दिशा स्वप्नांची.. भाग 2

ईरा वाचक

 
स्पर्धा
दिशा स्वप्नांची..भाग 2 रा
(कथामालिका) 
(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

   अजय, रेखा आणि त्यांची मुले गावाला व्यवस्थित रुळले होते. मुले आजी आजोबांमध्ये छान रमली होती. 
पाच वर्ष झाली  होती. अजयच्या आईने आणि रेखाने मिळून घराबाजूला छोटासा फुलं आणि भाजीचा  मळा फुलवला होता.
वांगी, टोमॅटो,  दोडका, मिरची, कढीपत्ता, आले,भेंडी,  चहाची पात, अळूची पाने,भोपळा, पालेभाजी,  
फुलांमध्ये पांढरी, गुलाबी लाल जास्वंदी,  शेवंती, मोगरा अबोली, चाफा, अनंत, जोडीला पेरू  चिकूच झाड पण होत.
------
रेखा, अग आरतीच ताट का तयार ठेवलंयस. 
अहो, आई आपल्याकडे नवीन सदस्य येणार आहे.पाच मिनिटांआधी ह्यांचा फोन आला होता.  आरतीच ताट तयार ठेव, आम्ही येतोय.
मूल खूप खुश आहेत. मला पण सकाळी जाताना बोलले.ह्यांना आपल्या सगळ्यांना सरप्राईज  दयायच आहे.
हो का, बर पण  असत काय ते सर  काय.
आई, अहो सरप्राईज म्हणजे  आश्चर्यचकित  करायचंय
बर ठीक आहे. तो बघ रिक्षाचा आवाज आला. अजय आला ,अग पण राणी (रिक्षा) तर अंगणातच आहे.


        आई,बाबा बाहेर या. रेखा आरती घेऊन ये.
 अजयचे आई बाबा बाहेर आले, मागून  रेखाही ताट घेऊन आली.
समीरचा दृश्य बघून आई बाबा  क्षणभर बघतच बसले.
अजय नवीन मोठी रिक्षा घेऊन आला होता.   

एकावेळी 8 लोक बसतील अशी टमटम रिक्षा बाहेर उभी होती.
मुलांनी गाडीतून उडी मारली, आणि आजी जवळ गेली.
आजी, ही बघ बाबांनी न्यू रिक्षा आणली.
रेखाने आरतीचा ताट आजीच्या हातात दिले. आजीने रिक्षाची पूजा केली. आजोबांनी नारळ वाढवला. आजी  आजोबांना खूप आनंद झाला. अजयचे अजून एक स्वप्न पूर्ण झाले होते.दोन वर्षांपासून तो ह्या दिवसाची वाट पाहत होता. सगळे जण नवीन रिक्षात बसले. एक छोटीशी फेरी मारून घरी आले.
 आता राणी च (जुनी साधी रिक्षा)काय ठरवलस. बाबांनी विचारले.
 काही नाही तिला थोडा महिनाभर आराम करू दे.
तितक्यात बाबा बाबा, करत मूल आली.
काय रे काय झालं.
बाबा आपण न्यू रिक्षाच नाव काय ठेवायचं आम्ही आताच ठरवुन आलोय.
अरे वा, आम्हाला सांगा की मग  
अस  नाही, रिक्षाजवळ या. त्याला पण माहिती पाहिजे त्याच नाव. चला सगळ्यांनी या.
सगळे बाहेर आले.
रजनी आणि अमर रिक्षा जवळ गेले.
दादा तू इकडे उभा राहा. मी तिकडे जाते. तू इकडून सांग मी तिकडून .
 सांगू का? दोघांनी एकदम विचारले. 
हो ,सांगा लवकर.
"राजा" दोघही एकदम बोलले. 
राजा, नाव नवीन पाहुण्याच. चला रेखाबाई काहीतरी गोड बनवूया. 
हो आई, गोड बनवायची तयारी करून ठेवलीय.
तुमच्या हातच्या शेंगा.  दुसरं काय.
 खोबरं आणि  गूळ घालून सारण तयार आहे, पीठ पण मळून ठेवलंय.
नेहमीसारखा तुम्ही बनवून दया. मी तळते .
बरं, चल मग.
--------
दोघींनी मिळून स्वयंपाक केला.जेवण तसं साधंच होत.
भात, मसुरची तिखट डाळ,पुरी, वालाच बिरड, कोबीची भजी, पापड, पालेभाजी, आणि  शेंगा.
सर्व  पदार्थ  सगळ्यांचे आवडते होते.
बाबांच वालाच बिरड, आईला मसुरची तिखट डाळ, अजयला शेंगा, अमरची कोबीची भजी, रजनी पालेभाजी, पापड तर रेखाची आवडती पुरी.
 सगळ्यांनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला.
----
बाबा अंगणात शतपावली करत होते.
अजय पण बाहेर अंगणात येऊन बसला.
मगाशी बोलणं अर्धवट राहील. राणीला आराम म्हणजे काय.
बाबा, थोडे दिवस राजाला नेईन  महिनाभर तरी, नंतर ड्रायवर बघू. बाजूच्या गावातल्या मनोहर  ला सांगितलंय.   कोणी असेल तर सांग.
बर झालं. सगळं ठरवलंस ते.
बाबा, तुम्ही रागावलात का मी अस अचानक नवीन रिक्षा  घेतली.
नाही, अजिबात रागावलो नाही.तसही तू मागे एकदा बोलला होतासच की, तुला अजून एक रिक्षा घ्यायची आहे.
 छान वाटलं.   आपल्या मुलांची प्रगती बघणं, हि आईवडिलांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते. 
मला तुमच्या आणि आईच्या चेहऱ्यावरचा अचानक झालेला आनंद बघायचा होता.
तू खुश आहेस ना, असाच मोठा हो.
-------
क्रमशः
--मधुरा महेश.
 (कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा. Thank u)

🎭 Series Post

View all