❣️✨❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यावर ठेवला होता तू हात तुझा..
त्याच डायरीच्या त्याच पानावर,
जाणवतो आजही मला सहवास तुझा..
❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यावर लिहिलं होतं तू नाव तुझं..
त्याच डायरीच्या त्याच पानावर,
आजही दिसते मला तुझंच प्रतिबिंब..
❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यावर एकवेळ वावर होता तुझा..
त्याच डायरीच्या त्याच पानावर,
आजही भास होतो मला तुझा..
❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यावर दिली होती आपण प्रेमाची साक्षं..
त्याच डायरीच्या त्याच पानावर,
मन आजही गुंतून बसतं..
❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यात लिहून घेतल्या होत्या आपण आपल्या नात्याच्या आणाभाका..
त्याच डायरीच्या त्याच पानावर,
हात फेरताच आजही शहारा येतो मला..
❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यात दडवून ठेवलंय मी आपल्या प्रेमाचं प्रतिक असणारं पंख..
त्याच डायरीच्या त्याच पानावर,
त्या पंखास जवळ करताच जाणवतो मला आजही तुझाच स्पर्श..
❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यावर लिहिलं होतं तू माझं नाव तुझ्या आडनावाची जोड देऊन..
त्याच डायरीच्या त्याच पानावर,
आज मात्र नजर काहीशी बसलीय खिळून..
❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यात लपवला होता मी फोटो तुझा..
पण आज त्याच डायरीच्या त्याच पानावर असलेला तो फोटो बघताच,
होतोय विचित्र असा आभास मला..
तो फोटो आज जाणवतोय काहीसा विरळ असा..
❣️
ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
ज्यात तुझ्याचसाठी लिहिल्या होत्या मी कित्येक प्रेमकविता..
पण आज त्याच डायरीच्या त्याच पानावर,
पुसटशा दिसत आहेत त्या प्रेमकवितांच्या ओळी तुझ्याविना..
❣️
पण अजूनही ते डायरीतलं पान ठेवलं आहे मी जपून,
कारण विश्वास आहे मनात माझ्या..
या प्रवासात मला एकटं सोडून तू जाणार नाही याचा..
म्हणून त्याच डायरीच्या त्याच पानावर,
नजर खिळताच मनातून एकच आवाज येतोय की, हा प्रेमप्रवास ह्या प्रीतवाटेवर माझा हातात हात घेत, मला एकाकी न सोडता, मला मिठीत घेत; पूर्णत्व प्राप्त करून द्यायला नक्कीच येणार माझा प्रियकर वेडा..
❣️✨❣️
✍️
✨❣️ श्रावणी ❣️✨
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा