नातं.. भाग 2 अंतिम भाग

नात्याची वेगळी परिभाषा सांगणारी कथा..


" काव्या तू???.. अग मूर्ख आहेस का ?? काय केलंस हे??? " :   शाश्वती तिच्यावर जोरात ओरडते.


" चल याला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवंय लवकर.. "   :  शाश्वती


अन्वयला दोघी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात आणि गार्गीपण पाठोपाठ तिथे पोहोचते..


काही दिवसांनी अन्वय थोडा बरा होतो.. तेव्हा तो डॉक्टरांना मला इथे कुणी आणलं असं विचारतो..


" शाश्वती आणि काव्या मॅडमनी.. त्यांनी वेळेत आणलं म्हणून जीव वाचला तुमचा.. "   :  डॉक्टर


तितक्यात शाश्वती आत आली..


" कसा आहेस, अन्वय?? "   :  शाश्वती


" Thank you शाश्वती.. तुझ्यामुळे आज मी जीवंत आहे.. त्यादिवशी रागात म्हणालीस, मला काही फरक पडत नाही, तू असला नसलास तरी..  मग जीव का वाचवलास?? "   :  अन्वय


" मला फरक पडत नसला तरी तुझ्या आईवडिलांना तर पडतोच ना..  आपल्यात फक्त माणुसकीचं नातं आहे, हे कायम लक्षात ठेव.. त्यापेक्षा जास्त काही नाही.. "   :  शाश्वती


शाश्वती बाहेर येते.. तिथे काव्या रडत असते..


" काव्या, अग काय करून बसलीस तू त्यादिवशी हे.. तुझं प्रेम होतं ना त्याच्यावर.. मग का जीवावर उठलीस त्याच्या??? "   :  शाश्वती


" त्याने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही शिवाय सतत कमी लेखलं तुलाही आणि मलाही.. राग अनावर झाला माझा आणि मी.. "   :  काव्या


" शांत हो काव्या.. आत चल.. "   :  शाश्वती


" माझ्यात हिम्मत नाही ग त्याच्या समोर जायची.. "   :  काव्या


" काव्या, मी आहे ना.. चल.. "   :  शाश्वती


" काव्या, ये ना.. "   :  अन्वय


" अन्वय, खरंच सॉरी.. त्यादिवशी रागाच्या भरात मी तुझ्यावर वार केला.. "   :  काव्या


" काव्या, रडू नकोस.. शांत हो.. "   :  अन्वय


" पोलीस आलेत, अन्वयचं स्टेटमेंट घ्यायला "   :  डॉक्टर


" अन्वय, तुम्हाला काही आठवतंय का त्यादिवशी नेमकं काय घडलं??? "   :  इन्स्पेक्टर


" हो सर.. मी बंगल्याच्या बाहेर लॉन मध्ये फिरत होतो.. माझं आणि शाश्वतीचं बोलणं झालं त्यानंतर ती निघून गेली.. मला थोडं चक्करसारखं झालं अचानक.. त्यात तोल जाऊन मी लॉनमधल्या लोखंडी रॉडवर जाऊन पडलो.. पाठीवर पडलो त्यामुळे ते पाठीत घुसलं.. "   :  अन्वय


पोलीस स्टेटमेंट घेऊन निघून गेले..


" अन्वय, तू खोटं का बोललास त्यांच्याशी??? "   :  काव्या


" काव्या, तू त्यादिवशी जे केलंस ते रागाच्या भरात केलंस.. आणि तुला राग येणंही साहजिकच होतं तसं.. मी तुम्हाला दुखावूनही तुम्ही माझा जीव वाचवलात.. मग ते दुखावणं नकळतपणे का असेना.. त्यामुळे शाश्वतीसारखी मैत्रीण कायमची दुरावली माझ्यापासून.. तुम्ही माझा विचार केलात,  मग मी खरं सांगून तुझं आयुष्य कसं बिघडवेन.. "    :  अन्वय


" Thank you.. खरंतर खूप छोटा शब्द आहे हा.. पण तरीही.. "   :  काव्या

" काव्या, ईट्स ओके.. "   :  अन्वय


तात्पर्य असं नाही , पण कधी कधी कळत नकळत आपल्याकडून आपलीच माणसं दुखावली जातात आणि कायमची दुरावतात.. पण समजून घेतलं तर नव्याने जुळतात..

🎭 Series Post

View all