दिशा स्वप्नांची भाग 7

I like to read


स्पर्धा
कथामालिका
दिशा स्वप्नांची....भाग 7
(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
"काय रे, दादा सेम टू यु कशाबद्दल." शारदा
"अग ती टेक केअर म्हणाली सगळ्यांना ".विरेन ने सारवासारव केली.
रजनी तर हवेतच होती.आपल्याच नादात घर कधी आलं तिला कळलच नाही.
इकडे गाडीत विरेन डोळे बंद करून तिला पाहत होता.
******
अमरचा 12 वि चा निकाल  लागला. फर्स्ट क्लास मध्ये पास झाला होता. त्याने तिथल्याच एक इंजिनिरिंग कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं. Mechanical engineering. साठी.
शारदा चा पण निकाल फर्स्ट क्लास च आला होता. तिने नर्सिंग साठी ऍडमिशन घेतलं.
तर विरेन  सांगितल्या प्रमाणे  2 वर्षासाठी M.B.A.शिकायला पुण्यातील त्यांच्या काकांकडे गेला.
नंतर रजनी सुद्धा 10वि मध्ये 80%मिळवून पास झाली होती. तिने कॉमर्स घेतलं घेतलं होत.
आज रजनीचा कॉलेजमध्ये पहिला दिवस होता. ती तयार होत होती. तिच्या फोनवर एका अननोन नंबर वरून कॉल येत होता.
ती उचलू की नको विचारात होती.
रजनी, अग फोन घे की. कधीपासून वाजतोय."रेखा
हो , घेते म्हणत तिने फोन रिसिव्ही केला
पलीकडून
हॅलो, मॅम हाऊ आर यु?
हॅलो ,कोण बोलतंय. रजनी
टुडे इज युवर फर्स्ट डे ऑफ कॉलेज. Right
हो, तुम्ही कोण बोलतंय.आवाज थोडा ओळखीचा वाटत होता.
तुम्ही, नाही तू ठरलं होतं
विरेन, तू आज आठवण आली माझी.
सॉरी, अग मी थोडा बिझी होतो.पण रोज तुला goodnight मेसेज तर पाठवत होतो ना
उपकारच केलेस .Thank u  .बर काय काम आहे. मला कॉलेज ला उशीर होतोय.
Ok, मी काय सांगतोय नीट ऐक,  हे बघ तू  कॉलेज ला जायला नाराज आहेस ना ,  दादा वर रागवू नकोस.त्याने तुझ चांगलं व्हायला पाहिजे म्हणून बोलतअसेल
ठीक आहे ना .तुला माहितेय ना तुला काय करायचंय. ते अजिबात विसरू नकोस.मस्त अभ्यास कर.  काळजी घे.बाय बोलून त्याने  फोन ठेवला .
तिला काही बोलूनच दिले नाही.
तीच कॉलेज सुरू झालं. ती अगदी मन लावून अभ्यास करत होती. रोज रात्री विरेन चा मेसेज येत होता.
11 वि पास होऊन 12 वि ला गेली.
*******
आज राजनीचा 12वि चा लास्ट पेपर होता. ती खूप खुश होती . आई बोलली होती, ह्यावर्षी सुट्टीत नन्दा काकूंनी मुंबईला बोलावलंय.
आई, आपण कधी जायचं ग नंदा काकूंकडे
का ग एव्हडी घाई झालीय थांब की जरा.जाऊ की, आजच तर परीक्षा संपलीय ना.थोडा आराम कर. बसच तिकीट नको का काढायला. सकाळी बोललीय मी बाबाना, ते येतील आता त्यांनाच विचार.
थोड्यावेळाने अजय घरी आला.
बाबा तिकीट  आणली का.
हो, आपण सर्वांनी जायचय. ही बघ तिकीट आणली
****
आजी, आजोबा,अजय,रेखा ,अमर,रजनी सर्व 2 दिवसांनी मुंबईला निघाले.
रेखा  खूप वर्षांनी आली होती. मुलं आणि आजी,आजोबा पहिल्यांदाच आले होते. अजय मात्र  वर्षातून एकदा येऊन जायचा.
अहो, इकडे कुठे आलो. केवढी मोठी बिल्डिंग आहे.
आपलं घर या बिल्डिंगमध्येच आहे.
त्यांची चाळीच्या जागी आता 10मजली ईमारत उभी होती.
आपलं घर पहिल्या मजल्यावर आहे. आणि सुरेशच दुसऱ्या माळ्यावर . आधी त्याच्याकडे जाऊ नंतर आपल्या घरी येऊ. तसही नन्दा  वहिनीनि सगळी साफसफाई करून ठेवली असेल.
सहा महिन्यांपूर्वी बिल्डिंग बांधली होती. आज ते सगळे एकत्र  पहिल्यांदाच आले होते.
सगळे सुरेशच्या घरी आले.
रजनी  विरेन ला शोधत होती.
काकू, विरेन कुठे आहे.
त्याच्या रूम मध्ये ती बघ समोरची.
ती आयात जायला उठत च होती, तोच बाहेर आला.
काका काकू कसे आहात.  त्याने सर्वांची चौकशी केली.
अजयने त्याच्या घरी गणपती पूजन केलं.
चार दिवसांचा पाहुणचार घेऊन सगळे गावाला घरी परतले  फक्त रजनी तिथेच राहिली. तिला मुंबई फिरायची होती.
चार दिवसात तीच विरेनबरोबर नीट बोलणं झालं नव्हतं.
त्या विषयावर तिला त्याच्याशी बोलायचं होत.
रजनी, आवरलं का तुझं चल  तुला फिरायचय ना.
तुला वेळ आहे का ती नाराजीच्या सुरात बोलली.
  आहे, तुला यायचं की नाही.
तुझा  मुड फ्रेश होईल.तुझ्या कामाचं आहे.
काकू जाऊ मी
हो, जा की. विरेन तिची काळजी घे.
हो आई.
दोघही बाहेर पडले.
*****
क्रमशः
--मधुरा महेश
(कथा कशी वाटली नक्की सांगा)









 

🎭 Series Post

View all