मागील भागात आपण पाहिलं की समीर आणि मीनाक्षीला आपल्या वागण्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. आता पाहूया पुढे,
कविता हळूहळू अबोल होत गेली. ऑफिसमधून आल्यावर थेट आपल्या खोलीत जायची. समीरच्या हे लक्षातही आलं नाही. उलट, त्याला वाटायचं की कविता उगाच चिडचिड करते.
एका संध्याकाळी अनय खेळताना पडला. त्याच्या गुडघ्यावर जखम झाली. रडत रडत तो मीनाक्षीजवळ गेला, "आजी, मला लागलं बघ! काहीतरी लाव ना?"
ती त्याच्या गुडघ्याकडे बघून म्हणाली,
"अरे काही नाही रे, मुलं पडतातच. जा तिथे ट्यूब आहे ती लाव. "
पण त्याचवेळी आरव धडपडला, आणि मीनाक्षी घाबरून त्याला उचलायला धावली.
"बाळा, तुला लागलं का? अग बाई किती लागलंय"
अनयने ते पाहिलं आणि त्याचं रडणं थांबलं. कारण त्याची आजी आरव साठी खूपच घाबरली होती. त्यांनी स्वतः त्याला ट्यूब लावली. पण त्यावेळेस आरवला शांत करण्यामध्ये त्यांचं लक्ष अनय कडे गेलं देखील नाही.
हे सगळं अनयने कविताला सांगितलं तेव्हा समीर देखील तिथेच होता. पण त्याला काही वाटलंच नाही. ते पाहून कविता चिडून समीर बोलली,
"तुला कधी जाणवेल की आपल्या मुलला दुर्लक्षित केल जातंय?
"कसला दुर्लक्षित? अरे आई आहे ना घरी! ती बघतेच ना, शिवाय तू आहेस."
"आई? जी आपल्या नातवासाठी वेळ नाही काढत? त्यांना फक्त ताईंची मूल दिसतात. भेदभाव करतात त्या.,"
तिच्या सुद्धा सहनशक्तीचा अंत झाला होता.
समीर वैतागला, "कविता, तु काहीतरीच बोलू नको अनय च ऐकून. आई सगळ्यांवर सारखं प्रेम करते."
" समीर अरे जे आम्हाला दिसतंय ते तुला कधी दिसेल देवास ठाऊक. पण त्यांना फक्त अनय माझा मुलगा दिसतोय तुमचा नाही. मी असं नाही म्हणत त्या दोघांवर प्रेम करू नका. पण अनयला देखील कधीतरी जवळ घ्यावं त्यांनी. "
त्यावर समीर काही बोलला नाही. तो कूस बदलून झोपून गेला. इकडे कविता रात्रभर तडफडत राहिली.
एके दिवशी अनय तापाने फणफणल होता. तर कविता ऑफिसला गेली होती. समीर नेमका त्यावेळेस लवकर घरी आला होता. अनयला ताप आलाय हे पाहून तो त्याच्या आईला म्हणाला,
"आई, डॉक्टरकडे का नाही घेऊन गेलीस अनयला, केवढा ताप भरलाय त्याला."
"अरे, कविता आली की जाईल घेऊन. मी थोडी दमलेय आता आणि एवढं काही नाही एखादी गोळी आणून दे त्याला."
इकडे समीर आत मध्ये अनय जवळ गेला. त्याचवेळी प्राची आली आणि मीनाक्षीला म्हणाली,
"आई, अग आरवचा खोकला वाढलाय. औषध देतेस का त्याला."
त्यावर मीनाक्षी बाई तिला ओरडल्या,
"अग पोराला एवढा खोकला झालाय आणि तू घरच औषधं देणार. आधी त्याला डॉक्टर कडे घेऊन जा. नाहीतर थांब मीच घेऊन जाते."
इकडे समीरला त्याच बोलण ऐकू जातं आणि त्याच्या डोळ्यावरची झापडे दूर होतात. त्याचा मुलगा तापात फनफनलाय, तरी आईला काही वाटत नाही आणि ताईच्या मुलाला साधा खोकला असून तिला काळजी वाटते. कविता म्हणते तेच खरं आहे. आई खर्च माझ्या मुलात आणि ताईच्या मुलात भेदभाव करते.
इकडे कधीही जबाबदारी न घेतलेल्या समिरवर जबाबदारी येऊन येऊन पडली तसं तो गोंधळला, त्याला अनयची औषधे सुद्धा ठाऊक नव्हती. ज्याचं त्याला फार वाईट वाटलं. त्याने पटकन कॉल करून कविताला बोलावून घेतलं. इकडे ती यायचा वेळ आणि मीनाक्षी प्राची सोबत जाण्याची वेळ सारखीच झाली. तिने सुद्धा दारात उभ असताना सगळं ऐकलं .पण आता तिच्या डोळ्यात पाणी आणि राग दोन्ही होत.
