स्पर्धा
दिशा स्वप्नांची... भाग 9
(कथामालिका)
(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
काकू, येते हा मी.म्हणत तिने नन्दा चा निरोप घेतला .
काका, येते हा .ती शारदा ला बाय करतच होती.तोच दरवाज्यातून विरेन मोठ्याने बोलला."निघायचं का."
"हो, निघुया."
******
ती कार मध्ये बसली.तिला सीटबेल्ट लावायला मदत केली ,तर तिने डोळे बंद केले आणि मान दुसऱ्या दिशेला वळवली. त्याने कार सुरू केली. दोन तास होऊन गेले तरी दोघेही गप्पच होते.
"तू माझ्यावर रागवलीस का?"विरेन
"अस का वाटलं,मी का रागवू".रजनी
मी आल्यापासून तु माझ्याकडे पाहिलं पण नाही, नीट बोलली पण नाहीस".विरेन
"बोलते तर आहे की.रजनी
पण बघितलस का माझ्याकडे नीट."
"मला झोप येतेय.प्लिज मी खूप दमली आहे."
"हो का. तू दमली आहेस. मी काय सकाळपासून रिकामा बसलोय."विरेन
"सॉरी, मला तस नव्हतं म्हणायचं'".तिचा आवाज थोडा रडवेला झाला.रजनी
त्याला जाणवलं, त्याने गाडी एका बाजूला घेतली.
"काय झालं, रजनी" म्हणत त्याने हळूच तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरला.तिचा चेहरा पूर्ण उतरला होता. तिचे डोळे त्याला काहीतरी विचारत होते.
रजनी इकडे माझ्याकडे बघ.
"तेव्हा जे सेम टू यु होत. ते आजही आहे.नेहमीच राहणार. का असा चुकीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतेस.
ही तीन वर्षे मी तुझ्याशी जे वागलो .म्हणून तू नाराज आहेस ना.पण ते गरजेचं होतं.नाहीतर तू तुझ्या स्वप्ना पासून दूर गेली असतीस.जे मला नको होतं.थांब ना जरा.
अजून 2 वर्ष.तुझं हे शिकून झालं की मग घरी सांगू. आणि मग तू आणि मी नेहमीच बरोबर असू. ठीक आहे."
"अस असेल तर मग एकदा स्पष्ट बोल की."रजनी
'काय बोलू."विरेन
"काही नाही. एव्हढं बोललास तेच खूप झालं. "रजनी
"निघुया मग, आता डायरेक्ट गावाला." विरेन
त्याची गाडी गावी पोचली. त्यानें गाडी थांबवली.तीच घर दहा मिनिटाच्या अंतरावर होत. रजनी झोपली होती.
तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्याने हळूच केस बाजूला केले.
अजून पण तशीच आहे.खूपच निरागस, शांत.
"I love you."हळूच तिच्या कानात पुटपुटला.
"I love you too वीर "ती झोपेतच बोलली.
"वीर , छान नाव दिलंय."
त्याने कार घराकडे वळवली.
********
तिच्या येण्यानं सगळे खुश झाले होते. दुपारी सगळे जेवायला बसणारच होते.
बाबा, दादा माझा रिझल्ट रजनी ने दोन्ही रिझल्ट त्यांच्या समोर ठेवले .
अजय आणि आजी आजोबा खूपच खुश झाले.रेखा तर आनंदाने रडायलाच लागली.
अमर थोडासा नाराज झाला.पण विरेन ने त्याला समजावलं.
सगळ्यांनी हसत जेवण केलें.
***********
आत येऊ का?विरेन
ये ना
सगळे कुठे गेले.
आजोबा देवळात गेलेत. आजी आणि आई बाजारात गेल्यात. आणि दादा पण बाहेरच गेला आहे आणि बाबा तर तुला माहितीच आहे.तू ये ना
विरेन तिच्या बाजूला च बसला.
विरेन, मला तुला काहीतरी सांगायचंय.
त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला. हा, बोल ना.
अरे मी टेलरिंगचा कोर्स केला ना त्या मॅम ने मला जॉब ऑफर दिली आहे. शनिवार आणि रविवारी टीचर म्हणून.दुपारी 2 ते 6.काय करू.त्यांना न्यू टीचर भेटे पर्यन्त ,तुला काय वाटत.
अरे वाह . चांगलं आहे मग."
हो, सांगू मग."
"मला का विचारते आहेस."
"मग कोणाला विचारू, तूच तर आहेस ज्याने माझ्या
स्वप्नंना योग्य दिशा दाखवली.""
Sorry, रजनी."
"Hmm ठीक आहे. पण कशाबद्दल."
"मी तुला गृहीत धरलं.तुझ्याशी स्पष्ट बोलायला हवं होतं.पण मी असाच आहे.मला असं सहज व्यक्त नाही होता येत. सॉरी
मला तू हवी आहेस,माझ्या आयुष्यात .मी तुला खूप मिस केलं."
"खोटं नको बोलुस. अस असत तर मला भेटायला का नाही आलास."
"सॉरी बोललो न आता" म्हणत तो हळूच तिच्या बाजूला सरकला.आणि तिला अलगद मिठी मारली.
"अरे, काय करतोयस. वीर सोड ना कुणीतरी येईल."
Sorry, एक मिनिट तू काय बोललीस." तो पटकन बाजूला झाला. वीर,
तू मगाशी झोपेत पण वीर बोलत होती. मला आवडलं माझं न्यू नाव .छान आहे. "
आता ति लाजून त्याच्या जवळ सरकली.
सगळे रुसवे ,गैरसमज दूर झाले होते.
********
चार दिवस रेखाने तिचे सगळे लाड पुरवले.सोबत विरेनचे पण.
सोमवारी सकाळी दोघे पण परत मुंबईला निघाले. पण आता ती खूप खुश होती.
एकतर तिने फॅशन डिझायनिंगच्या कोर्स साठी घरून होकार मिळाला, आणि दुसरं विरेन.
"सुरू करू, तू जरा चेहऱ्यावर स्कार्फ घेशील, ऊन लागेल . आणि मेन म्हणजे माझं समोर लक्ष नाही लागणार."
"ठीक आहे."
*********
क्रमशः
----/मधुरा महेश
(कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा, thank you)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा