थरार

अेका सत्य घटनेवर आधारीत

..अेका सत्य घटनेवरून

       "पप्पा विंडो सीटचच रिझर्व्हेशन काढलंत ते बरं झालं.आता मस्त मज्जा"आईच्या बाजूला बसलेला अथर्व बोलून गेला.भूकलाडू तहान लाडू सर्व सोबत घेऊन स्वारी निघालेली मामाकडे.त्याची आई त्याला सोडून दुसर्या दिवशी परत येणार होती.मी अेस टि बाहेर ,सिट च्या जवऴ ऊभा राहून ,त्यांना सोडायला आलो होतो.

      "तूम्ही जा...गाडी निघेलच आता.पण अजिबात मामाकडे फोन करून ,आम्ही येतोय..हे सांगू नका.आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचयं."

        पण अगं अंधार असेलं.थोडं पुढे येतील ना तूम्हाला रिसिव्ह करायला सासरेबूवा.ऊगा का रिस्क घेताय.अेकतर स्टाँप पासून तूझं घर म्हणजे जवऴजवऴ पाऊण किमी.त्यात तो सुनसान रस्ता.करून सांग की फोन जवऴ आल्यावर.."
पण ऐकेल ती बायको कसली?( हि सर्वच पुरूषांची शोकांतीका असावी????????)

      आता नाही बोलल्यावर मी काय बोलणार..?
          म्हणे मी लहानाची मोठी त्याच गावात झालेय..बरोबर जाईन...तूमच्या लेकाला काही होऊ देणार नाही.चिंता करू नका.पोहचल्यावर फोन करेन..

     "ठिक आहे म्हणालो"..तेवढ्यात अेस् टि सुटली.मी दोघांनाही बाय बाय केलं नी मी घरि यायला निघालो.

            दिवाळीची सुट्टी लागलेली.नेमका तेंव्हाच आमचा सिझन असतो.मधुरा..अथर्व ला मामाकडे सुट्टीला सोडायला गेली.दोनच दिवसात परत आली असती.आता मी ऊद्याच्या बिजनेसचे प्लँन करत घरि पोहचलो होतो.

      आमची सासूर वाडी ,माणगांव तालूक्यात.श्रीवर्धन रोड वर चांदोरे गाव.निसर्ग संपत्तीने श्रीमंत असलेलं.म्हसळ्या पासून सुमारे १० _ १२ किमी अलिकडे.

      संध्याकाळी सव्वा सहाला अलिबागहून.. सुटलेली लाल परि आता वडखळ पार करून ..मुंबई गोवा हायवे वर लागली होती.अथू कधी आईच्या मांडीवर झोपी गेला कळलेच नाही.

     नागोठणे , कोलाड टाकत गाडीने ईंदापूर जवऴ केलं तेंव्हा रात्रीचे आठ सव्वा आठ झाले होते.मला मधुराने काँल करून अपडेट केलं होतं.जवऴच्या तहान लाडू भूकलाडू वर आता डल्ला पडू लागला होता.अथू ऊठला होता.
      तोच माणगाव ही पंधरा मिनीटांत आलं.ईथे गाडी पाच मिनीटे थांबते.

     चणे शेंगदाणे घेईतोवर,पाच मिनीटे संपली कधी..कळलेच नाही.
   अथू अधिक खूश होऊ लागला होता.त्याच्या मामाचं गाव आता अगदि जवळ आलं होतं.तसा तो नेहमी जायचा मामाकडे. रहायचा..खेळायचा.तिथे त्याचे खूप मित्र होते.
            अप्पा आमचेे सासरे बूवा..गावातील अेक मोठं प्रस्थं.आमची सासूर वाडी ,दूध दूभत्यानी संपन्न.बेड्यात गाय,बैलं ..खुराड्यात कोंबड्या.छान सुबत्तता...त्याला खूप आवडे मामाकडे.गावठि कोंबडीचं मटण,अंडी..काही काही कमी नाही.

      मोर्बा साई जवऴ करत गाडी चांदोरच्या दिशेने लागली.तेंव्हा माझा लास्ट काँल झाला होता.नंतर तिकडे रेंज नसते.ना नेट ना रेंज...मला पोहचल्याचा काँल येई तो ही बड्या मुश्कीलीने.
     घड्याळात आता नऊ दहा झाले होते.एव्हाना हे गाव झोपतं.दिवसभर कष्ट केलेली माणसं ,रात्री जेऊन खाऊन लवकर झोपतात.तसा तो एरिया डोंगरावरचा.आजूबाजूला काही फार प्रमाणात जंगल.अेस टि स्टाँप पासून घर येई तोवर दहा मिनीटे जास्त चालावं लागे.आम्ही यायचं झालो की घरी काँल करत असू.मग कोण ना कोण बँटरि घेऊन पुढे य़ेई पण आज हे दोघे सर्वांना सरप्राईज देणार होते.मी ही म्हंटलं ठिके...करा मनासारखं..
     नऊ वीस ला कंडक्टर साहेबांनी बेल दिली अन् हे दोघं बँगा सावरत खाली ऊतरले.

