नजर.... भाग दुसरा...

प्रेम म्हणजे प्रेम असतं... Love story......

त्यान वर पाहिलं तेव्हा अनू त्याच्याचकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर नक्कीच काय हा वेंधळटपणा चा भाव त्यानी पूर्ण हेरला अन त्याच त्यालाच हसू आल.तोउठला आणि सरांकडे पाहिलं आज पहिला दिवस म्हणून सोडतिल या आशेने पण कसलं काय त्यांनी तर आजही सोडल नाही.कॉलेजच्या सिनियर मित्रांनी कॉलेजच्या शिक्षकांब्ददल दिलेली माहिती पूर्णपणे खोटी ठरली.
तो अनिरुद्ध. अतिशय मोठ्या घरातील श्रीमंतीत लाडाकोडात वाढलेला देशपांडेंचा एकुलता एक मुलगा. थोडासा बेफिकीर थोडासा मोकळा तितकाचं बोलका अन् एका संस्काराच्या शिदोरीत वाढलेला. घरात आजी आजोबा यांचा प्राण अनिरुद्ध होता. त्याची आई शिक्षिका होती अन् त्याचे वडिल एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होते. आई वडिलांपेक्षा त्याचा जास्त वेळ त्याच्या आजी आजोबांसोबतच जायचा.त्यालाही आजी आजोबांचा जास्त लळा होता. सरांनी थोडं सुनावलं अन् त्याला जागेवर जाऊन बसायला लावल. सरांनी प्रत्येकाला आपापली ओळख करून दयायला संगितली.प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली. अच्छा! अनिरुद्ध आहे तर या वेंधळ्याच नाव अनू स्वराकडे पाहून हसत बोलली. पहिला दिवस असाच गेलां शिक्षकांच्या विद्याथ्यांच्या आणि विषयांच्या ओळखी होण्यात.हळू हळू कॉलेज सुरळित चालू झाल. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बॅचेस पाडण्यात आल्या.अल्फाबेटिकली असल्या कारणाने अनू आणि अनिरुद्ध एकाच बॅचेस मधे आले.स्वराची मात्र बॅच दूसरी झाली.
आज प्रॅक्टिकल चा पहिला दिवस होता. अनू च सकाळी प्रॅक्टिकल होत. आज एकटीच कॉलेजला आली . लॅबमधे आली तिच्या बॅचमधला तिचा पार्टनर मात्र आला नव्हता . तिने तिच काम चालू केल. जवळ जवळ दहा मिनिटे गेल्यानंतर अनिरुद्ध आला.तिच्याजवळ येऊन तिला sorry म्हणून शांतपणे कामाला लागला.ति त्याच्याचकडे पाहत स्वतःशीच बोलली ,अरे !!!!हे वेंधळ आहे काय आपला पार्टनर आता सवय लावून घेतली पाहिजे एकटीनेच प्रक्टिकल पूर्ण करायची.....तसही पहिल्या नजरेतच अनुला हा वेंधळट वाटला होता. असंच प्रॅक्टिकल चालले होते.कायम तो उशिरा यायचा अन् अनू अर्धे प्रॅक्टिकल उरकून राहिलेली असायची. असेच दिवस चालले होते. हे दोघे जास्त बीलायच नाहीत. पण तिच्या नजरेतलT भाव मात्र अनिरुद्धला कळायचा. वेंधळट लेट कमर या गोष्टी जाणवायचा. त्याच्यात काही फरक नाही पडायचा.न बोलताच सारे प्रक्टिकल पूर्ण व्हायचे.

आज स्वराचं प्रक्टिकल सकाळी होत. अन अनूच दुपारी होत. अनू दुपारी जायची तयारी करत होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला आवाज दिला, अनू आज मी तुला तुझ्या कॉलेजमधे सोडतो आज मी दुपारनंतरची सुट्टी घेतली आहे मला बँकेत काही काम आहे आणि तुझ कॉलेज रस्त्यावरच पडत तुला सोडता आणि पुढे जातो. बर!! अनु म्हणाली. बाबांनी तिला कॉलेजमधे सोडल आणि ते पुढील कामासाठी निघून गेले . अनू लॅबमधे आली आणि आपल्या कामाला लागली. एक तास झाला तरी अनिरुद्ध का आला नाही यावरती ती स्वतःशीच पुटपुटली ,तसाही कधी वेळेवर येतो पण आज एवढl उशीर झाला म्हणजे कदाचित येणारच नसेल. त्याच्या सर्व शिक्षकांनाही ही त्याची सवय पाठ झाली होती आणि अभ्यासात ही हुशार असल्या कारणाने कोणी जास्त काही बोलतही नसे. अनूयाच विचारात होती तितक्यात कॉलेजातील एक शिपाई अनुपमा भोसले कोण आहेत विचारत लॅबमधे आला काहीतरी अर्जंट निरोप घेऊन तिची मेत्रिण स्वरा तिची बाहेर वाट पाहत होती. थोडी घामाघून झाली होती थोडी घाबरली होती. अनुने विचारल काय ग या वेळी तू इथे? आज तर लेक्चर नाहीत तुझं प्रक्टिकल सकाळी होत ? तू एवढी घाबरली का आहेस ? काय झालय?
स्वरा हळूच म्हणाली अनू तुझ्या बाबांचा ॲक्सिडेट झालाय. तुझ्या आईला बाबांच्याच फोनवरून कोणी मुलाने माहिती दिली .त्यांना इथल्याच जवळच्या हॉस्पिटल मधे नेण्यात आलय.तुझी आई तिकडेच गेलीये मी तुला न्यायला आलिये.अनुच्या पायाखालची जमिनच सरकली होती......

क्रमशः
(भाग 2)

🎭 Series Post

View all