नैराश्य आणि त्यावर केलेली वेळेने मात

Its for while

अमेय खूप सुस्वभावी मुलगा ..शिक्षण झाले होते,मोठ्या कंपनीत कामाला होता.. पगारसुद्धा चांगलाच होता ..दिसायलाही चार चौघात उठून दिसेल असाच ...आई वडील आणि मोठा भाऊ,वहिनी असा परिवार...तीस वर्षाचा होता...आता घरच्यांनी  त्यालाही स्थळ बघायचे सुरू केले..मेट्रोमोनि site वर त्याचे नाव नोंदवले.. त्याला स्थळ छान चालून येत होती..

एक दिवस एका मुलीच्या वडिलांचा फोन आला..अमेय त्यांना आवडला..त्यांनी  मुलीला  पाहायला  बोलावलं .. सायली नाव होतं तिचं.. दिसायला अगदी बाहुलीसारखी... गोरीपान... शिक्षण झाले होते.. तीसुद्धा नोकरी करत  होती.अमेयला ती पाहताच खूप आवडली आणि तिलाही.. फर्स्ट साईट लव..दोघ एकांतात बोलले..एकमेकांच्या आवडीनिवडी विचारल्या,अपेक्षा विचारल्या... दोघांची मन आणि विचार जुळले.

दुसऱ्या दिवशी अमेयने मुलगी पसंत आहे कळवले...सायलीच्या घरच्यांकडूनही  होकार आला..सायली आणि तिच्या आई वडीलांना घर पहायला बोलावलं होतं....अमेय वाट पाहत होता..त्याने छान सजावट केली होती घराची.पहिल्यांदाच सायली घरी  येणार होती..म्हणून तो आतुर झाला होता.सतत आरश्यात स्वतःला न्याहाळत होता...त्याने सायलीसाठी छान गिफ्ट घेतले होते..खुपचं खुश होता आज..तोच त्याचा मोठा भाऊ आला...आणि त्याने सांगितले.. सायली आणि तिचे आई वडील नाही येणार आहे...नकार आहे त्याचा.हे ऐकून अमेय नाराज झाला..नकार का दिला??काय कारण होते???

अमेयच्या लहान बहिणीने पळून जाऊन आंतर जातीय विवाह  केला होता हे कळले होते.. हेच कारण होते.. अमेयला वाईट वाटले.. बहिणीने लग्न केले म्हणून आज त्याला आवडणाऱ्या मुलीला गमवावे लागले..त्याची काहीच चूक न्हवती, त्याला नकार द्यावा असे काही न्हवते...

तो क्षण त्याला कमजोर बनवून गेला..सतत उदास राहू लागला.. त्याला आता मुली बघायला जायची भीती वाटू लागली.आपलं लग्न कधीच होणार नाही असे वाटू लागले.. तो सतत डिप्रेशन मध्ये राहू लागला.. सतत विचारात.. त्यात नातेवाईक, शेजारी, मित्रसुद्धा लग्नाचा विषय काढायचे.. आवडली का कोणती मुलगी???लग्न कधी??
त्यांना सामोरे जाताना त्याला घाबरल्या सारखे व्हायला लागले.. आता नकारात्मकता आली त्याच्यात.. तो गपगप राहू लागला, घरात कोणाशीही बोलत न्हवता.. सतत विचारात, त्याचं वजन घटले होते..हळू हळू डोक्यावरची केस जाऊ लागले... डोळे खोल गेले..त्याने जिमला जाणे सोडले... शिकार झाला होता डिप्रेशनचा..एकेकाळी हसत मुखत राहणारा, सर्वांना हसवणारा अमेय नेहमी राडवलेला चेहरा घेऊन राहू लागला... घरच्यांना खूप टेंशन येऊ लागले.. जेवनसुद्धा नीट करत न्हवता.. मित्रांमध्ये जाणे सोडले..सुट्टी असली की रूममध्ये एकटाच बसायचा...रात्रीची झोप गेली..त्याच्या पाठून त्याच्या मित्रांची ,लहान आतेभावाच लग्न जमलं... आणि झालंही...

त्याला फार असहाय वाटत होतं..स्वतःला प्रश्न विचारायचा माझ्यात काय दोष ????मला का नाही कोणी पसंत करत..

थोडे दिवस सरले.. एक छान स्थळ आणलं त्याच्या मामानी..छाया नाव होते मुलीचे.. Ma.झालं होतं...दिसयलाही नाकी डोळी नीट...अमेय तिला पहायला गेला...त्याला आवडली ती.दोघ एकमेकांशी बोलले.. अमेयने स्वतःचा पगार, इतर डिटेल सांगितले आणि खासकरून बहिणीचा प्रेम विवाह स्वतःच सांगितला.छायाला अमेयचं बोलणं ,खरेपणा आवडला ..ती त्या क्षणी प्रेमात पडली त्याच्या.....

घरी आल्यावर अमेयने आशा सोडली...त्याला वाटत होतं नेहमीप्रमाणे  नकार येईल..सवय झाली होती नकार पचवायची.

दुसऱ्यादिवशी अमेयला अनोळखी नंबरवरून कॉल आला..त्याने उचलला ,तो छायाचा नंबर होता...छाया त्याला बोलली ,काल मला बोलता नाही आलं..तुमच्या वाहिनीकडून नंबर घेतला...अमेय मला तुम्ही खूप आवडला,मी अश्याच मुलाच्या शोधात होती ,जो सच्चा असेल.जो स्वतःची सर्व माहिती मोकळ्या मनाने देईल,आणि तुम्ही तसेच आहात..लग्न कराल का माझ्याशी... ??

हे ऐकताच अमेय सुखावला.. त्याला विश्वास बसत न्हवता, की छाया सारखी गोड मुलगी स्वतःहुन लग्नासाठी मागणी घालते आहे....त्याने होकार दिला.त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते..


किती दिवस झाले तो नैराश्याच्या गर्तेत होता.. त्या एका घटनेमुळे.. पण आज छायाच्या एका फोनमुळे ,तो पुन्हा होता तसे सुंदर जगू लागला...

छाया आणि अमेयचं लग्न झालं.. दोघांच्या सुखी संसाराला सुरवात झाली....अमेय पुन्हा तेच आयुष्य मनमुरादपणे जगू लागला.....


खूपदा असेच होते, नकार पचवणं कठीण होते.. मनासारखे  होतं नाही तेव्हा माणूस निराश होतो..स्वतःला हरवून बसतो पण एक वेळ निघून गेली की माणूस  नकार पचवायला शिकतो ,त्याला सामोरे जातो धाडसाने ..तेव्हा आयुष्य सुखकारक होते.. फक्त वेळ यावी लागते.. नैराश्यावर सहज मात करता येते..

©®अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास नक्की लाईक, कंमेंट आणी नावासहीत शेअर करा????
मला फॉलो करायला विसरू नका...