दिशा स्वप्नांची.... भाग 5

I like to read.....



स्पर्धा

दिशा स्वप्नांची... भाग 5

(कथामालिका)

( सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)



" निघायचं का. बसले का सगळे". अजयने गाडीतून आवाज दिला.

"हो, "सगळे एकदम ओरडले.

आज मुलं खूप उत्साही होती.  आज  पन्हाळा किल्ला बघायला   जायचं म्हणून लवकर तयार झाले होते.

"बाबा, चला न पटकन." रजनी.

"किती घाई,  आपलीच गाडी आहे. जाऊ की आरामात". विरेन

"नाही.  आरामात नाही. बाबा सुरू करा ."

"एव्हढी काय घाई आहे.relax" विरेन

"आमचे इतिहास चे सर म्हणाले की ,तिथे ना 

बघण्यासारखं खूप गोष्टी आणि जागा आहेत .

मला पूर्ण किल्ला बघायचा आहे."रजनी

"ठीक आहे. चला."

तासाभरात पन्हाळगड जवळ आले.सर्वजण गाडीतून खाली उतरले.

"सगळ्यांनी एकत्र राहायचं.   आजचा पूर्ण दिवस इथेच आहोत.  फोन जवळ असु दे. "विरेन

"किती बोलता, चला जाऊया की आता, "म्हणत रजनी  शारदा आतमध्ये गेल्या.

सगळेजण एक एक वास्तू मन लावून पाहत होता.

"सज्जकोठी, अंबरखाना-धान्याचे कोठार, गांधारबावडी-तीन मजली विहीर,

सोमेश्वर मंदिर-सोमाळे तलाव शेजारी.

राजदिंडी,  तीन दरवाजा, बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा,

राजवाडा--महाराणी ताराराणी चा वाडा."

संध्याकाळी  परत हॉटेल वर आले. खूप दमलेले असल्याने  लवकर जेवले आणि झोपून गेले.

सकाळी 10  वाजता नाश्ता करून परतीच्या प्रवासाची सुरुवात झाली. पण आता बसण्याच्या जागा बदलल्या होत्या.

विरेन, तू इथे बसतोस का.   मला जरा  आजी बरोबर बसयाच होत." नंदा

"ठीक आहे," म्हणत विरेन रजनी शेजारी बसला.

ती त्याच्याकडे बघून किंचित हसली.

----------------------

"जेवायचं का?  "अजयने गाडी  एका ढाब्यावर थांबवून विचारलं.

"पण 12 च तर वाजलेत. एव्हढ्या लवकर, मला भूक नाहीये. बाबा नन्तर," रजनी

"12 वाजले म्हणून च आत्ता , समोर ढाबा सारख हॉटेल आहे. नंतर कधी, चल उतर ,आताच जेवायचं आहे, " अमर नि मध्येच तीच बोलणं तोडलं

"जेवण येईपर्यंत 1 वाजेल ,तोपर्यंत भूक लागेल."विरेन

"बरं, ठीक आहे." म्हणत रजनीने मान हलवली.सर्वानी गप्पा मारत जेवण केले. फक्त ती दोघे सोडून.  दोघेही शांतपणे जेवत  होते.

तिला कळत नव्हते, मी ह्याचे कसे काय लगेच ऐकले.

काका , आता मी चालवू का गाडी. विरेन

हो, पण तुझ्या बाबांना विचारले का.अजय

हो, ते हो बोलले. विरेन

पण आता माझा टर्न आहे.  तुम्हाला गाडी चालवत येते का नक्की . रजनी

तू आपल गाव जवळ आला की चालव.  आता चालवू दे त्याला. ठीक आहे.अजय

*****

"बरोबर जमतेय ना, "विरेन ने बाजूला बसलेल्या रजनीला विचारले.

\"हो, खूप छान येते ". रजनी

"आता घरापर्यंत तूच चालव\". म्हणत तिने डोळे बंद केले.

थोड्याच वेळात सगळे घरी आले.

दुपारचं ऊन पडलं होतं.

सर्वजण दमले होते, सगळं सामान  हॉलमध्ये एका कोपऱ्यात ठेवलं. 

आजोबा, सुरेश, अजय हॉलमध्येच पाय पसरून बसले.

रेखाने आत जाऊन चटई आणून दिली. तिघेही तिथेच पडले. आजी, रेखा,नंदा,शारदा  एका खोलीत अराम करायला गेल्या  तर अमर  दुसऱ्या एका रूम मध्ये आराम करायला गेला .  विरेन मात्र तसाच डोकं मागे करूनगाडीत बसून होता.

"पाणी, घ्या." रजनी

"तुला कस कळलं मला तहान लागलीय."  म्हणत त्याने पाणी पिले.

