मागील भागात आपण पाहिलं की, कविताचा सगळं आवरता आवरता जीव मेटकुटीला यायचा. तिला तिचा नवरा किंवा सासू काहीच मदत करत नसत. आता पाहूया पुढे.,
. कविता ऑफिसमधून दमून यायची, आणि समीर घरी असला तरी त्याला मुलाच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या समजायचं नाही. आधी तिने सांगून बघितलं नंतर ते सुद्धा सोडून दिल कारण त्याची उत्तरेच तसही असायची.
"समीर, जरा अनयला हात धुवायला मदत करशील का?" कविताने म्हंटल.
"अगं, मी दमलोय. समजत नाही का तुला??? आई आहे ना घरी, ती करेल ना?
तो वैताकून म्हणाला.
मीनाक्षीनेही लगेच भर घातली,
"हो, मग दिवसभर मी करतेच ना? पण मुलाला आईनेच सांभाळायला हवं. नोकरी करणं वेगळं, पण मुलांकडे दुर्लक्ष करता कामा नये. काम काय महत्वाचं आहे का???"
कविता सुन्न झाली. सासूबाई दिवसभर प्राचीच्या मुलांसाठी राबत होत्या, आणि अनयसाठी मात्र तिनेच सगळं करायचं?
आता तर कविताला हे रोजचं झालं होतं. प्राचीच्या मुलांसाठी दूध, फळं, कपडे सगळं काही त्या बघायच्या पण अनयने काही मागितलं तर,
"कविता, त्याला तू बघ! मी दमलेय."
असं सांगून त्याला पिटाळून लावायच्या.
असं सांगून त्याला पिटाळून लावायच्या.
एकदा अनय शाळेतून आला आणि तेव्हा कविता ऑफिसमध्ये असल्यामुळे तो त्याच्या आजीला मीनाक्षीला म्हणाला,
"आजी, मला दूध हवंय. खूप भूक लागले."
"थांब जरा, मी आधी ईशानला भरवते. तुला तुझी आई देईल. जा तिकडे जाऊन बस..."
अनय बिचारा चूपचाप खोलीत गेला आणि त्याची आई येईपर्यंत रडून खोलीतच झोपून गेला. कविताला हे समजलं तेव्हा तिला खूपच त्रास झाला. कविता अनय च्या बाबतीतला प्रकार पाहून हतबल होत चालली होती. तिला कोणतीही मदत नव्हती, पण समीरला त्याचं काही वाटत नव्हतं. तो मोबाईलवर बोलत असे किंवा टीव्ही बघत असे.
कविता रोज बघायची, आरव आणि ईशानसाठी दूध, फळं, शाळेचे डबे तयार असायचे. अनयने काही मागितलं तर मात्र, "अगं, त्याला जरा तिकडं खेळू दे. मोठा झालाय आता," असं उत्तर मिळायचं.
एकदा प्राचीच्या मुलांना सर्दी झाली, तर मीनाक्षी आजी दिवसभर त्यांच्याजवळ बसली. त्यांच्या अंगावर पांघरूण द्यायची, त्यांना औषधं द्यायची, रात्री उठून त्यांचं कपाळ पुसायची.
अनयला मात्र ताप आला की, "कविता, त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. मी दमलेय," असं ठरलेलं उत्तर असायचं.
"आई, तुम्ही अनयला कधी तरी अभ्यास शिकवाल का?" कविताने खूप थकल्यामुळे विचारलं.
"अगं, मी प्राचीच्या मुलांना शिकवते ना आधीच! शिवाय अनयला तू शिकवलंस तर जास्त चांगलं नाही का????"
कविताला तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरचा हिरमुसलेला भाव दिसायचा म्हणून ती विचारायची कारण तो देखूळ आजीच्या प्रेमाला पारखा होत चालला होता.
समीर किंवा मीनाक्षीला कधी जाणीव होईल का??
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा