तेरे इश्क की मुझको आदत है.. Part 2

एक अनोखी प्रेमकहाणी..


कधी कधी मंदारचा live show सुरु असताना त्याला blank calls यायचे.. हॅलो म्हटलं की phone कट.. हे नेहमीचच झालं होतं.. त्याच्याही ही गोष्ट लक्षात येत होती पण तो जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत होता..

मंदारचे आई वडील त्याला भेटायला आले.. जेवणं आटपल्यावर मंदारच्या आईने लग्नाचा विषय काढला..

मंदार, अरे लग्नाचं घे मनावर.. तुझी बायको आली की मी निश्चिन्त होईन..       : आई

आई, नाही करायचं मला इतक्यात लग्न.. का पुन्हा पुन्हा तोच विषय काढतेस :  मंदार

आणि तो तिथून उठून  त्याच्या खोलीत गेला..

त्याचं हे वागणं आईसाठी काही नवीन नव्हतं..

असेच पाच सहा महिने गेले आणि आईने लग्नासाठी मंदारला कसबसं तयार केलं..

झालं.. ही बातमी social media वर वाऱ्यासारखी पसरली.. Famous RJ मंदार महाजन लवकरच लग्नबंधनात अडकणार..

सरूने ती post पाहिली आणि मानसीला सांगितलं..

मानसी, अग ही post बघ.. मंदार लग्न करतोय..    :  सरू

आता तरी त्याचा विचार करणं सोडून दे    : सरू

सरू, मानसी या दोघी एका गावात राहायच्या.. Radio वर मंदारचा आवाज ऐकून मानसी त्याच्या प्रेमात पडली होती.. पण ती त्याच्यासमोर ते व्यक्त करू शकत नव्हती कारण तो ते स्वीकारेल याची तिला खात्री नव्हती..

Blank call करून त्याचा आवाज ऐकून ती समाधान मानायची.. तासनतास त्याच्या फोटोशी बोलत बसायची..

मनू, ऐक ग माझं.. नाद सोड त्याचा..   : सरू

अ.. काही म्हणालीस का..   : मानसी

मनू, भूतकाळातल्या आठवणीत रमली होती.. एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदार मानसीच्या जवळच्या गावात आला होता, तिथे तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं.. आणि तेव्हापासून दुसऱ्या कोणाचा विचारही तिने केला नाही..

मानसी..  :  सरू ( सरूने मानसीला तंद्रीतून बाहेर काढायला हाक मारली)

सरू, नको करुस अग मला समजवायचा प्रयत्न..

माहितीये मला मंदार कधीच  नाही होऊ शकत माझा.. पण मी त्याच क्षणी त्याची झालीये जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं, त्याचा आवाज ऐकला.. माझ्यासाठी तो असणं महत्वाचं आहे.. तो माझ्यासोबत असावा हा माझा हट्ट नाहीये, इच्छा आहे.. पण सगळंच आपल्या मनासारखं होत नाही ना..

मानसी, एकदा बोल तरी त्याच्याशी मनातलं.. कळेल तरी त्याच काय म्हणणं आहे ते..   : सरू

नाही.. मी त्याच्यासाठी अनोळखी असलेलीच चांगली आहे.. Blank call वर त्याचा आवाज ऐकून सुखावते.. त्याच्या भावी आयुष्यासाठी त्याला निनावी बुके पाठवून शुभेच्छा देते..

मी नाही पोचत आहे त्याच्यापर्यंत पण माझं प्रेम तर पोहोचतंय ना..

ते सगळे blank calls, बुके एक गावाकडची मुलगी आपल्याला पाठवतेय हे कळल्यावर तो का स्वीकारेल मला.. एक छोट्या खेडेगावातली मुलगी आपल्यावर प्रेम करतेय, आपल्यासोबत आयुष्य घालवायची स्वप्न बघतेय, या विचाराने तो माझा तिरस्कार करेल..
त्याला माझा राग येईल असं काहीही करायचं नाहीये.. मानसीला भरून आलं होतं..

मानसी, इतकं का ग प्रेम करतेस त्याच्यावर..  :  सरू

जर त्याला कारण असतं तर ते प्रेम नसतं ना..  मानसी

सरूला मानसीचा त्रास बघवत नव्हता पण ती तरी काय करू शकणार होती यात..

इकडे मानसीच्या वडलांना कसा कुठून माहित नाही मंदारचा फोटो सापडला.. त्यांचा राग अनावर झाला.. तिचं बाहेर कुठेतरी प्रकरण चालू आहे असा त्यांचा समज झाला.. त्यांनी मानसीला काही न विचारता परस्पर तिचं लग्न ठरवलं..

इकडे मंदारच्या लग्नाचा मंडप सजला आणि तिकडे मानसीच्या हातावर मेहेंदी लागली..

लग्नासाठी मानसीला बोलवायला तिची आई तिच्या खोलीत गेली तेव्हा मानसी बेशुद्ध अवस्थेत होती.. तिच्या हातात विषाची बाटली होती.. दवाखान्यात नेईपरेंत तिने अखेरचा श्वास घेतला होता.. सरूला रडूच आवरत नव्हतं कारण खरं काय आहे, ते तिलाच माहित होतं..

मंदारचं लग्न थाटात पार पडलं.. त्याला बरेच gifts मिळाले.. त्यातल्या एका गिफ्टवर त्याची नजर पडली.. एक साधं घड्याळ होतं त्यात आणि एक चिट्ठी..
तेरे इश्क की मुझको आदत है 

ते तेच घड्याळ होतं जे तो गावी कार्यक्रमासाठी गेला असताना फॅन्सच्या धक्काबुक्कीत पडलं होतं आणि ते नेमकं मानसीला सापडलं.. ते मानसीने आजपर्यंत जपून ठेवलं होतं त्याची आठवण म्हणून..

🎭 Series Post

View all