      आता माझ्याशी संपर्क तूटला होता.स्ट्रिट लाईट होती..तोच अेक आधार असायचा..पण आज तो ही नव्हता..हो..आज रोड लाईट बंद होती.शांत पोरा प्रमाणे तो रोड अंगावर गोधडी घेऊन जणू झोपला होता.यांच्या गाडीचा आवाज जरासा शांततेचा भंग करून गेला तोच.बाकी अेकदम पिन ड्राँप सायलंस..

      आणी सूरू झाला तो अंधार्या रोड वरिल प्रवास.अेक बँग गळ्यात अन् अेका हातात अथूचा अेक हात घेऊन मधुरा घराकडे निघाली.लाल परी केंव्हाच म्हसळा रोड ला लागली होती.अथर्व मोबाईलची बँटरि आँन करून जितका जमेल तितका रोड दाखवत होता.पण त्याचीही बँटरि जेमतेम दोन टक्केच ऊरली होती. 

       दोघेही कमालीचे ऊत्साहीत होते.आता काही वेऴातच मामा , अप्पा..आजी ,लाडकी मावशी गूड्डी..सर्वच त्यांना भेटणार होते.सकाळी मित्र मंडळी होतेच..मीठ्या मारायला.

         थोड्या अंतरावर गेल्यावर ओळखीचे वास येऊ लागले.गाय ,बैल यांच्या शेणाचे वास..मामाकडची ओढ वाढवत होते.

     आता अंतर अर्धे पार झाले होते.रोडवर अंधार होता.हातातील मोबाईलची बँटरि नेमकी संपली होती.तीने ही असहकार पुकारलं होतं.पर्यायाने टाँर्च बंद झाली होती.मधुराचा मोबाईल बँग मधे होता पण तो आता शोधा.. काढा..व्याप करत बसण्यापेक्षा दोघांनी ऊरला रस्ता पटकन पार करायचे ठरवले.तसा तो पायाखालचाच रस्ता होता.

     अंधार मी म्हणत होता.कालचीच अमावस्या असल्याने आज तितकाच जवऴ जवऴ काळोख होता.आजू बाजूला बर्या पैकी जंगल.चिट पाखरू रोड ला नव्हतं ना कोणी माणूस..जो तो अापापल्या घरात गोधडीत नोव्हेंबर ची थंडी आजमावत होता.मधेच अेखादी टिटवी आपलं अस्तित्व दाखवत होती.

         पण हे दोघे त्या सुनसान रोडवर ,अंदाजाने..अंधार जवऴ करत चालले होते.

        तोच...त्यांनी काही पाहीलं होतं.दोघेही जागचे थबकले.अंगावर त्या थंडीतही सरकन् काटा आला.लहान जीव आईच्या अधिक जवऴ सरकला.कोणाला हाक मारायची सोय नव्हती.कोणच येऊ शकत नव्हतं स्ट्रिट लाईट ने तर आज बंडच पुकारलं होतं.
     आपण असे आणी अशी रिस्क घेऊन यायला नको होतं.. यावर मधुराने आता शिक्कामोर्तब केलं होतं.
      त्या भिनकाट रोडवर आता ते फक्त दोघेच नव्हते..तर तिसरंही कोणी होतं...

     हो....तिसरं...

          साधारण ५० मी. हून कमी अंतरावर जमीनीपासून साधारण तीन साडेतीन फूटांवर दोन मोठाले चमकणारे डोळे त्यांच्या कडे रोखले होते.ते डोळे निश्चितच माणसाचे नव्हते ना कोण्या भूताचे .पण....ते त्यांच्यावर रोखले होते अन् मधेच त्या डोळ्यांसोबत असणारं तोंड त्यांच्यावर अेक विचित्र प्रकारचा आवाज करत होते...कदाचित त्या आवाजाला डरकाळी अगोदरचं गुरगुरणं म्हणू शकलो असतो.

        अंधारात ते जनावर फक्त दिसत नव्हतं पण त्याची देहबोली थरारून सोडत होती.

       मधुरा आणी अथर्व दोघेही पुरते घाबरले होते.आता जीवाचं काही खर नाही हे ती ओळखून चूकली होती.

       या जंगलातून गावात वाघ ये जा करतो , हे ती ऐकून होती.गावातील वासरं रात्रीच्या वेळी वाघाने नेल्याचं तीने अनेकदा ऐकल्याचं ,आता तीला आठवू लागलं होतं..

      तो क्षण भयानक होता.तीला खात्री पटू लागली होती.आपण वाघाच्याच पुढ्यात आहोत.समोर जनावर होतं..ते ही अगदी जवऴ...

 ती देहबोली तशीच होती..

