नियती - एक भयकथा - भाग 20

Horror

नियती 
भाग 20
दोघे घरात गेलो..तसतर सगळं शांतच वाटत होतं ..घरात गेलोंतर जनाक्का आली तिने दरवाजातच थांबायला सांगितलं आणि भाकरी पाणी घेऊन आली ..आम्हा दोघांवरून उतरवून बाहेर फेकून दिली आणि नेहमीप्रमाणे माझ्या तोंडावरन हात फिरवून बोट मोडली ..मुक्ती बघतच बसली होती, जनाक्काने हसत तिच्यापण तोंडावरून हात फिरवला आणि डोक्यावर हात ठेवून बोट मोडली 
जनाक्का : बयौ केवढी ग नजर लागली व्हती तुला ...निगुण गेली बग समदी .. आन लय मायेची हायस बग तू ..अस बोलताच मुक्ती लाजून लाल लाल झाली होती ..मी तिच्याकडे बघत उगाचच हसत होतो ..ते जनाक्काच्या लक्षात आलं,घरात गेल्याबरोबर दोघांनी फ्रेश होऊन ती दिलेली अंगाऱ्याची पुडी देवासमोर ठेवली ..हातात हात घेऊन दोघे माजघरात गेले..जनाक्काने गरम गरम जेवायला दिल ...जेवताना जनाक्का आईच्या मायेने वाढत होत्या ,बोलत होत्या ..मुक्तीचे डोळे आनंदाश्रूनी अगदी दुथडी भरून वाहत होते ..तिच्याकडे माझं लक्ष गेलं मी खुणेनेच काय झालं विचारलं , तस तिनी खाली मान घालत थोडं लाजत काही नाही म्हणत मान नकारात हलवली 
जनाक्का : काय ग पोरी तिखट लागलं काय ग ? 
मुक्ती : न न नाही  .तिखट नाही ...खूप सुंदर झालाय स्वयंपाक... मस्त वाटलं जेवताना 
जनाक्का : मंग डोळ्यात पाणी कशापायी ते?
मुक्ती : तुमचं प्रेम पाहून मन भरून आलं हो ..बाकी काही नाही..
जनाक्काने तिचे वयाने सुरकूतलेले आणि काम करून खरबुडीत झालेले हात मायेने मुक्तीच्या गालावरून फिरवले पण ते मुक्तीला अगदी मलमलीसम भासले ..
जेऊन आम्ही बेडरूममध्ये आलो ..आम्हाला माहीत होतच मंदाकिनी जवळपासच असणार आहे हे ...
मी :चल झोप ग आता . 
मुक्ती : अस काय हो करता आपलं नवीन लग्न झालय ना .मग घ्या न मला मिठीत तुमच्या ..करा न तुमच्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर ..का तुमचं प्रेम फक्त त्या भूतीन बाईवर ..मघाशी गुरुजी बोलले ना तुम्ही फसवलं तिला
मी : चल मी फसवलं बिसवल नाही तिला..तिचं माझ्या गळ्यात पडली ..आणि अस स्वतः कोणी सगळं सोपत असेल मला तर मी का सोडू .. तरुणपणात व्हायचंच अस..मी हे बोलताच खिडक्यांचे दरवाजे जोरजोरात आपटू लागले..आमचा पलंग जोर जोरात हलु लागला..हा तिचा राग होता हे मला समजलं ..मग तिला चिडवायला मी बोललो: हे बघ परत तीच नाव घ्यायचं नाही ..काय ग तिची लायकी . आणि तुला काय मला मारून टाकायचं काय? जवळ या म्हणतेस ..आज गुरुजींनी काय सांगितलं विसरलीस वाटत.?
मुक्ती : नाही विसरले ..पण त्या भीतीने आपण किती वर्षे लाम्ब रहायचं? आम्ही नाही जा ...
मी : बर बाई..झोप आता ..आपण विचार करू याबर
मुक्ती : नाही मी नाही झोपू देणार तुम्हाला.. प्लिज ना ..घ्याना जवळ मला..
मी : आग बाई तू का माझा जीव घ्यायच्या मागे लागली आहेस? आग गुरुजींनी सांगितलेला उपाय न करता जवळ आलो तर तू किंवा मी वर जाणार ...गप झोप आता 
मंदाकीनीने विचार केला यातला एक गेला तरी माझाच फायदा आहे ..जर मुक्ती गेली तर मी पुन्हा माझ्या शरीरात प्रवेश करून ह्याला माझा बनवून ठेवेन आणि जर हा गेला तर मग मी त्याला भूत बनवून माझ्या जवळ ठेऊन घेईन पण त्यासाठी हे दोघे जवळ यायलाच हवेत आज ..ती कसली पूजा करायच्या आत ..मग तिने तिचे खेळ चालू केले ...माझ्या कानात ती कुजबुजू लागली ...मध्येच मला असा भास होऊ लागला की मुक्ती माझ्या अगदी जवळ आली आहे ...आणि काय झालं कोणास ठाऊक तिच्या त्या तयार केलेल्या भसांमुळे , मला आणि मुक्तीला त्यादिवशी स्वतःवर संयम राहिला नाही आणि आम्ही एक झालो ...मंदाकिनी खुप खुश झाली.. ती जोरजोरात हसू लागली ...आता तुम्हाला कोणीच नाही वाचवू शकत ..जे व्हायचं ते झालं आता तुमच्यापैकी एक जण जाणार आणि ...आणि ..माझी ईच्छा पूर्ण होणार..
मी आणि मुक्ती पण जोरजोरात हसू लागलो ..आता मात्र ती गोंधळली.. हे काय तुम्ही का हसताय मुर्खांनो?, जे नको ते झालं ...मी खूप खुश आहे आता लवकरच हा संपत माझा होणार ..आणि ती एकदम भयानक हसू लागली 
आम्ही दोघे आजूनच जास्त हसू लागलो ..अग हिच्या पत्रिकेत खरतर दोष नव्हताच .. आज आम्हाला गुरुजींनी सांगितलं ...मुक्तीच्या वडिलांना मुलगी झाली याचा खूप राग आला होता ..ते तिला कधीच प्रेम देत नव्हते सतत हाड हाड करायचे ...मुक्तीची आई या मुळे खूप रडायची तिला वाईट वाटत असे ..ती गुरुजींना शरण गेली ...गुरुजी काहीतरी करा माझ्या पोरींचे हाल मला पाहवत नाहीत ...मुक्ती 4 वर्षाची असताना तिचा भाऊ मुकेश चा जन्म झाला ..तिचे वडील खूप खुश झाले होते ...ते आता तर मुक्तीकडे बघत पण नव्हते..
अशातच 15 वर्षे निघून गेली तिचे वडील तर तीच तोंड पण बघत नसत ...अशातच एका सावकाराला ती खूप आवडली त्याने खूप मोठी रक्कम देऊन मुक्तीसोबत लग्न व्हावं अशी ईच्छा तिच्या वडिलांकडे व्यक्त केली ..असपण त्यांचा व्यवसाय थोडा घटयात चालू होता त्यामुळे त्यांनी लगेचच होकार दिला ...मग मात्र मुक्तीच्या आईने गुरुदेवांना साकडं घातलं ...मुक्तीच्या वडीलांचा गुरुजींवर खूप विश्वास होता ..नाईलाजाने त्यांनी खोटंच सांगितलं की लग्न झालं तर ही किंवा हीचा नवरा लगेचच मृत्यूमुखी पडेल ...आणि तुमची सर्व संपत्ती पण व्यर्थ होईल ..खूप नुकसान होणार तुमचं ..आधीच तू तिला खूप दुःख दिल आहेस ...आता तर प्रकोपच होईल ...बाकी तुझी मर्जी 
गुरुजींच्या या बोलण्यामुळे तिचे वडील घाबरले त्यांनी लग्न मोडलं ..पण जेव्हा लग्न ठरवायला आले होते तेव्हाच त्या सावकाराने लाखोंची संपत्ती त्यांना दिली होती ..आज रात्रीच त्यांनी सावकाराला निरोप पाठवला ..माफ करा हे लग्न होऊ शकत नाही मी तुमचा ऐवज उद्या सकाळी पाठवून देतो ...त्या सावकाराला कोणीच आगा पिछा नव्हता ...त्याच रात्री सावकाराला देवाज्ञा झाली ..आणि सर्व संपत्ती मुक्तीच्या वडिलांकडेच राहिली ..
इतके दिवस हडतुड करणारे मुक्तीचे वडील अचानक तिच्यावर खूप प्रेम करू लागले ...त्यांनी गुरुजींना उपाय विचारला की माझी मुलगी आयुष्यभर अशीच बिन लग्नाची राहणार का? तेव्हा गुरुजींनी त्यांना सांगितलं होतं ..लग्न झालं की जवळीक होण्यापूर्वी त्यांना माझ्याकडे पाठव मी करेन योग्य तो उपाय ..आणि हीच लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करायचं नाहीस ..ही जितकी खुश राहील तितकाच तू  पण सुखी राहशील ..कधी दुखवू नकोस हिला ..
ज्यादिवशी मी हिला बघायला गेलो त्याच्या आदल्याच दिवशी मुक्ती 18 वर्षाची झाली आहे ..उलट आज तूच आम्हाला जवळ आणायला मदत केलीस ...तुरे खूप खूप उपकार झाले बघ ..आणि आता तर तू आम्हाला कधीच वेगळे करू शकणार नाहीस ..गुरुदेवांनी आम्हाला दिलेला अंगारा तुला नेहमीच आमच्यापासून दूर ठेवेल ...
आतांमात्र मंदाकिनी खूपच चवताळून गेलीं ..ती जोरात ओरडली नीच माणसा ..मला फसवलस ..आता बघ तू मी काय करते ते ...नाही सोडणार तुम्हाला कोणालाच मी ..त्या म्हाताऱ्या गुरुजीची पण वाट लावते बघत रहा तू ...आणि ती तिथून निघून गेली ...आम्ही दोघे निश्चिन्त मनाने एकमेकांच्या कुशीत झोपलो ...आता खात्री वाटत होती ती आमचं काहीही वाकड करू शकणार नाही ..
पण नियतीने भलतंच काही मांडून ठेवलं होतं समोर आमच्या
©पूनम पिंगळे 
क्रमशः

🎭 Series Post

View all