त्या किनार्यावर...

रहस्य कथा

त्या किनार्यावर...

          कोकणात अगदि समुद्र किनारी असलेल्या अेका हाँटेल वजा रेस्टाँरंट मधे आज सकाळ पासून गडबड ऊडाली होती.ज्याची त्याची खूप धावपऴ होती.
           प्रत्येकाच्या चेहेर्यावर विलक्षण चिंता दिसत होती.तसं हे हाँटेल खूप नावाजलेलं.. 
       रैस्टाँरंटच तसं पण येणार्या प्रत्येकाची अगदि घरच्या माणसा सारखी चौकशी केली जायची.हवं नको..जेवणातील पदार्थ ...सर्व काही आपले पणे विचारलं जायचं.
       विकेंड ला तर ईथे जागा नसायची.विकडेच जरा तरि मोकळा असायचा.बिचवरही गर्दि नसायची.मग फँमीलीज् जास्त करून विकडेजला यायच्या.प्रशस्त समु्द्र , जेवणात रूचीदार पदार्थ तसेच माशांचे विविध प्रकार या साठी हा बीच फेमस होता.तळ कोंकणातील हा बीच म्हणजे पर्यटकांसाठी अेक पर्वणीच असायचा.
           अशा या बीचवरील या रेस्टाँरंट मधे आज भयानक चिंतेचं वातावरण होतं.कोणी तरि हरवल्या सारखं वातावरण निर्माण झालं होतं.
        अेक दांपत्य थकून अन् रडून रिसेप्शन जवऴ बसलं होतं...
      त्याची पत्नी हमसा हमशी रडत होती.तोही हताश बसला होता.पुण्याहून काल हे जोडपं आलं होतं.आज हि परिस्थिती येईल असं वाटलही नव्हतं.बाजूलाच तिथला अेक तरूण पोलीस निरिक्षक ऊभा होता.काही नोंदि तसेच जबाब नोंदवत होता.
      "मि.कुलकर्णी कधी गायब झाली ,म्हणजे तूम्हाला कधी आलं हे लक्षात..?"
        "सर , आम्ही काल आलो संध्याकाऴी.सकाळी मी सहाला ऊठलो..सुर्यदर्शन घ्यावं म्हणून रूमचं दार ऊघडलं.पण नंतर म्हंटलं झोपूया काही वेळ.पण दार आतून बंद नाही कैलं.जस्ट लोटल व या दोघांच्या बाजूला येऊन झोपलो."
      "तैंव्हा तूमची मूलगी होती ?"
       "होय, सर ती झोपलेलीच होती.माझाही मग डोळा लागला.ऊठलो तासाभराने तर छकूली गायब होती.आर्या..आमची चार वर्षांची मुलगी,या परमूलखात अचानक गायब झाली.तेंव्हा पासून सर्व शोधतोय..जवळ पासचं काहीच बाकी नाही ठेवलं."
     "सर तीच्या डाव्या हातावर अेक मोठा दिसून येईल असा तीळ आहे.जी तीची जन्मखूण आहे."
      कुलकर्ण्यांची चार वर्षाची आर्या ऊर्फ छकूली सकाळ पासून गायब होती.पोलीस आता गंभीर झाले होते.निरनिराळे अँगल विचारात घेतले जात होते.
     चाईल्ड ट्रँफेकिंग हा अेक त्या पैकीच मुद्दा होता...कदाचित ती स्वत: हून बाहेर पडली असावी..झोपेच्या भरात मग वाट चूकली असावी..तसा शोधही चालू होता.
      संध्याकाळ होत आली.कुलकर्णी दांपत्य खूप टेंशन मधे होतं.सौ कुलकर्णींना तर अँडमीट व्हायची पाळी येईल की काय अशी अवस्था होती.
    हाँटेल मालक , नाईक .ही विचार करत होता.आज त्याचा बिजनेस ठप्प होता.पण त्याचं दु:ख नव्हतं त्याला.पोर सुखरूप मिळावी ईतकच.
    यातच चार वाजले अन् अचानक छकुली दिसली..डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता..पण नवरा बायको..अत्यंत खूश झाले होते.डोळ्यांतून आनंदाची आसवं येऊ लागली होती.तीला पटकन ऊचलून घेऊन, सौ कुलकर्णी तीच्या गालावर मानेवर कपाळावर पा घेऊ लागल्या.तीच्या डाव्या हातावरचा काळा तीळ,सर्वजण पहात होते.
     "छकूली तू कूठे होतीस गं..?किती शोधलं..?
अन् आलीस कशी बरोबर..?
कूठे गेलेलीस ...?"
   अनेक प्रश्न ऊभे राहीले..छकूली मात्र मजेत हसत खेळत होती.बोबड्या भाषेत बोलून गेली , "ते बाबा आलेले मला घेऊन गेले.आमी कि नई.. मम्मा ; खूप खेळलो बीचवर.त्यांनी खाऊपण दिला.पाण्याकही गेलो ; पोहलो ही..मग आता आणून सोडलं त्यांनी.ते काय तिथूनच गेले ते..मी बोलले मम्मा डँडा ला भेटा अंकल..पण ते गेलेच.."
