नक्की करावं तरी काय... भाग 3

स्नेहा जावून क्लास मधे इंटरव्यू देवून आली, तिला लगेच उद्या पासून जॉइन व्हायच होत, तिने फोन करून श्रेयाला सगळं सांगितल,.. खूप छान अभिनंदन तुझं.



नक्की करावं तरी काय... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
........

"स्नेहा तू जॉब शोध तुझ्यासाठी आणि मी आता थोडे दिवस सुट्टी घेऊन घरी थांबणार आहे ,घरच्यांना सांगणार आहे की मी जॉब सोडला , ते बोलतात ना नसेल जमत तर सोड जॉब आता खरच घेते सुट्टी, पेमेंट सुद्धा देणार नाही, ते बोलतात ना काही गरज नाही मी करेन माझ माझ, करू देणार जरा",.. श्रेया

" हो तू असच कर, मी काय करू कुठे जॉब करू ",.. स्नेहा

" पूर्वी तू काय काम करत होती? ",.. श्रेया

" मी टीचर होती ",.. स्नेहा

" मग आता कोचिंग क्लास जॉईन कर ",.. श्रेया

" हो मी तेच करत होती दोन वर्षा पुर्वी, तू नंतर राहुलला पाळण्या घरात ठेव, त्याने तुझे बरेच प्रॉब्लेम सॉल्व होतील, आर्याला ही मी तेच करणार आहे उगीच तुमची मुल आम्ही सांभाळतो नको ",.. स्नेहा

" हो सारख ऐकवतात, राहुल मोठा आहे , आर्या सोबत राहील तिकडे ",.. श्रेया

"मी सांगते तुला उद्या काय होत ते ",.. स्नेहा

श्रेया घरी आली, संदीप अजूनही तिच्यावर चिडून होता,.." श्रेया तू तुझ काम नीट का नाही करत? किचन मधे काही नीट झाक पाक केल नाही, आई करत होती नंतर काम",

"ठीक आहे उद्या पासून नाही होणार अस काही",.. ती लॅपटॉप वर काही तरी करत होती,

" काय आता चाललय श्रेया? झोप आता उद्या परत धावपळ होईल तुझी ", ...संदीप

" मी इ मेल लिहिते आहे ऑफिस मधे , मी राजीनामा देते आहे",.. श्रेया

"काय? तू तर म्हणत होती महत्वाच काम सुरू आहे कंपनीत? मग सोडतील का ते तुला अस? ",.. संदीप

"हो ना म्हणून प्रत्यक्षात न जाता इ मेल करते आहे ",.. श्रेया

काय अस नवीन?..

" तुम्ही म्हणतात ना नेहमी की नसेल जमत तर सोड जाॅब, तर आता मी जॉब सोडते आहे, खरंच जमत नाही मला, खूप धावपळ होते, सासूबाईंना खूप काम पुरत, राहुल कडेही दुर्लक्ष होतं, तुम्हालाही वेगवेगळे पदार्थ करून देता येत नाही, आरामात घरीच राहते मी, जाऊ दे केला इतके वर्ष जॉब, आता नको",..श्रेया

संदीप काहीतरी म्हणत होता, श्रेयाने त्याला हातानेच थांबवलं... " तुम्ही बरोबर बोलता आहेत झेपत नाही तर नाही करायला पाहिजे एवढी धावपळ ",..

"परत एकदा विचार कर श्रेया",.. संदीप

"हो केला आहे मी विचार खाली राहुल गार्डन मध्ये खेळत होता तेव्हाच ठरवलं की फॅमिली साठी वेळ द्यायचा",.. श्रेया

श्रेयाने ईमेल टाकला, पंधरा दिवसाची सुट्टी घेतली आणि मस्तपैकी झोपून घेतलं, कितीही केलं तरी बोलतात त्यापेक्षा न केलेलं बरं, थोडा धडा शिकवू यांना,

स्नेहा ही कपाटात काहीतरी शोधत होती,

" काय शोधते आहे स्नेहा",.. सौरभ

" मी माझे डॉक्युमेंट शोधते आहे",.. स्नेहा

" काय झालं, आता पसारा नको काढूस",.. सौरभ

" पूर्वी मी क्लासमध्ये शिकवण्याचं काम करायची तिथे मी परत एप्लाय करते आहे",.. स्नेहा