    मधुराने धीर अेकवटला.आपण आपलं आयुष्य जगलोय.माझ् लेकरू वाचलं पाहीजे..हिच अेक भावना आता शिल्लक होती.तीने अुरलं सुरलं अवसान आणून,अथूला आवाज दिला..

           "बाबू तू या साईडने पऴत जा.मामा कडे पोच.बिलकूल ईथे थांबू नकोस.या जनावराची टाप नाही तूझ्या पर्यंत यायची.पहिले मला मारावं लागेल त्याला."
"मी ईथे ऊभी आहे त्याच्या व तूझ्या मध्ये...घाबरू नको.तूला काही हौऊ देणार नाही.फक्त तू पऴ .."
"ईथून पळ..."
"थांबू नको पिलू पऴ..."
"अथू जा ईथून..वेळ नाहीये जा..."

          पण तो ही तितकाच हट्टी.आईला सोडून तसूभरही हलला नाही.त्याला त्याची आई हवी होती..

     ईकडे ते जनावर अधिक जवऴ येऊ लागलं होतं.आवाज वाढला होता.मधुरा आता अथू ला ओरडू लागली होती.

" बाबू अरे पऴ ईथून.नको माझा विचार करू...पऴ.."

     "माझी शपथ आहे बाबू जा पटकन ईथून.."
   तीला तीचा जीव प्यारा नव्हता.तीचा पोर वाचणं महत्वाचं होतं.बापाचं पोर त्याच्या हातात सुरक्षीत देणं गरजेचं होतं..

     ती जीवाच्या आकांताने ओरडून त्याला जायला सांगत होती.
     अथू मात्र आईची सोबत अजून ही सोडत नव्हता.
   आता अंतर कमी राहीले होते...सहा सात फुटांवर ते डोळे दिसू लागले होते..

काहीही होणार होतं.
हीला, 'आपली जबाबदारी आपण पार न केल्याची खंत जाणवू लगाली होती.'
काहीच क्षण ...
मग सारं संपणार होतं..
ऊडी घेतली की काय आपल्यावर..
डोळे अधिक गडद..
त्यांचं चमकण अधिक दाट  होऊ लागलं होतं..

कधीही हल्ला होईल नी जीवाची सोबत संपेल...

खंत अेकच पोर माझा..
तो वाचला पाहीजे.पण तो ही जात नव्हता नी आता वेऴ ही ती राहीली नव्हती.

बास झालं...संपलं...
संपलो आम्ही...

"तूमचं ऐकायला पाहीजे होतं..."ती मनातून मला कबूली देत होती..

अन तो आवाज अगदि कानाजवळ...
संपलं...
ऊद्या लक्तरं झालेलं शरिर ही मिळणार नाही ....डोळे आसवांनी भरून येऊ लागली होती.ती त्याही परिस्थितीत अथूला मागे ढकलत होती.

आता काहीच क्षण आपण या जगात मग सर्व संपलं...
      तोच..
    

स्ट्रिट लाईट अचानक आली....

रोडभर ऊजेड पसरला..

लख्ख प्रकाश पडला..

समोर ते जनावर आता स्पष्ट दिसू लागलं..
    अन्...
             ते जनावर दिपलं होतं...
         पण दोघांनी त्याला पाहील होतं...
       अेक कांडक केंडकं कूत्र..अंधाराचा फायदा घेऊन ,त्यांच्यावर मघापासून दादागीरी करत होतं....

      हो ...वाघाच्या अविर्भावातलं ते...अगदिच अेक हाडकूळ कूत्रं होतं..
????????????????????

      शूट झालेला हीचा बिपी आता सटकन नाँर्मल ला आला होता.आपण अेखादं वाईट स्वप्न पहावं नी जाग आल्यावर जसं हायसं वाटावं तसं त्या दोघांना झालं होतं.

    ती व तीचा लेक पूर्ण पणे सेफ होते..

    कूत्रं असलेलं पाहून,अथूने आता वीट ऊचलली होती.ती अंगावर पडण्याच्या अगोदर ते आता पळालं होतं..त्याचा क्यँव क्यँव आवाज त्या ही परिस्थितीत चांदोरचा गाव अंशत: दणाणून सोडत होता...अंगावरचा घाम पुसत ते आता अंगणात शिरले होते.

        काही सेकंदातच , त्यांच्या मामाला ,अप्पांना ,यांनी ठरवल्या प्रमाणे सरप्राईज मिळाला होता...

     पण तो द्यायच्या नादात ,त्यांनी अगोदरच सरप्राईज अनुभवला होता.

        काही वेऴातच थकलेले दोघे , पोटभर जेऊन...तो प्रसंग आठवत गोधडीत शिरून ठाँक होणार होते...

      कदाचित ते आता परत कधीच कोणालाच सरप्राईज देणार नव्हते...

तोच घरातली लाईट बंद झाली होती..

       चांदोरे वर आता रात्रीचा अंमल चढू लागला होता...
      
     समाप्त...

मनोज नागांवकर
@ नागांव बीच...