थांबू नकोस तू..

अनुवाद कविता..
मूळ रचना कर्ता- हरिवंशराय बच्चन ( भाषा - हिंदी ) 

अनुवादकर्ता - ✨❣️ श्रावणी ❣️✨

शीर्षक - थांबू नकोस तू.. 

हलव धरणी, आभाळात कर गुंजारव 
वाहू दे नदी, कर वाऱ्याचा आर्जव 
विजय तुझा, विजय तुझा
हो ज्योतिसम प्रज्वलित
जाळ भुजा भुजा फड फड
रक्तात असे धड धड

उचल तीर कमान, अन् कर प्रहार 
तूच आधी कर प्रथम वार
अग्निसम कर धग धग 
हरिणीसारखी असे सजग 
 गर्जना कर सिंहासम
 हाक दे शंखासम

थांबू नकोस तू, क्षीण होऊ नकोस तू
वाकू नकोस तू, विराम घेऊ नकोस तू
नेहमी चालत राहा, क्षीण होऊ नकोस तू
थांबू नकोस तू, वाकू नकोस तू

©®
✍️
✨❣️श्रावणी❣️✨