"अरे पण कसं जमेल तुला? , दिवसभर आई-बाबांकडे कोण बघणार, आर्याच काय?, नको थोड्या पैशा साठी सगळ्यांची आबाळ ",.. सौरभ

" आई बाबा काही लहान आहेत का? ते राहतील त्यांचे त्यांचे, आणि आता तुम्ही माझ काम पैशात मोजू नका, तसा ही भरपूर आहे तिकडे पेमेंट ",.. स्नेहा

सासुबाई ऐकत होत्या.. " आम्हाला आर्याला सांभाळायला जमणार नाही",

" काही हरकत नाही आणि तिला पाळणाघरात ठेवेल तेच बरं होईल, आधी मी पार्ट टाइम जॉब करायचा विचार होती तर आता फुल टाइम क्लासमध्ये शिकवत जाईन, मी संध्याकाळी येताना आर्याला घेऊन येईल",.. स्नेहा

"अग पण आले गेलेल्याचं कोण करेल ",.. सासुबाई

" संध्याकाळी येणार आहे मी घरी ऑफिसमध्येच नाही बसणार, तेव्हा बघू",.. स्नेहा

" ठरव तू काय करायच ते पण आई बाबांची आबाळ नको
व्हायला ",.. सौरभ

" स्वयंपाक करून जात जाईल मी, तुम्ही घ्याल ना जेवायला हाताने",.. स्नेहा

हो.. सासुबाई

"तुम्हीच म्हणतात ना मी काही करत नाही, माझा वेळ वाया घालवते, तर आता मी करते आहे काही तर माझ्या मधे मधे करू नका, आणि जरा घरात लक्ष देत जा सौरभ आता , भाज्या वगैरे आणत जा, जमल तर लवकर येत जा घरी ",.. स्नेहा

सकाळी श्रेया ती आरामात उठली तिने आज स्वयंपाकाला सुरुवात केली, नाश्त्यालाही उपमा केला,
डबा तयार झाला संदीप आवरून बाहेर आला,.." आज मग आरामात का श्रेया? ",

"हो नाही तर काय धावपळ असते या वेळेत माझी, आज मस्त वाटतय, तुमच्या आवडीची भाजी आहे आज डब्यात ",.. श्रेया

"हा महिना तरी पूर्ण करायचा ना जॉबचा" ,.. संदीप

"जावू द्या आता महिना संपायला दोन तीन दिवस बाकी आहेत, आणि ऑफिस मधे आज मीटिंग आहे तर त्यात पुढचे टार्गेट मिळतील मग जॉब सोडता येणार नाही, त्या पेक्षा आज पासून जात नाही मी " ,.. श्रेया

स्नेहा जावून क्लास मधे इंटरव्यू देवून आली, तिला लगेच उद्या पासून जॉइन व्हायच होत, तिने फोन करून श्रेयाला सगळं सांगितल,.. खूप छान अभिनंदन तुझं.

" तिकडे काय सुरु आहे? ",.. स्नेहा

" आरामात काम सुरू आहे माझ, संदीप विचारताय सारख की का जॉब सोडतेस?",.. श्रेया

दोघी खुश होत्या

स्नेहा तीच घरच आवरत होती सासुबाई फोन वर बोलत होत्या,.. "स्नेहा अग तु कधी पासून जॉईन होतेस? ",

उद्या पासून..

"अग पण मावशी येणार होती चार दिवस रहायला तिची सून घरी नाही तर",.. सासुबाई

"काही हरकत नाही, तुम्ही आहात ना घरात रहा मस्त आरामात",.. स्नेहा

"एवढ कोण करेन तीच दिवसभर, खूप काम पुरत नको मी नाही सांगते तिला",.. सासुबाई

"कशाला तुम्ही करा ना, तुमची बहीण आहे ना ",.. स्नेहा

"तीच खूप पथ्य असत दिवसभर हे कर ते कर असत नको",.. सासुबाई

छान म्हणजे मी होती तर मला राबवून घेत होत्या, स्वतः वर वेळ आली तर नको पाहुणे, मावशी हि कश्या सून नाही घरी तर लगेच इकडे येत होत्या, काहीही करा आता मी काम सोडणार नाही, या नंतर शाळेत जॉब ट्राय करेन.

🎭 Series Post

View all