे 6 महिने चांगले गेले. माझा result देखिल चांगला लागला. परंतु दुस-या semester पासून मला काहितरी कमी वाटू लागलं.
एकतर मराठी माध्यमातून आल्यामुळे इंग्रजी समजत नव्हती. त्यात अवघड विषय. कितीही समजण्याचा प्रयत्न केला तरी समजायचं नाही. आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये दहावी पर्यंत चांगले मार्क्स मिळाले की त्या मुलाला/मुलीला एकदम हुशार मुलांच्या category मध्ये बसवून ठेवलं जातं. असं नाही की ती मुलं हुशार नसतात. पण college आणि शाळा या दोन खुप भिन्न गोष्टी आहेत. कॉलेजची सवय व्हायला आणि तिथलं वातवरण पचनी पडायला ब-याच जणांना वेळ लागतो. तर मी याच गटातले होते.
मला सुरवातीपासूनंच काहितरी कला जोपासावी असे वाटायचे. त्यामुळे college हे या सगळ्यासाठी उत्तम माध्यम आहे असा मला खुप आधीपासून विश्वास होता. शिवाय मी स्वप्न अशी बघितली होती की college म्हणजे असं काहितरी जिथे खुपसारे मित्र मैत्रिणी भेटतात, कलागुणांना त्यांच्यासोबत वाव मिळतो. भरपुर भटकणं, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं आणि मिळून अभ्यास करणं. परंतु प्रत्यक्षात यापैकी काहीही घडलं नव्हतं. ज्या वर्गमित्रांच्या/वर्गमैत्रिणींच्या मी संपर्कात आले त्यांचा कलागुणांशी दूरदूरपर्यंत संबंध नसायचा. शिवाय अभ्यासासाठी सगळ्यांचे गट ठरलेले. ते वयंच तसं होतं जेव्हा मला वाटायचं की कोणीतरी हक्काचं मित्र/मैत्रिण नेहमी सोबत असावी. माझी ती स्वप्न काही प्रत्यक्षात येत नव्हती.
यात भर म्हणजे मला college च होस्टेल मिळालं नाही. त्यामुळे मला private होस्टेलवर राहावे लागले. जिथे माझ्या वयाला साजेल असं कोणीही नव्हतं. शिवाय सुरवातीला मी बुजरी होते. बिनधास्त मुलींसोबत adjust करणं जमायचं नाही. आणि यामुळेच मी एकटी पडत गेले. एकटेपणा हे नैराश्याला मिळालेलं खतपाणी आहे. मला कोणाशी कसं communiate करावं हे कळतंच नव्हतं. 
याच दरम्यान मी college च्या नाटकात भाग घेतला. Rehersal आणि प्रत्यक्ष नाटक या दोन अवर्णनीय क्षणांव्यतिरीक्त दुसरे चांगले क्षण खुप कमी आठवतात. 
यानंतर internship साठी एक वर्ष कंपनीत जावं  लागलं. जो worst अनुभव यासाठी होता कारण मी होस्टेल ते कंपनी travel करायचे. या वेळेस गेल्या काही वर्षात ज्या 1-2 चांगल्या मैत्रिणी भेटल्या होत्या त्यांच्याशी संपर्क कमी होऊ लागला. आधीच indusry experience म्हणून मला काही येत नव्हतं. त्यात काय वागायचं, कसं बोलायचं हे देखिल समजायचं नाही. थोडक्यात काय तर माझा माझ्या विचारांवर control नव्हता. मी आतून दु:खी होते. रडत होते. याकाळात आलेलं एकटेपण खुप केविलवाणं होतं. मार्क्स कमी पडत होते ते वेगळेच.
आता काहीजण म्हणतील की यात काय मोठंसं? शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं. माझे निर्णय ही कदाचित चुकले असतीलंच. पण म्हणतात ना तो एक काळ असा असतो की तुमच्या हातात ब-याच गोष्टी नसतात.
तरीदेखिल कुठेतरी चांगले hopes किंवा आशेचा किरण असतोच. माझ्या मनात कुठेतरी आशेचा किरण होता. भलेही जगाच्या व्यावहारिक गोष्टींमध्ये मी कमी पडत होते. पण मी बोलायला शिकले…स्वत:च्या मनातलं. काही खास व्यक्तिंना. जे माझ्या आयुष्यात खुप महत्त्वाच्या होत्या आणि आहेत. माझी आई, बहिण, best  friend या सगळयांना मी वेळोवेळी मनातलं सांगितलं. ज्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना माझा त्रास कमी झाला. मला moral support मिळत गेला. त्याचाच फायदा म्हणून स्वत:मध्ये improvement करण्याचा मी प्रयत्न केला. आजही करते आहे. आणि भविष्यातही करेन.