"आई, तुम्हाला प्राचीताईंच्या मुलांची काळजी आहे, पण माझ्या मुलाची नाही. अनय मात्र फक्त माझा एकट्याचा आहे का? विसरू नका तो तुमच्याच मुलाचा मुलगा आहे."
आज पहिल्यांदा तिच्या तोंडून राग बरसत होता.
आणि हे ऐकून मीनाक्षी अवाक झाली.
"आत जो तापात फनफनलाय ना तो देखील तुमचाच नातू आहे. मी असं नाही म्हणत आरव साठी काही करू नका. पण आता त्याच्यासोबत तुम्ही अनयला सुद्धा घेऊन जाऊ शकत होत्या ना?"
ह्यावर मीनाक्षीला काय बोलाव तेच सुचेना. तिला कधी कुणी तिच्या चुकीची जाणीव करून दिलीच नव्हती. प्राची देखील मला ह्यातलं काहीच ठाऊक नव्हतं एवढं बोलून हात वर करून मोकळी झाली. एवढ्यात समीर देखील अनयला घेऊन बाहेर आला. त्याला सुद्धा खूप राग आलेला.
इकडे बाहेर जाताना अनय हळूच म्हणाला,
"आजी, तुझ माझ्यावर प्रेम नाही का? मी नाही आवडत का तुला??"
ते ऐकून मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती काही बोलणार तेवढ्यात ते दोघे अनयला घेऊन डॉक्टर कडे गेले. रात्री त्याला ऍडमिट करून दुसऱ्या दिवशी सोडणार होते. त्या दिवशी पूर्ण रात्रभर त्यांनी विचार केला. तसं त्यांना त्यांची चुकी जाणवली. अनयला त्यांनी नेहमीच कविताचा मुलगा म्हणूनच पाहिलं. सुनेच्या मुलाला काय जीव लावायचा हेच त्यांच्या डोक्यात होत. पण आज अनयचे ते शब्द आणि जाताना समीरची ती तिरस्कार युक्त नजर पाहून त्यांचं त्यांनाच लाज वाटली.शिवाय पहिल्यांदा काल कविताने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव सुद्धा करून दिली. तिने आपल्या वागण्याचा विचार केला. मुलीच्या मुलांसाठी असलेली जीव लावण्याची भावना सुनेच्या मुलासाठी का नाही?
आतून कुठेतरी त्यांना खूप अपराधी वाटू लागलं होत.
दुसऱ्या दिवशी अनयचा ताप उतरल्यामुळे कविता कामावर जायला निघाली, तेव्हा तिला अनयला घरी ठेवून जाणं खूप जड जात होतं. तिने समीरला थांबायला जमेल का हे विचारलं तेव्हा ते ऐकून मीनाक्षी बाहेर आली आणि म्हणाली,
"कविता, तू ऑफिसला जा. मी अनयला सांभाळते."
कविता अचंबित झाली, तिला त्यावर विश्वासच बसत नव्हता.
"खरंच?"
मीनाक्षीने पहिल्यांदा अनयला मांडीवर घेतलं, त्याच्या कपाळावरून हात फिरवला. त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद झळकला.
"आज अनय आजीच्या हातचं पोळी-साखर खाणार, बरं का?"
अनयने आनंदाने मान डोलावली. ते पाहून कविता आणि समिरला देखील बर वाटलं.
त्या दिवशी घरात फक्त सासूला नव्हे, तर एका आजीला स्वतःची चूक कळाली होती. तिने अनय आणि कविताची माफी देखील मागितली. तसेच समिरने ही कविताला अनयची जबाबदारी घेण्याचे वाचन दिल.
कधी कधी जाणीव लवकर होत नाही, पण ती झाली की नाती फुलू लागतात. मीनाक्षी आता तिन्ही नातवंडांवर समान प्रेम करत होती. कविता आणि तिच्यातलं अंतर कमी झालं. आणि अनयला पहिल्यांदाच घरात आईसारखी आजी मिळाली.
कधी कधी आई-मुलीच्या प्रेमात सून आणि तिच्या मुलांना दुर्लक्षित केलं जातं, पण माया ही माणसाच्या मनातली गोष्ट आहे. ती जेव्हा उशिरा का होईना, पण उमलते, तेव्हा सगळं बदलतं.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा