नात्यांची फाळणी

घरात चार माणस असो वा दोन माणस कामे ही करावीच लागतात.

    लेखाच्या नावावरूनच तुम्हाला विषय समजला असेलच.नात्यांची फाळणी म्हणजेच विभक्त कुंटुंब होय. पिढ्यांपिढ्यानी कमवलेली अमाप संपत्ती असल्यावर नविन पिढीला आपला राजा राणीचा संसार करावासा वाटतो.पण घरातील वयस्कर मंडळीला ते मान्य नसते.कारण सुरुवातीला आपल्या मुलासुनेला ते सोपे वाटत असले तरी पुढील काळात त्यांना आपली गरज लागेल यांची त्यांना सगळी कल्पना असते.

      घरात त्या कारणाने सततचे भांडण होत असतात.सुनेच्या मते तिला प्रत्येक गोष्ट घरातील मोठ्यांना विचारून करावी लागते.आपल्या कामावर सतत त्यांचा डोळा असतो. आपण मनाप्रमाणे घरात काहीच करू शकत नाही. याचे तिला कंटाळा येतो. ती आपल्या नवर्याला विभक्त होणे कस योग्य आहे ते पटवून देते. तो मग आपल्या बायकोचे ऐकुन भाड्याच्या घरात राहायला मान्यता देतो.एका झटक्या तो आपल्या आईवडिलाचे कष्ट,लाड,अपेक्षा,प्रेम सगळ पायी तुडवून विभक्त होऊन जातो.

      मग सुरू होतो राजा राणी संसार...! "चार दिन की चांदणी है फिर अंधेरी रात है" या वाक्याचा प्रत्यय त्यांना एका महिन्यातच येतो.

     सासरवाडीतील दिवस सुनेला आठवु लागतात. सकाळच्या जेवणासाठी दररोज सासरे भाजी आणत असे.परंतु आता तिला स्वतः जाऊन भाजी आणावी लागते. त्या कारणाने तिला नाश्ता बनवायला उशीर होते.परिणामी,उशीर होणार्या नवर्याला नाश्ता न करताच कामावर जावे लागते.सासुबाई घरकामात लहान लहान कामे करून तिला स्वयंपाकाला मदत करत असे.भाजी निवडणे, लसुण सोलुन देणे, सकाळी लवकर उठुन पाणी भरून ठेवणे,तांदुळ स्वच्छ करून देणे असे एक ना अनेक कामे केल्याने तिचा घरकामाचा भार कमी करत असे. त्या कारणाने तिचे प्रत्येक कामे वेळेत होत असे. विभक्त झाल्यावर तिला ह्या गोष्टीची आठवण होते.

     वर्ष झाल्यावर त्यांना गोड बातमी कळते. हा असा काळ असतो त्यात नविन गरोदर स्त्रिला तिच्या आई किंवा सासुची अत्यंत गरज असते.सगळ्यांच गोष्ट फोनांवर करणे शक्य नसते. काही वेळी सोबत खुप महत्त्वाची असते.एकट्या नवर्याला सगळच कळणे खुप अवघड असते. तो ही हा अनुभव पहिल्यांदाच घेत असतो.ह्या काळात त्यांना आपल्या चुकांची जाणिव होते.

    नऊ महिने नऊ दिवस होऊन एका गोंडस बाळाला जन्म दिल्यावर तिची आई महिन्याभर चांगली काळजी घेऊन तिला नवर्याच्या घरी पाठवुन देते. ह्या काळात तिची चांगलीच कसरत होते. घरकामासोबतच बाळाकडे लक्ष्य देणे अवघड होऊन बसते.जेवणाच्या वेळीस बाळ रडते,शिशु करते किंवा भुख लागते.हे नित्य दिवसाचा क्रम होऊन जातो.नवरा कामावर गेल्यावर तिच्यावर सगळा भार येतो. त्या वेळी तिला वाटते.आपण सासुसासर्या सोबत राहिलो असतो तर हे चित्र आज वेगळे असले असते.

     आजच्या काळात ह्या समस्यावर एक सल्ला देऊशी वाटतो.दोन मजली घर बांधुन आपण एकत्र पण राहु शकतो व विभक्त हि राहु शकतो.आपल्या नात्यांना नेहमी जपूही शकतो.

समाप्त