" असंच, कळलं. तुम्ही नेहमीच इतके शांत असता का"

"अस काही नाही, फक्त मी उगाचच वायफळ बडबड नाही करत." म्हणत त्याने रिकामा ग्लास तिच्या हातात दिला.

"म्हणजे मी वायफळ बडबड करते."

" मला तस नव्हतं म्हणायचं.  सॉरी ".  तितक्यात त्याचा फोन वाजला.  तशी ती आत निघून गेली.

रात्रीच जेवण आटपून सगळे अंगणात बोलत बसले होते.

  "आई, उद्याच काय प्लॅनिंग आहे ग, की मैत्रीण भेटली म्हणून मला विसरलीस."

"का ग उद्या काही खास." शारदा

"खूप खास, उद्या आमच्या राजकुमारीचा वाढदिवस आहे.

दरवर्षी तिच्या आवडीचा बेत ,ती म्हणेल तिथे फिरायला जायचं, सगळं तिच्या मनासारखं."अमर

"रजनी,उद्या आपण घरीच छान पार्टी करूया."

"ठीक आहे. आई ,पण मग तू माझ्याबरोबर मंदिरात येशील ना."

"तू जा की एकटी, आता मोठी झालीस ना. "अमर

\"मला एकटीला कंटाळा येतो. कोणी बरोबर असलं की बर शारदा ताई तू येशील.मी तुला माझी शाळा पण दाखवेन."

"ठीक आहे चालेल.  किती वाजता निघुया."

"सकाळी 7 वाजता तयार राहा."

\" काय, एव्हढ्या लवकर  मी नाही येणार. "

\"एक दिवस उठ लवकर". नंदा

"रजनी, उद्या संध्याकाळी जाऊया का ." रेखा

"आई, मी सात वाजता उठायची वेळ आहे. सात वाजता निघायचं म्हणजे उठायचं कितीला."शारदा

\"शारदा, उद्या वाढदिवस आहे तिचा एक दिवस उठ की लवकर.\"विरेन

"मग तू जा ना दादा, तसही तूला पाहाटे उठायची सवय आहे\". शारदा

"ठीक आहे. कोणीच नको मला.  मी संध्याकाळीच जाईन. माझ्या वाढदिवसाला पण कोणाकडे माझ्यासाठी वेळच नाहीये\".रजनी

"ठीक आहे. मी येइन. रडू नकोस.  आई मी झोपायला जातोय. गुड night"  म्हणत विरेन आत गेला.

*******

अंथरुणावर पडून विरेन स्वतःशीच काहीतरी बोलत होता,

तिच्याबरोबर सकाळी देवळात जायचय, एक वेगळीच फीलिंग येतेय.

अस का होतंय , काहीच कळत नाहीये. अस कुठल्याच मुलीकडे बघून कधी वाटलं नाही.हिच्याकडे नुसतं पाहतच राहावंसं वाटत. तिचे ते  मोठेमोठे डोळे, गोबरे गाल,  गोरा रंग ,छोटस नाक आणि छोटेसे लाल ओठ .अस पाहतच राहावंसं  वाटत.  ती जवळ असली की खूप छान फील होत. मला ती आवडते का ? पण अजून लहान आहे. कोणाला कळलं तर,आईबाबा रागावतील.  काकांना काय वाटेल.   आणि तिला काय वाटेल. ?

मला माझ्या भावनांना आवरायला हवं. मित्र तर  खूप आहेत पण मैत्रीण कधी कोणी भेटलीच नाही . माझी पाहिली मैत्रीण. 

******

रजनी तिच्या  बेडवर नुसतीच पडली होती, पंख्याकडे टक लावून बघत विचार करत होती.

बापरे, आता उद्या ह्याच्याबरोबर देवळात जायचय पण  काहीतरी वेगळंच वाटतंय.  मी हो का बोलले.एकतर त्याच्याकडे बघितलं की बघतच राहावंसं वाटत.  तो सावळा रंग, लाल डोळे,   किती उंच आहे , बॉडी पण मस्त आहे, सिल्की केस  कपाळावर येत असतात नुसते.  आणि बोलताना  उजव्या गालावर जी खळी पडते ना तेव्हा तर ..... खूपच क्युट दिसतो.   बापरे काय होतंय नुसता विचार करतेय धकधक होतंय. त्याला कळायला नको, कोणालाच कळायला नको.  मला माझ्या  आयुष्याच्या ध्येयाकडे लक्ष द्यायला हवे.  माझं स्वप्न....



एकमेकांच्या विचारात दोघेही झोपून गेले.



क्रमशः

---/मधुरा महेश

(उशिरा पोस्ट केल्याबद्दल सॉरी,  पण कथेचा भाग कसा वाटला नक्की सांगा. Thank u)


🎭 Series Post

View all