दशक्रिया

दश क्रियेच्या दिवशी इच्छा पूर्ण


दशक्रिया ( भाग १)


"गिरीजाला जाऊन नऊ दिवस झाले. छे, खरचं वाटत नाहीये. उद्या दहावा तिचा. पिंडाला कावळा शिवेल की नाही कोण जाणे" सदाशिव मनाशीच बोलत होता. "अवघ्या ४८ व्या वर्षी गिरीजा सगळ्यांना सोडून गेली. शशांक अजून जबाबदारी घेण्या एवढा मोठा नाही. शैलीतर आता कुठे २० वर्षांची आहे. कसे होणार सगळे? " सदाशिवला काळजी वाटत होती.

"आप्पा झोप येत नाहीये का? डोक पाय चेपून देऊ का" शशांक.
" नको रे, येईल झोप थोड्यावेळाने, तू झोप. तुला सकाळी लवकर उठायचं आहे ना? " सदाशिव (आप्पा)

विचार करता करता सदाशिवला झोप लागली. " अहो, अहो उठताय ना? " स्वप्नात गिरीजा. " अहो उठा. मला बोलायचे आहे तुमच्याशी. अहो उठा ना , प्लीज. "
" हं, बोला बाईसाहेब. काय आज्ञा आहे? सदाशिव.
" अहो आज्ञा नाही हो, थोडे बोलायचय तुमच्याशी. तुम्ही मला तिचं नाव सांगणार होतात, तुम्ही प्राॅमिस केले होत ना? मग सांगा ना? गिरीजा.
"सांगीन गिरीजा, काय गडबड आहे." सदाशिव
" बघा हं, तुम्ही नेहमी प्रमाणे टाळणार. पण यावेळी मी ऐकणारच नाही. सांगितल्या शिवाय मी सोडणारच नाही तुम्हाला. "गिरीजा.
" बरं बरं, आता शैलीच्या लग्नाच्या बघायला हवं. २२ वर्षांची झाली ती. ते आधी बघू" सदाशिव.
गिरीजा चार अबोला.
"आता कुठे शशांक मार्गी लागतोय. कसतरी एक वर्ष होतयं नोकरीला लागून. शैलीचे झाल्यावर त्याच्याही लग्नाच्या बघायलाच हवं. " सदाशिव.
तरी गिरीजा गप्पच.
" बरं अबोला तर अबोला. आमचीही अबोला. "

तितक्यातच सदाशिव झोपेतून जागा झाला. त्याला काही कळेना. गिरीजाशी स्वप्नात झालेला संवाद त्याला खराच वाटला होता. तो बेचैन झाला. त्याला नंतर झोप येईना. तो गॅलरीत येरझारा घालू लागला. चालता चालता त्याचं विचारचक्र सुरु झाले. ती आणि गिरीजा दोघीही सगळ्यात जास्त जवळच्या. दोघांपैकी कोणीही डाव उजवं नाही. किती आणि काय काय बोलायचं दोघींबद्दल. दोघीही तोडीस तोड. दोघीही निघून गेल्या सोडून. तिच्या जाण्याच तर दुःखही करता आले नाही. का गेल्या सोडून मला दोघीही? काय सांगणार गिरीजाला तिच्याबद्दल. कसं सांगणार. का आल्या त्या दोघी माझ्या आयुष्यात?


काय होईल गिरीजा च्या दहाव्या दिवशी? कोण ती? सदाशिव कसा सांगेल गिरीजाला? पाहुया पुढच्या भागात.

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

🎭 Series Post

View all