     सर्व जण एव्हाना जमा झालेले..ऐकत होते..कोणालाच काही कळत नव्हते..कोण बाबा..कूठे रहातो..ईथे कसा आला..या अनोळख्या मुलीला का नेली..?"
    पोलीस आले ,जबाब नोंदवला..काही धागे दोरे शोधायचे प्रयत्न झाले पण काहीच हाती नाही..बंदोबस्त आजूबाजूला वाढवून केस सध्या क्लोज करावी असा त्यांचा विचार बनला.कुलकर्णींनाही स्वारस्य नव्हतं..आपली पोर आली..सुखरूप बस्..
       पण आता ते आणखी थांबणार नव्हते..कशी बशी रात्र काढून निघूया अस त्याने बोलून दाखवलं पण सौ तयार नव्हत्या..
   "अहो..मला ईथे कसंसच होतय..काही तरि घडतय जणू..पोर आली..पण आपण आताच निघूया..हे वातावरण गढूळ आहे.आपली कार काढा अन् चला...ईथे काहीच नको.."
    तो ही ठिक म्हणाला.बिल पै करून व पोलीसांची परवानगी घेऊन ते निघाले..नाईक..हाँटेल वाला सोडायला आला.होटेलच्या मागच्या अंगाने अेक्झिट होत..व समोरच समुद्र..डाव्या हाताला वळून ते मेन रोड ला लागणार होते.
     नाईक सोबतच होता..पण चालत ,कार ही तशी स्लोच होती.मेन रोड ला आले की ते निघणार होते.तोवर नाईकने सोबत केली.
           छकूली व आई पुढे बसली होती.मेन रोड ला वळली गाडी तोच छकूली ला अेक फोटो दिसला..बारीकसा होता..पण खाली काही लिहील होत.
     तीने डँडाला हाक मारली...डँडा..हेच बाबा मला सकाळी भेटलेले,ज्यांचा फोटो आहे तिथे.
    नाईक ऐकत होता. कुलकर्णीही थांबायच्या मूड मधे होता.तोच सौ म्हणाल्या.."अहो..नको ना मला भिती वाटते...निघूया ना..नको तो फोटो पहायला..आपली लेक सुखरूप आहे..चला लवकर.."
   "ठिके..चल नको थांबूयात...त्याने कार वळवली..घामाने भिजलेल्या नाईकचा चेहेराही पहात थांबला नाही..जस्ट अेक हाँर्न दिला..नी गाडीने पुण्याच्या रोखाने वेग धरला..
    मात्र नाईक त्या फोटो कडे पहात होता.तो फोटो अेका स्तंभावर चिकटवलेला होता..जो परिचयाचा होता..त्या फोटो खाली लिहिले होते..
     "चार वर्षापूर्वी आपल्या नातीला पाण्यात बूडत असते वेळी, वाचवताना मुंबई येथील श्री. म्हात्रे यांना जलसमाधी.."
          वर तोच फोटो होता..ज्याकडे छकूलीने बोट दाखवून सांगीतले होते की या बाबांनी मला फिरवायला नेली होती.
      नाईक घामाने भिजला होता..अंगावर शहारे अन्..हात थरथरा कापू लागले होते....
     ती छकूली ज्या सोबत गायब होती..खेळली बागडली..तो चार वर्षांपूर्वीच.....
         धावत पळतच नाईक त्याच्या आँफिस ला परतत होता तोच त्याला त्याच्या गड्याने आवाज दिला..
    "मालकानू हायसर येवा" तो कमालीचा घाबरला होता..
    त्याने जिथे बोलावले ती जागा तीच होती जिथे तो बाबा ऊर्फ म्हात्रे आपल्या नातीला वाचवताना बूडाला होता...
     अन् तिथैच बाजूला अेक डेड बाँडी होती...
     लहान मुलीची..वय साधारण चार वर्षे...तोच ड्रेस..तोच चेहेरा..
       नाईकाने ती बाँडी ओळखली...चक्कर येऊन पडण्या आधी त्याने त्या मूलीच्या डाव्या हातावरील काळा तीळ ही पाहीला होता....
       ती छकूलीच होती याची त्याला खात्री पटली होती....
       अन् तिकडे कुलकर्णीची कार पुण्याचा रोख धरत ,गर्दित मिसळत होती...अन कार मधील छकूलीचे डोळे भरून येणार्या रात्री सोबत लाल बनत चालले होते....

मनोज नागांवकर
@ नागांव बीच