साहित्य – दूध एक लिटर , कॉर्नफ्लॉवर दोन चमचे, साखर दोन चमचे, साबुदाणा अर्धी वाटी, सब्जा, जेली रेडीमेड पॅकेट
आता गर्मीचा सिझन सुरू झाला आहे त्यामुळे आपल्याला थंड पेय पदार्थ पिण्याची इच्छा निर्माण होते.... दुधापासून बनवलेले मिल्कशेक किंवा आईस्क्रीम तर तुम्ही खूप वेळा ट्राय केलेले असणार पण आपण आज खास गर्मी मधे दुधापासून एक रिफ्रेशिंग सरबत बनवणार आहोत.... हा सरबत तुम्हाला बनवायला ही आवडेल आणि प्यायलाही आवडेल चला तर मग सुरु करूया.....
अर्धी वाटी साबुदाणा आणि सब्जा मी तीन ते चार तास आधीच भिजवून ठेवलेला होता....
आपण एका पातेल्यामध्ये एक लिटर दूध घेऊन ते गरम करण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत.... दुधाला चांगली उकळी आल्यावर गॅस स्लो करायचा....
दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एका वाटीत घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिसळून त्याची घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची.... आता ही बनवलेली पेस्ट आपण उकडलेल्या दुधामध्ये टाकायची आहे टाकताना दूध कंटिन्यूअसली ढवळत राहायचे आहे...... त्यानंतर दुधामध्ये दोन चमचे साखर टाकून दुधाला अजून थोडा वेळ तसेच हलवत राहायचे.....
दूध जरा ठीक वाटू लागल्यावर गॅस बंद करायचा आणि दुधाचे पातेले थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचे..... दूध रूम टेंपरेचर वर थंड झाल्यावर त्याला अजून थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे....
आता एक पसरट अशा कढईमध्ये पाणी ओतून त्यावर स्टँड ठेवून स्टॅंडवर पसरत अशी स्टीलची प्लेट ठेवायची... तिकडे गॅसवर ठेवून गॅस मिडीयम आचेवर चालू करायचा.... त्या प्लेटमध्ये भिजवून ठेवलेला साबुदाणा पसरवून टाकायचा आणि वरून झाकण लावावे.... साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचा आहे... ही प्रोसिजर चालू असतानाच आपल्याला जेलीचे एक रेडिमेड पॅकेट घ्यायचे आहे जे कोणत्याही किराणाच्या दुकानांमध्ये सहज अवेलेबल असते.... त्या पॅकेटवर जेली कशी बनवायची याबद्दल सगळी माहिती ही दिलेली असते...
मी घेतलेल्या पॅकेट प्रमाणे 400 ग्राम पाण्यामध्ये मला हे जेली मिक्स टाकून त्याला गॅसवर मंद आचेवर ठेवून व्यवस्थित ढवळायचे आहे...... दहा मिनिटं त्याला कंटिन्यू हलवल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि ते जेली मिक्स आपण एका पसरत स्टीलच्या काठ असलेल्या ताटामध्ये ओतायचे आहे.... ते रूम टेंपरेचर वरच सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे...
इकडे आपला साबुदाणा ही व्यवस्थित ट्रान्सपरंट असा झाल्यावर गॅस बंद करून ती प्लेट बाहेर काढून परातीत साधे पाणी घेऊन त्या पाण्यात ठेवून द्यायची जेणेकरून तो साबुदाणा आपल्याला व्यवस्थित मोकळा करता येईल... साबुदाणा मोकळा झाल्यावर तो एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचा....
इकडे आपला साबुदाणा ही व्यवस्थित ट्रान्सपरंट असा झाल्यावर गॅस बंद करून ती प्लेट बाहेर काढून परातीत साधे पाणी घेऊन त्या पाण्यात ठेवून द्यायची जेणेकरून तो साबुदाणा आपल्याला व्यवस्थित मोकळा करता येईल... साबुदाणा मोकळा झाल्यावर तो एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचा....
आता फ्रिजमध्ये थंड करायला ठेवलेले दूध बाहेर काढायचे... दुधाला चांगला रबडी सारखा घट्टपणा आलेला दिसून येतो... या दुधामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून त्याला व्यवस्थित हलवायचे आहे..... आता रूम टेंपरेचर वर सेट करायला ठेवलेली चेलीची प्लेट जवळ घेऊन त्यावर चाकूने आपल्याला पाहिजे तशा आकारात बारीक कापून घ्यायची आहे.... ही कापलेली जेली पण दुधामध्ये टाकून हलवून घ्यायचे.... भिजून ठेवलेला सब्जा पण त्याच मिश्रणात टाकून द्यायचा.....
आपल्याला हे सरबत अजून थंड पाहिजे असल्यास त्यात काही बर्फाचे तुकडे ही टाकावे.... आता हा तयार झालेला सरबत एका ग्लासमध्ये ओतून त्याला आपल्या आवडत्या ड्रायफ्रूट्स च्या तुकड्यांनी सजवून घ्यावा.... हाजीअली आणि दूधाने बनवलेला सरबत प्यायलाही खूप छान वाटतो आणि त्यात असलेल्या साबुदाण्यामुळे पोटही भरल्यासारखे वाटते.....
तेव्हा तुम्ही नक्की करून पहा आणि सांगा की , असा दुधापासून बनवलेला सरबत तुम्हाला आवडला का....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा