दत्तकमुलगी

शोधलं की मार्ग सापडतो.हातावर हात ठेवून बसून काहीच होत नाही.

राधाबाई अत्यंत गरीब कुटुंबातील,त्यांच्यामागोमाग एक बहीण आणि भाऊ ,आई-वडिल असं त्यांच कुटुंब.वडिलांनी १४ व्या वर्षीच त्यांच लग्न लावून दिलं.थोड्या दिवसांतच राधाबाईंचे वडिल वारले.राधाबाईंचे सासरदेखील गरीबचं होत.कमावणारा फक्त त्यांचा नवरा आणि खाणारी तोंड अकरा होती.अशातचं राधाबाई गरोदर राहिल्या.राधाबाई सासरच्यांना व्यवस्थित काही हवं नको त्या बघत होत्या.थोड्या दिवसांनी राधाबाईंना मुलगा झाला.मुलगा चांगला २ वर्षांचा झाला होता.एके दिवशी राधाबाईंच्या नवरयाचा अपघात झाला आणि तो मरण पावला.राधाबाई पुरया कोसळल्या पदरात २ वर्षांच मुल.सगळी जबाबदारी राधाबाईंवर आली.यात त्यांची आणि मुलाची खूप फरफट होत होती.राधाबाई आपल्या मुलाला घेऊन कायमच माहेरी जातात.तिथेसुद्धा वडिल नव्हते ,बहिणीच लग्न झाल होत भाऊ आणि आई हे दोघेच होते घरी.

राधाबाईंनी डब्याचं काम सुरु केले आणि सगळ्यांची जबाबदारी स्वत:वर घेतली.राधाबाईंच्या घराच्या शेजारी एक कुटुंब राहत होत.त्यांना एक मुलगी होती निता.निताला तिची आजी सांभाळायची कारण निताचे आई-वडिल दोघे दवाखान्यात जॉबला होते.निता शाळा सुटली की राधाबाईंकडेच असायची.राधाबाई तिच सगळ करायच्या.त्यामुळे निताच्या आईला निताची अजिबात काळजी नव्हती.कारण निताला अजुन २ भावंडे होती त्यांना सांभाळण्यातच निताच्या आजीचा वेळ निघुन जात होता.थोड्या दिवसांत अस समजल की निताच्या आईला कँन्सर आहे आणि काही दिवसांतच कँन्सरने निताची आई देवाघरी जाते.यामुळे निताचे वडिल गावी राहायला जायचा निर्णय घेतात पण निता गावी जायला तयार नसते.तिला राधाबाईंजवळच राहायचे असते.मग राधाबाई आपल्या भावाला निताला दत्तक घ्यायला सांगतात.तो बहिणीच ऐकतो आणि निताला दत्तक घेतो.निताला दत्तक घेतल्यामुळे राधाबाईंच्या भावाचे लग्न जमत नव्हत.मग राधाबाईंच्या सासरकडची एक गरीब घरची मुलगी त्याच्या बघण्यात असते तिच्याशी भावाचं लग्न त्या लावून देतात. घरातील खाणारी तोंड वाढत असतात.राधाबाई भावाच्या बायकोला हाताशी घेऊन अजून डब्बे वाढवतात.भाऊ कामाला असतो पण पगार खूप कमी असतो.निताला भावाने फक्त दत्तक घेतल होत ते राधाबाईंच्या सांगण्यावरुन पण तिची सगळी जबाबदारी राधाबाईंनी घेतली होती.

यांतच राधाबाईंच्या मुलाच शिक्षण पुर्ण  होतं आणि तो बँकेत नोकरीला लागतो.पगारपण चांगला असतो.बँकेतच त्याला एक मुलगी पसंत पडते,घरातले त्या दोघांच लग्न लावून देतात.राधाबाई त्याला एक वेगळ घर घ्यायला सांगतात आणि तिकडेच त्या दोघांना राहायला सांगतात.मुलगा आपल्यासोबत राधाबाईंना यायला सांगतात पण जायला त्या नकार देतात.त्या मुलाला सांगतात माझ्या वाईट वेळेत माझ्या भावाने मला साथ दिली आता त्याला माझी गरज आहे तेव्हा मी इथेच राहीन.निताचं शिक्षण पण आता पुर्ण होतं.त्यांच्या ओळखीत एक मुलगा असतो , चांगली नोकरी आणि माणसंही खूप चांगली असतात.निताच्या पसंतीने लग्न जमतं.राधाबाई सगळ रीतीने करतात.राधाबाई निताच्या घरच्यांना गावावरुन लग्नासाठी बोलावून घेतात.तिच्या घरचे राधाबाईंना लग्नासाठी काही पैसे देऊ करतात पण त्या एकही रुपया घेत नाहीत.तिचं लग्न व्यवस्थित पार पडत.

अशा बिकट परिस्थितीत नवरा नसताना खचून न जाता त्यांनी सगळ सांभाळलं.आणि शेजारच्या मुलीलाही पोटच्या मुलीसारखं प्रेम दिलं.जगात फक्त वाईटच माणसं नसतात.....राधाबाईंसारखी निर्मळ माणसंही या जगात असतात पालकत्व सांभाळणारी...