तुला तुझी वाट मोकळी आहे

मुलगी झाली म्हणून बायकोला सोडण हे मूर्खपणाचं लक्षण आहे.

              श्वेता दहावीला होती;तेव्हा आईची केस सुरू असताना तिचे वडील पहिल्यांदाच कोर्टात भेटले.श्वेताने पहिल्यांदाच वडिलांना पाहिले.कारण लहानपणापासून वडिलांच प्रेमसुद्धा आईकडूनच तिला मिळालं.आणि आता त्यांना स्वत:ची मुलगी आहे याची जाणीव झाली होती.दहावीतूनच मुलीचं लग्न करून टाक सांगणारा नवरा मात्र सुमित्रा म्हणजेच श्वेताच्या आईला नको होता.ही श्वेताच्या जन्मापासूनची गोष्ट.....
           सुमित्राबाई डिलिवरीसाठी माहेरी आल्या होत्या.नवरा काडीचं काम करत नव्हता.पण सुमित्राबाई लहान असतानाच वडिल वारल्याने त्यांच लग्न कुठेही चौकशी न करता अधिक घाईने व बिकट परिस्थितीत झालं होतं.सुमित्राबाई,त्यांचा नवरा व सासू तीनच माणसे घरात होती.सासूची कटकट सुरूच होती पण नवराही तसाच....कधीच सुखाने नांदवल नाही.सुमित्राबाईच याच्या त्याच्या रानात काम करून घरातलं सगळं भागवायच्या.अशातच सुमित्राबाईंना दिवस गेल्याचे समजले पण नऊही महिने गुरासारखे कष्ट करून शेवटी डिलिवरीला माहेरी आल्या.डिलिवरी झाली,मुलगी झाली....हे कळालं तरीही नवरा व सासू एकदाही बाळ पाहायला आले नाहीत कारण त्यांना मुलगा हवा होता.बाळ सहा महिन्यांच झालं तरीही सासरहून कोणीच न्यायला आलं नाही.सुमित्राबाईंना चार बहिणी व एक भाऊ होता आणि त्यांचीही परिस्थिती खूप हलाकीची होती म्हणून आईवर भार बनून राहायचं नव्हतं.
एक दिवस त्यांनी स्वत:च्या मोठ्या बहिणीला बोलावून घेतलं आणि लगेच दुसरया दिवशी एस.टीने सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन सासरी दुपारी १वाजता पोहोचल्या.घरी सुमित्राबाईंचा नवरा नव्हता पण सासूने त्यांना घरात न घेता बाळासहित अंगणात भर उन्हात बसवून ठेवले.सुमित्राबाईंच्या बहिणीने घरात निदान बसू तरी द्या; अशी विनंती केली.पण सासूला मात्र रडणारं बाळ बघून त्याला एक कपभर दूधही द्यावसं वाटलं नाही;मग त्या घरात कश्या घेतील.चार वाजता सुमित्राबाईंचा नवरा आला.सुमित्राबाई बाळासहित मला घरात राहू द्या,असं विनवत होत्या.पण नवरयाला काडीमात्र फरक पडला नाही.त्याने सुमित्राबाईंना ठणकावून सांगितले की,मुलगी नकोय मला....मुलगा हवा होता.तुला या घरात जागा नाही.तुला तुझी वाट मोकळी आहे.तू तुझ्या माहेरी जा कायमची.....या सगळ्या झटापटीत तिथेच सहा वाजले पण त्यांनी ती एक रात्रही सुमित्राबाईंना घरात थारा दिला नाही.
       सुमित्राबाईंच्या आयुष्यातील ही काळरात्र.....त्या भावाकडे येऊन राहिल्या.माहेरी कष्ट करून मुलीला शिकवण्याच्या जिद्दीने काम करू लागल्या.तरीही त्यांचा नवरा फोनवरून सुमित्राबाईंना शिवीगाळ करायचा.शेवटी वैतागून सुमित्राबाईंनी केस टाकली आणि ही कोर्टातील शेवटची तारीख होती.पण शेवटी सत्याचाच विजय होतो.सुमित्राबाईंना व श्वेताला आज स्वातंत्र्य मिळालं होतं बायकोची व मुलीची इज्जत न करणारया नराधमापासून......पण जरी श्वेताने आज पहिल्यांदा वडिलांना पाहिलं असलं तरी ती वडिलांशी न जुमानता,न घाबरता निर्भिडपणे बोलली.आजपर्यंत माझ्या आईने मला आईवडिलांच दोघांचही प्रेम दिलं.कष्ट करून मला शिकवतेय.तिचं कष्ट व विश्वास मी सार्थ करून दाखवेन.पण जेव्हा तुमची आई वारली तेव्हा आम्ही तुम्हांला दिसलो.पण यामागे कसे दिवस काढले याची कधी विचारपूल तरी केली का...??ज्या माणसाला मुलीबद्दल राग आहे व ज्याने माझ्या आईला एवढा त्रास दिला त्या माणसाकडे मी येईन,असं वाटलंच कसं....पण आज तुमच्या घटस्फोटानंतर खरया अर्थाने आम्ही दोघी स्वतंत्र झालो.......सुमित्राबाई श्वेताकडे एकटक पाहतच उभ्या होत्या आणि देवाचे मनोमन आभार मानत होत्या की, श्वेतासारखी मुलगी त्यांना लाभली होती.
          मुलगा काय नि मुलगी काय...??आजच्या युगात दोन्ही समान आहेत पण काही लोक वंशाचा दिवाच पाहिजे या हट्टापायी कितीतरी आयुष्य उध्वस्त करतात.यात त्या मुलीचा आणि तिच्या आईचा काय दोष....एका मुलीवर ऑपरेशन करणारे कितीतरी पालक आहेत;मुलगी झाली म्हणून संसार मोडणारेसुद्धा बरेचसे लोक आहेत.शिवाय पहिल्या मुली असतील तर मुलासाठी गर्भलिंग चाचणी करणारेही तेवढेच......

##अक्षया राऊत
प्रिय वाचकहो लेख आवडल्यास लाईक करून मला फॉलो करा व तुमचे मत कमेंन्ट करून कळवा.